होय नगर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची लुट होतेय, ११ लाख रूपयांची…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नगर शहरातील २८ रुग्णालयांनी १ लाखावर आकारलेल्या बिलांची तपासणी सुरू आहे. 

या तपासणीत आतापर्यंत १२ रुग्णालयांनी सुमारे ११ लाख ५३ हजार १२३ रूपयांची बिले नियमापेक्षा जास्त आकारल्याचे समोर आले. 

समितीने संबंधितांना नोटिसा बजावल्या असून खुलासे मागवले आहेत. सहा पथकांमार्फत बिलांचे आॅडिट करण्यात येत आहे.

खासगी रुग्णालयांत २१८० रुग्णांनी उपचार घेतले असून त्यापैकी १५११ बरे झाले आहेत. एक लाखावर आकारलेली १६२ बिले पथकांनी तपासणीसाठी घेतली.

त्यापैकी १४३ बिलांची तपासणी झाली असून ६९ बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या. १२ रुग्णालयांच्या बिलांमध्ये सुमारे ११ लाख ५३ हजार १२३ शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले आहे.

या तपासणीचा अहवाल त्रिसदस्यीय समितीसमोर ठेवला आहे. काही रुग्णालयांनी खुलासे दिले आहेत. आवश्यकता भासल्यास रक्कम वसूल करण्याचे आदेश देऊ शकते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment