गुगलच्या या स्पर्धेतून तुम्ही जिंकू शकता ४००० डॉलर्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्हाला जर कोडिंगमध्ये स्वारस्य असेल तर गुगलने तुमच्यासाठी  हॅश कोड 2020 स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच या स्पर्धेमुळे कोडिंग क्षेत्रातील लोकांना अनेक भरघोस बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.

या स्पर्धेत तुम्ही दोन ते चार सदस्यांच्या गटाचे सदस्य म्हणून सहभागी होऊ शकता. २० फेब्रुवारीला होणाऱ्या या स्पर्धेच्या ऑनलाइन पात्रतेच्या फेरीत तुम्हाला तुमच्या पसंतीच्या प्रोग्रामिंग भाषा आणि साधनांच्या मदतीने ऑप्टिमायझेशनची समस्या सोडवावी लागेल.

या फेरीच्या प्रमुख संघांना गुगलच्या मुख्यालयात होणाऱ्या अंतिम फेरीत भाग घेण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीत त्यांना आणखी एक समस्या सोडवावी लागेल.

या फेरीतील पहिल्या ३ संघांना प्रति सभासद ४०००, २००० आणि १००० डॉलर चे रोख बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुमचे वय कमीतकमी १६ वर्षे असणे आवश्यक आहे.

तर, ऑनसाईट अंतिम फेरीसाठी संघातील किमान दोन सदस्यांचे वय १८ असायला हवे. स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेच्या नियम व अटी तसेच अधिक माहिती मिळविण्यासाठी या लिंकवर जा-

https://codingcompetitions.withgoogle.com/hashcode

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment