अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोनई : सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोरच्या हॉटेल नागेशजवळ दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून, सोनई पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर ताब्यात घेतला आहे. टँकर चालक अपघाताची खबर न देता पसार झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सोनई पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सोमवार दि. २४ फेब्रुवारीच्या रात्री १०:१५ चे दरम्यान दूध टँकरवरील (क्र. एमएच १६अ ८५५६) चालकाने सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील मुळा कारखाना गेट समोर हॉटेल नागेशजवळ कुबड्यावर पायी जात असलेल्या संतोष जयराम बानकर (वय ३५, रा. शनिशिंगणापूर) याला धडक दिली.
त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असून, या घटनेबाबत मयताचे नातेवाईक भाऊसाहेब ज्ञानदेव बानकर (वय ४३, रा. शनिशिंगणापूर) यांनी सोनई पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. टँकर चालक रवींद्र राजेंद्र केदार (रा. लोळेगाव, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com