अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- नगर शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने खासदार सुजय विखे यांच्या नगर शहरातील निवासस्थानाचा समोर पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेज बाबत कहा गये वो बिस लाख करोड ?असे विचारत निदर्शने केली.
प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी नगर शहर युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, कर्जत – पारनेर युवक काँग्रेस समन्वयक स्मितल वाबळे,
जामखेड – श्रीगोंदा समन्वयक राहुल उगले, श्रीरामपूर – राहता समन्वयक राजू बोरुडे आदी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या संकल्पनेतून आणि आदेशावरून नगर सह संबंध राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.
निदर्शनाच्या वेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा केल्या. निवडणुकीच्यावेळी देखील मोठी आश्वासन देशातील जनतेला दिली.
वीस लाख कोटी रुपयेचे पॅकेज जाहीर केले. परंतु वीस लाख कोटी पैकी 20 हजार रुपयेसुद्धा सामान्य नागरिकांना मिळाले नाही.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे असणारे खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदींना विचारतो की ते वीस लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर द्या असा जाऊ यावेळी पाटोळे यांनी केंद्र सरकारला विचारला.
स्मितल वाबळे म्हणाले की, कोरोनामुळे या देशातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक आणीबाणी मुळे त्यांच्यावरती मोठे संकट कोसळले आहे.
अशा वेळेला मोदींनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात ते सामान्य जनते पर्यंत न पोहोचल्यामुळे लोकं दयनीय जीवन जगत आहेत. राहुल उगले म्हणाले की, आज ग्रामीण भागातील शेतकरी हा देशोधडीला लागला आहे.
शेतकऱ्याच्या बाजार मालाला कोरोनाच्या संकट काळामध्ये भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतकऱ्याला हमीभाव देण्या संदर्भातील भूमिका यांनी घ्यायला हवी होती.
परंतु ती न घेत फक्त जुमलेबाजी करण्यातच त्यांना धन्यता वाटते. राजू बरुडे म्हणाले की, या देशातील व्यापारी, उद्योगपती हे आज आर्थिक संकटामुळे मोडून पडले आहेत.
त्यामुळे देशामध्ये मोठी बेरोजगारीची स्थिती न भूतो न भविष्यती अशी निर्माण झाली आहे. या सर्व बाबींना केंद्र सरकार जबाबदार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved