अहिल्यानगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, महापालिकेने तातडीने बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या अंगावर कुत्रे सोडण्याचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील नालेगाव, गाडगीळ पटांगण, चितळे रोड, दिल्ली गेट, गांधी मैदान या परिसरामध्ये मोकाट कुत्रे टोळक्याने फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊन त्रस्त झाले आहे. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना रस्त्यावरून फिरणे देखील कठीण झाले आहे. लहान मुलांवर अक्षरशा कुत्र्यांची टोळकी हल्ला करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझ्या पाच वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला … Read more

अहिल्यानगर जिल्हा कृषी क्षेत्रात अन् दुधाच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर- जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया

Ahilyanagar News: अहिल्यानगर- स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्याने तसेच हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना लाभ झाला. अहिल्यानगर जिल्हा, तर कृषी क्षेत्र तसेच दुधासारख्या जोड धंद्यातही राज्यात अग्रेसर आहे. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी शेतीला ऊर्जितावस्थेत नेण्यासाठी अनेक पावले उचलली. परिणामी या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. प्रगतीशील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून अधिकचे … Read more

शनैश्वर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शनीशिंगणापुर येथील श्री शनैश्वर देवस्थानमधील आर्थिक अपहार प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने व कर्मचाऱ्यांनी बनावट ॲपच्या माध्यमातून भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी देवस्थानचे सध्याचे विश्वस्त … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशास वेग! दोन दिवसांत २९५८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ६०८ विद्यार्थ्यांनी संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रे जमा करून आपले प्रवेश निश्चित केले. सोमवारी २३५० आणि मंगळवारचे ६०८ असे एकूण २९५८ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतला आहे. ५२ हजार २३२ विद्यार्थ्यी नोंदणी जिल्ह्यात ४५४ उच्च … Read more

अहिल्यानगरमध्ये १०८ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मांडला ठिय्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर- राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या समस्यांबाबत १३ मे २०२५ रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते. त्यावेळी १०८ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने व संबंधित कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील रुग्णवाहिका चालकांचा काम … Read more

पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, वारी करून माघारी येतांना मात्र कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत वारकऱ्यानं जीवन संपवल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावच्या शिवारात शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय ६२, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.  पांडुरंगाचं दर्शन घेतलं मयत सुखदेव रावे यांचा केस कर्तनाचा व्यवसाय असून ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते. … Read more

अहिल्यानगर महापालिकेने केली २७ कोटींची विक्रमी कर वसली, कर न भरणाऱ्यावर लवकरच कारवाई होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेने एप्रिल ते जून या सर्वसाधारण करावरील सवलत कालावधीत या वर्षी विक्रमी २७ कोटींची वसुली केली आहे. ३९५१८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला आहे. नियमित कर भरून शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या करदात्यांचे महानगरपालिकेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, १ जुलैपासून मालमत्ता करावर २ टक्के दंड म्हणजेच शास्ती आकारणी … Read more

अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी १ कोटी रूपयांची तरतूद, चोंडी विकास आराखड्यासाठी भरीव निधी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (30 जून 2025) उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील विकास आराखड्यासाठी आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. चोंडी येथे 6 मे 2025 … Read more

अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग नकाशे गुगल मॅपवरून तयार होणार! गुगल मॅपवरून सीमारेषा आखण्याचे काम आजपासून सुरू

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, प्रभाग रचनेची प्रक्रिया गतीमान झाली असून, येत्या 24 जुलै 2025 पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार होणार आहे. या प्रक्रियेत गुगल मॅपचा वापर करून प्रभागांचे नकाशे तयार केले जाणार असून, जनगणना आणि प्रगणक … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाने दाखल केलेला १ कोटी रूपयांचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला 

Ahilyanagar News: राहुरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी टाकळीमिया (ता. राहुरी) येथील बाळासाहेब जाधव यांच्याविरुद्ध दाखल केलेला एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बाळासाहेब जाधव यांनी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि कुलसचिव सोपान कासार यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये आरोग्य केंद्र उभारण्यास मंजूरी, मात्र महापालिकेला आरोग्य केंद्र बांधण्यासाठी जागाच मिळेना, तीन केंद्र रखडली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १८ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १३ आरोग्य केंद्र सुरू झाली असून, अन्य तीन आरोग्य वर्धिनी केंद्रांना अद्यापि जागा मिळालेली नाही. महापालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे. जागा मिळाल्यास तिथे तत्काळ फॅब्रिकेटेड इमारत उभी करून आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या आणि मध्यमवर्गी … Read more

तरूण पोरांची लग्न होत नसल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर झाला मोठा परिणाम, शाळांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विवाहयोग्य तरुण-तरुणींची लग्ने रखडल्याने एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लग्नासाठी योग्य वयात आल्यावर मुली न मिळाल्याने मुलांची लग्ने होत नाहीत, या गोष्टीचा थेट परिणाम आता प्राथमिक शाळांच्या पटसंख्येवर होऊ लागला आहे. पहिलीत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस दिवस घटू लागली असून, शिक्षण क्षेत्रातही आता … Read more

गणेश भांड यांचा शिवसेना मध्ये प्रवेश ! विखे पाटलांचे समर्थक थेट शिंदे गटात…

देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी रविवारी रात्री शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.गणेश भांड हे विखे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २०९५ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४५८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला. यापूर्वी टोमॅटोचे भाव २५०० पर्यंत गेले होते. परंतु आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण होत आहे. वांगे, दोडके, कारल्याच्या भावात वाढ … Read more

अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोषण आहारात मोठा घोटाळा, संभाजी ब्रिगेडने केला भ्रष्टाचाराचा भांडाफोड!

Ahilyanagar News: श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पोषण आहारातील तांदळाच्या साठ्यात असलेली तफावत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणत शाळेच्या भ्रष्टकारभाराचा भांडाफोड केला. शिक्षण विभागातील पोषण आहार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळेच्या पोषण आहाराची तपासणी केली असता, अनेक गंभीर बाबी समोर येत शाळेतील तांदळाचा रेकॉर्डवरील तपशील आणि उपलब्ध साठा यात तब्बल २ हजार ३८५ किलोची तफावत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, पहिल्याच दिवशी २३५० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे २३५० विद्यार्थ्यांचे अकरावीसाठी विविध कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेशसाठी नोंदणी झालेल्या ४५४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेले ६१ हजार ४१२ विद्यार्थी … Read more

अहिल्यानगरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ६८ हजार नवमतदार वाढले, ‘या’ तालुक्यात वाढले सर्वाधिक मतदार; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर आठ महिन्यांत मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकूण ६८,५८५ नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः युवा आणि महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. जिल्हा … Read more

डेंग्यूमुक्त अहिल्यानगर शहरासाठी महानगरपालिकेचे अभियान, कोरडा दिवस पाळण्याचे आयुक्त यशवंत डांगे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेने डेंग्यूमुक्त शहरासाठी सुरू केलेल्या अभियानाच्या तिसऱ्या आठवड्यात कोठला परिसरातील कोंड्यामामा चौकात तपासणी मोहीम राबवण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाक्या, हौद आणि इतर साठ्यांची तपासणी करून त्यात ॲबेट औषध टाकण्यात आले. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आणि त्यांची प्रजनन साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन … Read more