हुंडा घेणारा नवरदेव कळवा, अन् बक्षिस मिळवा; अहिल्यानगरमधील ‘या’ ग्रामपंचायतीने महिलांच्या हक्कांसाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Ahilyanagar News: नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बुधवारी (दि. ११ जून २०२५) झालेल्या ग्रामसभेत हुंडाबंदीचा ठराव संमत करण्यात आला. यासोबतच हुंडा घेणाऱ्यांविरोधात माहिती देणाऱ्यांना ५,००० रुपये आणि कौटुंबिक हिंसाचाराची पुराव्यासह माहिती देणाऱ्यांना २,१०० रुपये बक्षीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर … Read more

अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील २ दिवस पावसाचा धोका कायम!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने घेतलेली उघडीप बुधवारी (दि. ११ जून २०२५) संपुष्टात आली. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नगर शहर आणि परिसरात हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली आणि काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले.  मे महिन्यातच अवकाळी पावसाने जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस पाडला होता. सध्या … Read more

राहुरीमध्ये लग्नाच्या वरातीत नाचायला चल म्हणल्याच्या कारणावरुन तरूणाला बेदम मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

Ahilyanahgar News: राहुरी- तालुक्यातील पिंप्री वळण गावात एका वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. ६ जून २०२५) रात्री घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या मुळाशी दारूच्या नशेत निर्माण झालेला वाद असल्याचे प्राथमिक माहितीतून … Read more

अकरावी प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी आज होणार जाहीर, ५२ हजार विद्यार्थ्यांनी जिल्हाभरातून केला होता अर्ज

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ५२,२३२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदवले असून, अंतिम गुणवत्ता यादी ११ जून २०२५ रोजी जाहीर होणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत ६१,४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, त्यापैकी प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला प्रवेश प्रक्रियेत … Read more

अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी ४ विशेष रेल्वे, जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी असणार आहे थांबा

Ahilyanagar News: पंढरपूर येथे ६ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्त मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने वारकऱ्यांसाठी चार विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूर आणि मिरज दरम्यान धावतील आणि कोपरगाव, बेलापूर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) यासह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील. या विशेष गाड्या ट्रेन ऑन डिमांड (TOD) योजनेअंतर्गत १.३ पटीने भाडे … Read more

जामखेड तालुक्यातील खर्डा परिसराला वादळी पावसाचा तडाखा; २५ घरे उद्ध्वस्त, फळबागा जमीनदोस्त तर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील खर्डा व परिसरात ९ जून २०२५ रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुस्लाधार पावसाने मोठा हाहाकार उडवला. खर्डा, मोहरी, जातेगाव, दिघोळ, लोणी, जवळा, नान्नज, सातेफळ आणि सोनेगाव या भागात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, ज्यामुळे २० ते २५ घरांचे नुकसान झाले आणि अनेक कुटुंबे बेघर झाली. लिंबोणी, पपई आणि आंबा … Read more

सावकाराने शेतकऱ्यांची बळकावलेली ४ एकर जमीन मिळाली परत, उपनिबंधकांनी खरेदीखत केले रद्द

Ahilyanagar News : पारनेर- निघोज येथील शेतकरी मंगेश वराळ यांची अवैध सावकारीद्वारे बळकावलेली चार एकर शेतजमीन आणि दूध शीतकरण केंद्र पुन्हा त्यांच्या नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे. सावकार रंगनाथ किसनराव वराळ यांनी २०१८ मध्ये मंगेश वराळ यांच्याकडून व्याजाने दिलेल्या कर्जाच्या बदल्यात त्यांची जमीन आणि दूध शीतकरण केंद्र मुलींच्या नावे … Read more

कोपरगाव तालुक्यात शॉर्टसर्किटने सहा एकर ऊस जळून खाक, लाखोंचे नुकसान; शेतकऱ्याचा महावितरणवर गंभीर आरोप

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यातील सावळीविहीर परिसरात मंगळवारी, १० जून २०२५ रोजी दुपारी विद्युत रोहित्रांच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन मोहन रघुनाथ गिरमे आणि माधुरीताई मोहन गिरमे यांच्या सहा एकर ऊस शेती जळून खाक झाली. या घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मोहन गिरमे यांनी यापूर्वी महावितरण कंपनीला चुकीच्या ठिकाणी असलेले रोहित्र हटवण्याची वारंवार विनंती … Read more

अहिल्यानगरमध्ये रिल्स बनवणं तरूणाला पडलं भलतच महागात, जीव जाता जाता वाचला?

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील खटकळी परिसरात १० जून २०२५ रोजी सकाळी एका १७ वर्षीय नेपाळी तरुणाने सोशल मीडियासाठी रील बनवताना गळफासाचा व्हिडीओ शूट केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. प्रकाश भीम बुडा या हॉटेल वेटरने झाडाच्या फांदीला फेटा बांधून रील बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु गळफास बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्याचा मामा मिलन बुडाने तातडीने गाठ … Read more

जामखेड तालुक्यात पावासाचा हाहाकार! घरे पडली, झाडे कोसळली, फळबागा उद्धवस्त; प्रशासनाकडून पंचनामे सुरु

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील खर्डा परिसरात ९ जून २०२५ रोजी रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या घरांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला, तर झाडे उन्मळून पडल्याने शेती आणि मालमत्तेचेही नुकसान झाले. खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनीताई वैजनाथ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या एसपी सोमनाथ घार्गे यांनी केल्या बदल्या

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण बदल घडवत नऊ पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव शहर, श्रीरामपूर तालुका, घारगाव, मिरजगाव आणि खर्डा या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. मंगळवारी, १० जून २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सहा पोलीस … Read more

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचा अजब कारभार, तपासणी न करताच शिक्षेकेच्या नावानं दिलं ‘अनफिट’ असल्याचे प्रमाणपत्र

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्रांशी संबंधित गंभीर अनियमिततेचे प्रकरण समोर आले आहे. शेख गजाला परवीन हसन या शिक्षिकेला प्रत्यक्ष तपासणी न करताच ‘मेडिकली अनफिट’ (वैद्यकीयदृष्ट्या अपात्र) ठरवणारे प्रमाणपत्र जारी केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे शेख यांच्या वडिलोपार्जित जमिनीची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. शेख यांनी याबाबत शासनाकडे तक्रार दाखल … Read more

अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद मुख्यालयात स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार, काम अर्धवट असतांना काढले ३३ लाखांचे बील

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्हा परिषद मुख्यालयातील स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामात ३३ लाख ५४ हजार १२५ रुपयांचे बिल काढून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी २३ मे २०२५ रोजी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. मात्र, २० दिवसांहून … Read more

अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असेलला आरोपी पोलिसांना चकवा देत झाला फरार, दोन पोलिस निलंबित

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयातून खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सुनील लक्ष्मण लोखंडे (वय ५२, रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी, १० जून २०२५ रोजी घडली. या घटनेमुळे स्थानिक पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोखंडे याच्यावर यापूर्वी तत्कालीन … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू उपसा आणि विक्रीसाठी परवाना घ्यायचाय? तर वाळू लिलावासाठी आजची शेवटची तारीख, जाणून घ्या प्रक्रिया!

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  जिल्ह्यातील १२ वाळू पट्ट्यांच्या लिलावासाठी आज (दि. १० जून २०२५) हा शेवटचा दिवस आहे. महसूल मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुधारित वाळू धोरणाला ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने या वाळू पट्ट्यांचे ऑनलाइन लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या, परंतु एकाही ठेकेदाराने यात सहभाग न घेतल्याने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेळ्या वाचवताना शेतकरी गेला वाहून, तीन तासानंतर सापडला मृतदेह

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील उख्खलगाव परिसरात रविवारी (दि. ८ जून २०२५) दुपारी ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे बेद ओढ्याला पूर आला आणि यात भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर (वय ४२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अवघ्या दोन तासांत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले, गावाचा संपर्क तुटला आणि पाझर तलावाचा मातीचा भराव तुटल्याने … Read more

जिल्हा शल्यचिकित्सकांची घाईघाईत बदली, डॉ. चव्हाण यांचे मॅटमध्ये आव्हान, तर दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा दाबण्यासाठी अचानक बदली केल्याची चर्चा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक पदावरुन डॉ. नागोराव चव्हाण यांची अवघ्या सात महिन्यांत मुदतपूर्व बदली झाल्याने प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर खळबळ उडाली आहे. या बदलीला डॉ. चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले आहे. दरम्यान, डॉ. संजय घोगरे यांनी सोमवारी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून हजर होत पुन्हा पदभार स्वीकारला आहे.  या बदली … Read more

पगार मागितला म्हणून हाॅटेल मालकाने आचाऱ्याला केली लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

Ahilyanagar News: राहुरी- एक महिना केलेल्या कामाचा पगार मागितला म्हणून हॉटेल मालकाने आचाऱ्याला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने व काठीने मारहाण केली. राहुरी शहर हद्दीत शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिलोक सिंग (वय ६५, रा. चितोडगड, उत्तराखंड), हल्ली रा. शुभकिर्ती हॉटेल, राहुरी बुद्रुक यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more