Ahmednagar News : अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : मोटारसायकलवरुन चाललेल्या परप्रांतीय कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. विरेंद्र सिंग (वय-२९, हल्ली रा.नगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत कामगाराचे नाव आहे. तो बाबुर्डी घुमट शिवारात असलेल्या विद्यापीठ उपकेंद्रात सुरु असलेल्या कामावर कामगार होता मयत विरेंद्र सिंग हा सोमवारी (दि.४) सायंकाळी … Read more

Ahmednagar City News : अगोदर नगरच्या जनतेला रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्वच्छतागृह समस्यांपासून मुक्त करा…

Ahmednagar City News

Ahmednagar City News : अहमदनगर शहरातील व्यावसायिकांना व्यावसायिक आस्थापना कर लागू करण्यासाठी घेण्यात आलेल्या ठरावाला भाजपच्या वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. या ठरावाला महापालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादीचे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करुन भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.६) मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर ठराव रद्द … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सावकारीबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अवैध सावकारीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे आलेल्या तक्रारीची चौकशी होऊन दोन सावकारांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार अधिकारी शेख अल्ताफ अब्दुलकादर (वय ४१ रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. सचिन आदिनाथ ताठे (रा. ताठे मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) व दत्तात्रय मच्छिंद्र कजवे (रा. बाभुळगाव, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर शहरात राहायचं तरी कसं ? दररोज २५ ते ३० जणांवर मोकाट कुत्र्यांकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व उपनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. लहान मुले व पायी चालणाऱ्या वृद्धांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून, चालल्या वाहनावरही मोकाट कुत्री हल्ला करीत आहेत. तारकपूर परिसरात शाळेतून घरी जात असलेल्या १० वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. याप्रकरणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचे दागिने चोरणारा गजाआड

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारा गजाआड करण्यात आला आहे. मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी (वय ३०, रा. अंबिवली, कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध मोक्का, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे १४ गुन्हे दाखल आहेत. १ डिसेंबर … Read more

११ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता ! अज्ञात व्यक्तीने…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील नेप्ती गावातून एक ११ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे. त्या मुलाला अज्ञात व्यक्तीने त्याच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय कुटुंबियांना असून, याबाबत मुलाच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शनिवारी (दि.२) सकाळी नऊ ते दुपारी … Read more

गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो – गुरुवर्य भास्करगिरी महाराज

जीवनात आनंदाच्या प्राप्तीसाठी गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो, गोधन हे राष्ट्र धन असल्याने जीवनात आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अगोदर गायीची किंकाळी थांबवा. तिला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. तालुक्‍यातील मुरमे (देवगड ) येथील अखंड हरिनाम सोहळ्याची श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज … Read more

गोमाता ही सर्वांची आहे. तिची सेवा करा. गोमातेचा तळतळाट चांगला नाही – भास्करगिरी महाराज

हिंदू धर्म हा विश्‍वाला कुंटुब मानणारा आहे. गोमातेची सेवा हा आपला परमधर्म आहे. गोरक्षा ही राष्ट्ररक्षा मानली जाते. गोसेवकांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. गोहत्याबंदी कायद्याची अंमलबाजवणी करावी. गोसेवकांना सरक्षण द्यावे. गाईनी शेतात थोडे खाल्ले असेल तर त्यामुळे माणसामाणसांत व गावात वाद वाढवू नयेत. मात्र गोसेवकांवर हल्ले करू नयेत. हा प्रश्‍न सामंजस्याने मिटवावा, असे आवाहन देवगड … Read more

MP Sujay Vikhe : खा. विखे यांच्या निधीतून बोल्हेगाव, नागापूरमध्ये ६० लाखांची कामे !

बोल्हेगाव नागापुर भागातील नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत , त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात विविध विकासकामांसाठी आपण नेहमीच विविध पातळ्यावर पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून अनेक प्रश्‍नही मार्गी लागले आहेत. प्रलंबित कामांसाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे ६० लाखांचा निधी … Read more

आगामी निवडणुकीत ‘त्यांचा’ हिशेब चुकता करू ! भाजप नेत्याचे मोनिका राजळेंना आव्हान

पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्यावर साधा फोन करण्याचे सौजन्य मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी यांनी दाखवले नाही, त्यांना पक्षाचे कार्यकर्ते डोईजड झालेत काय ? ज्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी यांना निवडून आणले, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आगामी निवडणुकीत त्यांचा हिशेब करू, त्यांचं काय करायचे हे जनताच ठरवेल, अशा शब्दांत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस अरुण … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न मार्गी ! सावेडीमधील स्मशानभूमीसह ‘ते’ सर्व प्रश्न सुटणार

अहमदनगर शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु आता यातील अनेक समस्यांचे ग्रहण लवकरच सुटेल असे दिसते. याचे कारण म्हणजे नगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न जसे कीजे, सावेडीमधील स्मशानभूमीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी मनपा सरसावली आहे. यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सावेडी स्मशानभूमीच्या जागेचा. मागील अनेक वर्षणापासून याचे भिजत घोंगडे आहे. परंतु आता हा प्रश्न अखेर मार्गी … Read more

Ahmednagar News : ७० ठिकाणी शोध, १५२ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, अन ३ सेकंदांच्या फुटेजवरून चोर ताब्यात, फिरोदियांच्या घरावर दरोडा टाकणारा लाखोंच्या दागिन्यांसह अटकेत

पोलिसांनी ठरवलं तर तर ते सुतावरून स्वर्ग गाठू शकतात असे म्हटले जाते. याची प्रचिती नगर शहरात आली. पोलिसांनी डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल केली असून यासाठी त्यांनी सातत्याने २५ दिवस ७० ठिकाणचे तब्बल १५२ सीसीटीव्ही फुटेज तपासले. अवघ्या ३ सेकंदांच्या फुटेजवरून त्यांनी चोरास जेरबंद केले. त्याच्याकडून ५५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व हिरे, … Read more

लवकरच भिंगारकरांची इच्छापूर्ती ! भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न चार महिन्यात निकाली लागणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराजवळ असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आता अहमदनगर महानगरपालिकेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच भिंगारचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. दरम्यान भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा. अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयामुळे लवकरच भिंगारकरांची महानगरपालिकेत समाविष्ट होण्याची इच्छापूर्ती होणार … Read more

अहमदनगर की बिहार ? भागानगरे खून प्रकरणातील पसार आरोपीचे अपहरण,माळीवाड्यात बेदम मारले,पोलिसांची पळापळ..

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरण राज्यात गाजले. शहरात या खून प्रकरणाने खळबळ उडवून दिली. अवैध धंद्यांची माहिती दिल्याप्रकरणी हा खून झाला असे म्हटले जाते. दरम्यान काल (दि.२) या प्रकरणातील मुख्य आरोपीना मदत करणारा व सध्या फरार असणारा आरोपी संतोष अविनाश सरोदे याचे अपहरण करून त्याला माळीवाड्यात बेदम मारहाण करण्यात … Read more

अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी विश्वास नांगरे पाटलांची किरण काळेंनी मुंबईत घेतली भेट

Ahmednagar News : अहमदनगर मनपा क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी मुंबई येथे नांगरेंची काळे यांनी समक्ष भेट घेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात हाणामारी

सोमठाणे नलवडे येथे अवैध दारु विक्री केल्याप्रकरणी गावचे उपसरपंच आकाश दौंडे यांचा योगेश दौंडे यांच्याशी वाद झाला. त्यानंतर आकाश दौंडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात मारामारी झाली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याप्रकरणी ७ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दौंडे यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर व … Read more

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी काही दिवस बंद झाले होते. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करत सर्व लाभधारक पाझर तलावांसह मढीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विशेष लक्ष घातले असून मुळा धरणावरील या योजनेची तिसरी मोटार देखील आता सुरू केल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा … Read more

राष्ट्रपतींचे ‘असे’ झाले शनिदर्शन ! हॉटेल, दुकानांच्या गैरसोयींपासून तर परदेशी भाविकांना रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहण्यापर्यंत..पहा एक रिपोर्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल (दि.३०) अहमदनगरमध्ये शनिशिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच एक राष्ट्रपती शनी शिंगणापूर याठिकाणी आले आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या दोन तीन तासात अनेकांना त्रासही झाला, दुकाने बंद राहिली. परंतु देशाच्या राष्ट्रपतींच्या संरक्षणार्थ या गोष्टी करणे योग्यच होते असे म्हणावे लागेल. राष्ट्रपतींच्या या … Read more