पुन्हा एकदा शिवसेनेकडून संग्राम जगताप टार्गेट

नगर : निवडणुकीला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी मात्र पक्ष कार्यालायात मात्र खूप धावपळ पाहायला मिळत आहे. प्रचाराचे पॉम्पलेट वितरित करणे , रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून प्रचार करणे आणि महत्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन भेटी घेणे. अहमदनगर मतदारसंघ हा आता ‘हॉट’ बनलाय.  इथे लढत होतेय शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप … Read more

माजी खासदार दिलीप गांधी -उपनेते अनिल राठोड यांचे अखेर मनोमिलन

नगर : जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली. गांधी, राठोड, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या बैठकीत मनमोकळी मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार दिलीप गांधी हे महायुतीचे उमेदवार … Read more

उद्योगाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणार – आ.जगताप

नगर –नगर शहरात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत असताना शहरातील उद्योग व्यवसाय वाढावेत, यासाठी पोषक वातावरण निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. त्यामुळे काही काळ उतरती कळा लागलेल्या नगर शहरातील उद्योग व्यवसायाला आता उभारी येऊ लागली आहे.  उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर … Read more

भिंगारचे सर्व प्रश्न सोडवले जातील – डॉ. नीलम गोऱ्हे

नगर – राज्यभरातील अनेक छावण्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत आवाज उठवला. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचेही ठरले होते. भिंगार येथील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिले. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये झालेल्या प्रचारसभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अंबादास पंधाडे, जिल्हा महिला … Read more

विखेंच सर्जिकल स्टाईक सुरूच, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार मोहरे गळाला लावले !

जिल्ह्यातील तरूणवर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भाजपा – सेनेने सुरू केलेली राजकीय मेगाभरती मात्र अजुनही कायम आहे. चालू आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीचे चार मोहरे युतीने गळाला लावले. दरम्यान, विखेंचे जिल्ह्यात सर्जिकल स्टाईक सुरू असले तरी, अगोदरच हाऊसफुल्ल झालेले भाजप आताच्या जोरदार इनकमिंगमुळे आणखी तुडूंब … Read more

हुंड्याचे 15 हजार रूपये न दिल्याने विवाहितेला जिवंत जाळले

नगर – हुंडयाच्या पैशासाठी घटस्थापनेच्या दिवशीच विवाहित तरूणीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. औषधोपचार घेत असतांना तिचे निधन झाले. या प्रकरणी नवऱ्यासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लग्नामध्ये हुंड्याचे राहिलले पंधरा हजार रूपये दिले नाही म्हणून शुभांगी संदिप नाकाडे, वय २१, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव या विवाहित तरूणीला घटस्थापनेच्या दिवशी शिवीगाळ … Read more

‘त्यांनी’ दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली – आ. जगताप

अहमदनगर : त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या … Read more

शिवसेना प्रत्येकाच्या मनात भिनलेली

नगर :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. चांगला विचार करायचा, हसत – खेळत जीवन जगायचे, अनिल राठोड यांनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तसाच शिवसेनेने सुद्धा कधी तडा जाऊ दिला नाही.  म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे. शिवसेना आज … Read more

पैशांसाठी विवाहितेचा छळ

नगर  – पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पती, सासू-सासरे यांच्यासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अभिजित ऊर्फ इनोक अरविंद मोरे, सासू जॅकलिन अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल, सासरा अरविंद गंगाधर मोरे ऊर्फ मॅन्यूअल दीर अनिमेश अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल व मार्गारेट गांगुड, नणंद सुषमा … Read more

बापानेच केले पोटच्या मुलीशी अश्लिल चाळे

नगर – पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीशी बापानेच अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काटवन खंडोबा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.  पीडित मुलगी व तिचा बाप दोघेच घरी असताना तो अश्लिल चाळे करत असे. हा जाच वाढत चालल्याने मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार !

अहमदनगर :- शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा आहे. महापाैर वाकळे यांनी प्रदेशकडे बोट दाखवत सध्या बाहेर प्रचार सुरू असल्याचे सांगत बोलावल्यास शहरातही सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले.  महापालिकेत राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपचे वाकळे हे … Read more

कामगारांनी दिला वाकळे यांना कष्टाच्या पैश्यातून निवडणुक निधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुका म्हंटले की अमाप खर्च. हा खर्च पेळविण्यासाठी नगर शहर विधानसभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्यासाठी एमआयडीसी मधील कामगारांनी आपल्या कष्टाचे 10 हजार रुपये निवडणुक निधी म्हणून दिला. सर्वसामान्य नागरिक व कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे वाकळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एमआयडीसीतील क्लासिक व्हिल कामगार संघटना, सिटू … Read more

स्टार प्रचारक कन्हैया कुमार गुरुवारी नगरमध्ये

अहमदनगर – शहर विधानसभा मतदार संघतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीचे  उमेदवार भैरवनाथ तुकाराम वाकळे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.17 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचे (जेएनयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष तथा भाकपचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य कन्हैया कुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही … Read more

अ.नगर शहर-जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ मयूर पाटोळे यांच्या गळ्यात

अहमदनगर युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पद हे लोकसभा निवडणुकी पासूनच रिक्त होते खासदार डॉ. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशा नंतर युवक काँग्रेसच्या जिल्हा निरिक्षकानी संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली होती.  यापूर्वी अहमदनगर युवक काँग्रेसच्या शहरजिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक निखिल वारे हे होते जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याने त्यांचेही पद बरखास्त झाले , त्यानंतर आता महाराष्ट्र … Read more

शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

नगर :- शहर मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून तसे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस अधीक्षकांना देण्यात आले, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथावर हल्ला केला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून घोषित करावा, … Read more

सर्वसामान्य जनता हीच शिवसेनेची ताकद : अंबादास पंधाडे

अहमदनगर भगवा या मराठी मातीचा इतिहास आहे. तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा आहे. सवर्सामान्य मावळे ही शिवाजी महाराजांची ताकद होती. शिवसेनेची ताकद ही सर्वसामान्य जनताच आहे. येत्या निवडणुकीत 75 टक्के मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रचार रथावरील चालकास मारहाण

नगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगर शहरात शिवसेना लोकशाही च्या मार्गाने प्रचार करत आहे.परंतु विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. शिवसेनेच्या प्रचारार्थ मुंबईवरून आलेल्या एलईडी रथाचे चालक व त्याच्या साथीदाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहरामध्ये असे कृत्य करत असून, नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून … Read more

नगर मध्ये आरपीआय सेनेच्या अनिल राठोड यांच्या सोबत

नगर :  महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी … Read more