पाच वर्षांत नगर शहराचा बिहार झाला….

अहमदनगर :- गेल्या  ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.   नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा … Read more

अहमदनगर जिल्हयातुन हे ५३ अपक्ष उमेदवार ठरणार डोकेदुखी ?

नगर  – विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या अपक्षांचे आव्हान राहणार आहे. या वेळी तब्बल ५३ अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चार मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. दोन मतदारसंघांत एमआयएम पक्षाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम … Read more

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन

अहमदनगर :- जागतिक मानसिक  स्वास्थ्य दिनाचे औचित्य साधुन सकारत्मक विचारसरणी साठी भव्य मैराथन उपक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व वयोगटातिल लोक या उपक्रमात सहभागी होउ शकतात.मानसिक आजारा विषयी समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. साधारण ताण-तणावापासून निद्रानाश उदासीनता नैराश्य आत्महत्येचे विचार येणे असंबद्ध तर येणे वेडेपणाचे आजार होणे अशा विविध स्वरूपामध्ये समाजामध्ये मानसिक आजारा दिसून येतात. मानसिक … Read more

केडगावचा विकास करून या भागातील दहशत कायमची संपवणार – किरण काळे

नगर : केडगावचा अजूनही विकास झालेला नाही. अनेक वर्षांपूर्वी केडगावचा नगरच्या हद्दीमध्ये समावेश झाला. परंतु योग्य नेतृत्वा अभावी आजही केडगाव मधील पाणी, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधा केडगावकरांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपण स्मार्ट केडगावची निर्मिती करणारा असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी केले आहे. केडगाव मधील प्रचाराचा शुभारंभ करत … Read more

अनिल राठोडांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची तोफ नगर मध्ये  धडाडणार!

अहमदनगर :- शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार व माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ अहमदनगर मध्ये आज (बुधवारी) संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची सभा नंदनवन लॉन्स येथे होणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नगर मध्ये तोफ धडाडणार असून उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणता संदेश देणार याकडे लक्ष लागले आहे. या सभेत ठाकरे काय बोलतात याची नगर वासियांना उत्सुकता … Read more

केडगाव हत्याकांडातील  ‘ते’ राडेबाज पुन्हा रडारवर !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुमारे साडेचार हजार व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या सर्व व्यक्तींकडून एका वर्षांसाठी बॉण्ड लिहून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन हजार व्यक्तींनी बॉण्ड लिहून दिले असून उर्वरित व्यक्तींकडून बॉण्ड लिहून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या … Read more

5 वर्षात विकासाचा पुनश्‍च हरिओम केला तीच गती पुढे ठेवू – आ.संगाम जगताप यांचे आश्‍वासन

नगर – आमदारकीची माझी 5 वर्षाची कारकिर्द जनते समोर आहे. त्यापूर्वीच्या 25 वर्षाच्या काळात नगरचा विकास ठप्प झाला होता. त्याला चालना देण्याचे काम मी गत 5 वर्षात केले. रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आय.टी.पार्क सुरु केले. बालिकाश्रम रोड, केडगाव देवी रोड व कोठी ते सक्कर चौक या प्रशस्त रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले.  शहराच्या प्रत्येक प्रभागात सरासरी 20-25 विकास काम केली आहेत. विकासाचा वेग आता गतीने पुढे  नेऊ. मात्र, त्यासाठी गतवेळे प्रमाणे यंदाही बहुमताने मला विजयी करावे, असे अवाहन … Read more

जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून 116 उमेदवार निवडणूक रिंगणात !

जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत निवडणूक रिंगणात असणार्‍या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 17 उमेदवार नेवासा मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल 14 कोपरगाव, नगर आणि कर्जत-जामखेड 12, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा प्रत्येकी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सर्वात कमी 5 उमेदवार शिर्डी मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात यंदा 53 अपक्ष निवडणूक रिंगणात असून यात अवघ्या दोन महिलांचा समावेश आहे. भाजप पक्षाने दोन महिलांना … Read more

या प्रमुख नेत्यांची निवडणुकीतून माघार  

अहमदनगर :- श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून … Read more

‘हे’ आहेत नगर जिल्ह्यातील कोट्याधीश उमेदवार

नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या दिग्गज उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांकडे आहे. रोहित यांच्याकडे तब्बल ५४ कोटी ७८ लाखाची तर त्याखालोखाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे २४ कोटी ७८ लाखाची संपत्ती आहे.  भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक १७ कोटी ४० लाखांची सपत्ती आहे. गुरुवारी जिल्ह्यातील … Read more

राज्यात दोन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे ;- येत्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या अनेक भागांत तसेच कोकणात व गोव्यात ७ आणि ८ ऑक्टोबर या दोन दिवसांत पाऊस पडेल. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार यंदा थंडीचे आगमन लवकर … Read more

शहराचे आरोग्य धोक्यात, रुग्णालये हाऊसफुल्ल

नगर :- शहरात डासांचा उपद्रव व डेंग्यूसदृश आजाराचा ज्वर वाढला आहे. शहरातील आरोग्य धोक्यात असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली जाते, परंतु डासांचे निर्मूलन करण्यात मनपाला अपयश आले आहे. सभागृह नेते स्वप्नील शिंदे यांच्या परिवारातील दोन सदस्य डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल आहेत. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था असेल, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला … Read more

नगरच्या दोन्ही माजी आमदारांनी शहर विकासाचे विद्रुपीकरण केले !

अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.  तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता … Read more

माझी शेवटची निवडणूक आहे सहकार्य करा – अनिल राठोड

अहमदनगर – विधानसभा निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झड़ लागल्या आहेत. उपनेते अनिल राठोड समर्थक माजी खासदार दिलीप गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी राठोड यांनी भाजपाचे नेते वसंत लोढा याची भेट घेतली. ही माझी शेवटचीच निवडणक आहे, मला सहकार्य करा अशी भावनिक साद त्यांनी घातली. … Read more

#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला … Read more

विखे आणि शिंदेंना मंत्रिपदे मिळतील पण आ.शिवाजी कर्डीलेना नाही!

कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. विखे, शिंदेंना मंत्रिपदे – कर्डिले भाजपचे आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री … Read more

आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन – छिंदम

‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली. ‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या … Read more

अहमदनगर मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर नामुष्की !

अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती. मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन … Read more