अहमदनगर चे राजकारण : बाप शिवसेनेत मुलगा राष्ट्रवादीत !

अहमदनगर – थंडगार पडलेली शिवसेनेची बुलंद तोफ अंबादास पंधाडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अनिल राठोड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच पंधाडे त्यांच्या भेटीसाठी शिवालयात पोहोचले. पंधाडे यांचा मुलगा सारंग हे मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे खास कार्यकर्ते आहेत. नगरच्या राजकारणात ‘बाप इकडं आणि बेटा तिकडं’ असं चित्र यानिमित्ताने दिसून आलं. बाप … Read more

गॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर !

अहमदनगर :- घरगुती सिलेंडरच्या दरात आजपासून ( मंगळवार ) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर नगरमध्ये सिलेंडरच्या दरात ५९८ रुपयांवरून ६११ रुपये भाव … Read more

महिलेस खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

अहमदनगर : महिलेस तिच्या प्लॉटमध्ये येण्यास मज्जाव करून सात-आठ जणांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास प्लॉट खाली करणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील ढवणवस्ती येथे दि.३ जुलै ते २७ सप्टेंबर दरम्यान चार वेळा घडली.. याबाबतची माहिती अशी की, यमुनाबाई राधाकृष्ण सांगळे (वय … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या अडचणीत भर, वंचितकडून किरण काळे यांना उमेदवारी !

अहमदनगर :- आज वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नगर शहर विधानसभा मतदारसंघातून किरण काळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून काळे यांची उमेदवारी … Read more

सोशल मीडियावर प्रचारासाठी पूर्व परवानगी आवश्यक !

अहमदनगर :- राजकीय पक्ष आणि उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून, सोशल मीडियावर प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींना पूर्वप्रमाणन करून घ्यावे लागणार आहे. प्रसारण दिनांकाच्या ३ दिवस आधी ही जाहिरात प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नाही, असे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट … Read more

विधानसभेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा !

मुंबई: भाजप आणि शिवसेनेने एक संयुक्त पत्रक काढून अखेर आज युतीची घोषणा केली आहे. या पत्रकात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष हे महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे फॉर्म्युल्याविषयीचा तपशील हा लवकरच जाहीर करण्यात येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे जरी युती झाली असली तरी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्युला हा गुलदस्त्याच ठेवण्यात आला आहे . या पत्रकावर भाजपचे … Read more

राधाकृष्ण विखेंविरोधात आ. डॉ.सुधीर तांबे निवडणूक लढविणार

शिर्डी : राहाता विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातील असेल, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात आमदार सुधीर तांबे उभे राहणार असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. सुधीर तांबे हे सत्यजीत तांबे यांचे वडील आणि बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातील … Read more

‘लोकरंग मेगामार्ट’तर्फे ‘फ्री होम डिलिव्हरी’; बचत गट व शेतमाल ग्राहकांसाठी उपलब्ध

नगर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला पैशापेक्षा जास्त महत्व आले आहे. हा सामाजिक बदल लक्षात घेऊन आणि अहमदनगर शहरामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून लोकरंग कॉर्पोरेशन संस्थेने ‘फ्री होम डिलिव्हरी’ सेवा सुरू केली आहे. महिला बचत गट व शेतकरी गटांनी उत्पादित केलेला माल आणि ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादित मालासह रोजच्या वापराचा किराणा नगरमधील ग्राहकांना घरपोहोच देण्यात येतो. 9551915050 या … Read more

अखेर अनिल राठोड शिवसेनेचे उमेदवार !

अहमदनगर – अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान अनिल राठोड हे येत्या दोन दिवसात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राठोड यांची लढत राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप यांच्याशी लढत होणार आहे.

साहेबांच्या आदेशाला झुगारणाऱ्या आ. जगताप यांच्या विरोधात पवार कधी का बोलले नाही ?

अहमदनगर :- मी आज सकाळी दिलेल्या राजीनामा काहींच्या जिव्हारी लागला आहे. त्या अस्वस्थतेतूनच त्यांनी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यांच्यावर दबाव आणून आता मी राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारीच नव्हतो, असा खोटा कांगावा सुरु केला आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे. मेहबूब शेख यांची मध्यंतरी पक्षाने युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यावेळी आधीची कार्यकारिणी ही विसर्जित अथवा … Read more

श्रीपाद छिंदम आता विधानसभा निवडणूक लढविणार ?

अहमदनगर: छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्रीपाद छिंदमने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने उमेदवारी अर्ज नेला आहे. श्रीपाद छिंदमला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र छिंदमने नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू, मात्र…

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. जगताप धक्कातंत्र वापरून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यातच जगताप यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता शिल्पा गार्डन येथे पदाधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, हा … Read more

कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप यांच्या पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने नगर राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्न नाही तसेच याबाबत यापूर्वी वेळोवेळी पत्रकार परिषेदत स्पष्ट केले असताना आपल्या उमेदवारीची भीती वाटणारी मंडळीच नाहक आपल्या पक्षप्रवेशाच्या वावड्या उठवित आहेत. आपण आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खरंच 12-0 होणार का ?

नगर जिल्हा हा मोठ्या नेत्यांचा जिल्हा आहे. लोकसभेच्या निवडणुकीअगोदर सुरू झालेली पक्षांतरं अजूनही सुरू आहेत. भारतीय जनता पक्षात जाऊन राज्यात गृहनिर्माणमंत्री झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जिल्ह्यात युतीला 12 आणि दोन्ही काँग्रेसला शून्य अशा जागा मिळणार असल्याचं जाहीर केलं असलं, तरी तसं होणं अशक्य आहे. त्याची कारणं या जिल्ह्यात पाय ओढीचं राजकारण, … Read more

तरुणाईचे मतदान ठरवेल नगर जिल्ह्यातील आमदार !

अहमदनगर :- जिल्ह्यातील राजकारण घराणेशाही पद्धतीचे असून त्याच त्या नेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणातील विविध पदांवर संधी मिळत असते. या नेत्यांचा हक्काच मतदार असल्याचे मानले जाते. विविध माध्यमांतून नेत्यांशी, त्यांच्या संस्थांशी बांधली गेलेली ही मंडळी आपल्या नेत्यांकडे पाहूनच मतदान करीत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे येथील निवडणूक लढविण्याची पद्धत, प्रचाराची पद्धतही त्यानुसार आखलेली होती. अलीकडे … Read more

माऊली संवाद यात्रा उत्साहात !

नगर – काबाडकष्ट करणाऱ्या, स्वतःसाठी न जगणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माऊली साठी त्यांचे प्रश्‍न व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माऊली संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोहोचलो आहे. याचे सर्व श्रेय तुमचे आहे, चांगला विचार करायचं, हसत-खेळत जीवन जगायचं, आदेश भाऊजींनी जसा विश्‍वासाला तडा … Read more

स्वत:च्या बारा वर्षाच्या मुलीसोबत अश्­लील चाळे !

अहमदनगर : स्वत:च्या बारा वर्षाच्या मुलीसोबत अश्­लील चाळे करणाऱ्या विकृत पित्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांत धाव घेत याबाबत फिर्याद दिली.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसात विकृत पित्याविरोधात बालकांचे लैंगिक अपरधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

वाहनचालकांच्या 1537 पाल्यांना तीन हजारांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

अहमदनगर : अहमदनगर व बीड जिल्ह्यातील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी तर्फे गेल्या पाच वर्षापासून चालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत आहे यंदा इयत्ता आठवी ते बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. अशा सुमारे 1537 पाल्यांचा शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला एकूण 47 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आलेशहरातील ओम गार्डन येथे … Read more