आमदार झाल्यापासून विकासाला चालना – आ.संग्राम जगताप

नगर – पहिल्यांदा आमदार झाल्यापासून नगर-कल्याण रस्ता परिसराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. पुढील दोन वर्षांत या परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे नियेाजन केले असल्याची माहिती आमदार अरुण जगताप यांनी दिली. कल्याण रस्ता परिसरातील अनसूयानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते सुरुवात करण्यात … Read more

साथीच्या आजारांमध्ये वाढ, रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली

नगर : शहरातील खासगी, तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. हवामानात झालेला बदल, ढगाळ वातावरण व डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश रुग्णांमध्ये विषाणूजन्य तापाचे प्रमाण आढळून येत आहे. डेंग्यू व मलेरियासह गोचिड तापाचेही रुग्ण आहेत. जिल्ह्यात मागील महिनाभरात डेंग्यूचे सुमारे ४९ रुग्ण आढळून आले आहेत. नगर … Read more

मराठा सोयरीक म्हणजे खात्री व विश्‍वास – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- मराठा सोयरीक ग्रुपने गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करून समाजाचा विश्‍वास संपादन केला आहे. अशोक कुटे सरांनी या कार्यात सातत्य ठेवल्याने हा ग्रुप टिकून राहिला आहे, असे उदगार मराठा सोयरीक ग्रुपच्या 40 व्या मोफत राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी आ. संग्राम जगताप यांनी काढले. अहमदनगर शहरात ’संजोग लॉनमध्ये मोफत अतिभव्य राज्यस्तरीय मराठा वधुवर थेटभेट मेळावा रविवार … Read more

महापौरांच्या गाडीवर कचरा फेकणार !

अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप रॅम्पचे स्थलांतर झाले नसल्याने आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या वाहनांवर कचरा टाकला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिला. मनसेच्या वतीने १९ जुलैला माळीवाडा भागातील शाळेजवळ असलेला … Read more

विकासकामांचा धसका घेत विरोधकांनीच त्यांच्या पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष बदलणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असून जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. ते राष्ट्रवादीत आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जगताप यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा धसका घेत … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३६ कोटींचे अनुदान

नगर: खरीप २०१८ मध्ये दुष्काळामुळे नगर तालुक्यातील शेती पिकाच्या झालेल्या पिक नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३५ कोटी ८७ लाख ६२ हजार ६२५ इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू असून यादीतील काही लाभाथ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खाते क्रमांक दुरूस्त करून संबंधित तलाठी … Read more

थेट नगर-पुणे रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न – खा.डॉ सुजय विखे

‘दौंड रेल्वे स्थानकाला बायपास करणारी नगर-पुणे रेल्वे लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय औद्योगिक विकासासाठी दळणवळण सुविधांचा विस्तार व आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्याला पुणे व औरंगाबाद या दोन्ही महानगरांशी रेल्वेद्वारे जोडले जाणे आवश्यक असून त्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहोत’, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू … Read more

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी शरद पवार नगर मुक्कामी

अहमदनगर: नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून शुक्रवारी (दि.२०) ते नगरला मुक्कामी येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवार (दि.१७) पासून शरद पवार दौऱ्यावर निघणार … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर महिलेकडून शाईफेक !

अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला. शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. अकोले येथे सुगाव शिवारात … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता !

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चितळे रोडवर गळ्यात भगवा पंचा घालून मानाच्या विशाल गणपतीसमोर ढोलवर रिदम धरण्याबरोबरच ते भगवा ध्वज घेऊन देखील नाचले. आमदार जगताप यांचा हा भगवा रिदम नगर शहरातील आगामी विधानसभा निवडणुकीची वेगळी नांदी ठरू शकते. असे राजकीय धुरींचे बोलबाल आहे. आमदार जगताप यांच्या गळ्यातील भगवा पंचा आणि … Read more

स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदनगर :- स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन 11 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शालेय परिसरात श्रमदान केले तेथील विद्यार्थ्यांच्या समवेत आनंदाचा क्षण साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.  … Read more

माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे. निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र … Read more

आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर :- कलात्मक व नाविन्यपूर्ण दागिने हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असून गेली पाच वर्ष परंपरा व आधुनिकता याचा मेळ घालणारे  केएनजे  ज्वेलर्सचे दागिन्याचे प्रदर्शन नगरकरासाठी पर्वणी असल्याचे मत सौ. धनश्री विखे यांनी व्यक्त केले.   केशवलाल नथूभाई ज्वेलर्स (केएनजे ) नाशिक तर्फे चोरडिया परिवार मस्तानी ग्रुप सहकार्याने आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.धनश्री विखे … Read more

फुलांना उत्सवामुळे तेजी

अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही. त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते. मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. … Read more

दारू पिण्यास पैसे न दिल्याने राडा

अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या … Read more

बघायचं नाही, बोलायचं हा नवा मंत्र : अभिषेक कळमकर

अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली. हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या … Read more

नगर जिल्ह्यातील या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर :- काही पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या. बदली झालेले अधिकारी, ठिकाण पुढीलप्रमाणे : गोकूळ औताडे – वाचक उपअधीक्षक कार्यालय शिर्डी, अरुण परदेशी – नगर सायबर ठाणे, पांडुरंग पवार- वाचक पोलिस अधीक्षक कार्यालय, हनुमंतराव गाडे- साई मंदिर सुरक्षा शिर्डी, प्रवीणचंद लोखंडे – आंर्थिक गुन्हे शाखा, दीपक गंधाले – प्रभारी शिर्डी, सुभाष घोये – … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरेच घेणार युतीचा निर्णय

अहमदनगर :- शिवसेना-भाजप युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे घेतील. आम्ही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत तयारी केली आहे. ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांचा अहवाल प्रदेशला पाठवण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी बुधवारी दिली. भाजप इच्छुकांच्या मुलाखती आंबटकर यांनी घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत … Read more