केडगाव हत्याकांडप्रकरणी आ. जगताप व आ. कर्डिले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

नगर : केडगाव हत्याकांड दरम्यान संदीप कोतकरला मोबाईल फोन वापरू दिल्याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. पण त्याच्याशी आ. संग्राम जगताप व आ. शिवाजीराव कर्डिले या दोघांनीही मोबाईलवरुन संपर्क साधल्याचे स्पष्ट झालेले आहे तर मग या आमदारांवर निलंबनाची कारवाई का झाली नाही असा सवाल मयत वसंत ठुबे यांचे बंधू प्रमोद ठुबे यांनी विचारला … Read more

उपनगरात अद्यावत आरोग्य सुविधांची गरज -खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर ;- शहर छपाट्याने वाढत असताना उपनगरात अद्यावत आरोग्य सुविधांची गरज आहे. सर्व तज्ञ डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घेऊन सुरु केलेले लोटस हॉस्पिटलचा लाभ सर्वसामान्यांना होणार असल्याची भावना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. केडगाव येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोटस हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटरचे शुभारंभाप्रसंगी डॉ.विखे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प … Read more

भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या वाहनाचा अपघात

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाच्या बैठकीचे काम आटोपून नगरकडे येत असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या वाहनाचा अपघात नगर – पुणे रोडवरील शिरुर परिसरात झाला. या अपघातात बेरड जखमी झाले असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपाची मुंबई येथे आगामी विधानसभा निवडणूका व भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील … Read more

काँग्रेस व राष्ट्रवादी महिला पदाधिकार्‍यांचे वाद चव्हाट्यावर

अहमदनगर :- मंगल भुजबळ यांच्या फिर्यादीवरुन रेखा जरे व त्यांचा मुलगा रुनाल जरे यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून मारहाण मारहाण केल्याप्रकरणी जरे व भुजबळ यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केल्याने हा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. रेखा जरे यांनी जिल्हा रुग्णालय क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ.सुनिल पोटे यांच्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या … Read more

माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ

अहमदनगर :- हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिक्षिका दीपाली रवींद्रकुमार घुमटकर यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर पती रवींद्रकुमार घुमटकर, सासू संजीवनी तुकाराम घुमटकर, हेमंत तुकाराम घुमटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी छळाचा हा प्रकार घडला आहे. … Read more

पतीला जेलमधून सोडवण्यासाठी पोलिसाकडून शरीर सुखाची मागणी

अहमदनगर :- पतीला जेलमधून सोडवण्यासाठी त्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ एप्रिलला केडगावातील दत्त चौकात घडली होती. याप्रकरणी कोर्टाच्या अादेशानंतर शुक्रवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लवसिंग कतरसिंग चावला (रा. पोलिस कॉलनी, सावेडी) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत महिलेच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न … Read more

नगर शहरातून किरण काळे यांनी दिली मुलाखत,उमेदवारीवर ठोस दावा

अहमदनगर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पक्ष श्रेष्ठींसमोर नगर शहरातून आक्रमकपणे उमेदवारी मागितली. पक्षाचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, माजी खा. देविदास पिंगळे यांच्या समोर काळे यांनी नगर शहरातील पक्षाच्या सद्यस्थितीचा पाढाच वाचला. विद्यमान आ. संग्राम जगताप यांनी आजच्या मुलाखती कडे पाठ फिरवली. त्यांच्या उमेदवारीची मागणी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने … Read more

‘त्या’ ५ महिलांना पकडले जाणून घ्या कारण…

अहमदनगर शहरात काल वेश्या व्यवसाय करणार्यांना काल छापा टाकून महिला व गिऱ्हाईकांना पकडले ते प्रकरण ताजे असतांना आज पुन्हा पोलिसांनी नगर शहरात बस स्टॅन्ड व माळीवाडा परिसरात पुरूषांकडे पाहून खानाखुनी करून अश्लिल हावभाव करणा- या ५ महिलांना पकडले. यामुळे अश्लिल कृत्य करणा-या महिलांना आपले तोंड रूमालाने बांधून पोलिस गाडीत बसण्याची वेळ आली. यावेळी महिला पोलिस … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला आ. जगताप – पिचड यांची गैरहजेरी !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे व अंकुश काकडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी दि. २५ जुलै रोजी घेण्यात आल्या. कर्जत – जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली. तर या मुलाखतीला आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड … Read more

अहमदनगर मध्ये रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक

अहमदनगर :- शहरातील गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून तीन बळी महिलांची सुटका करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या विविध भागात सेक्स रॅकेट सुरू आहेत. गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सेक्स … Read more

भाजप प्रवेश केल्याने विखे पाटील यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात !

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता संघाच्या दक्षेते खाली आहेत. त्यामुळे विखे पाटलांच ‘आगे क्या होता है देखना पडेगा’, अशी खोचक टीका केली आहे. यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा नाकर्तेपणा….शाळे साठी निधी मागायला गेलेल्या दिपाली सय्यद यांना दिले हे उत्तर…

श्रीगोंदा :- शाळेसाठी निधी मागण्यास आलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद सह शिष्टमंडळास पालकमंत्री राम शिंदे यांनी नकार देत स्वताची जबाबदारी नाकारत चक्क दुसरा पर्याय सांगितला. तालुक्यातील शेडगाव येथील शाळेतील वर्ग भरविण्या योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षणाचेधडे गिरविण्याची वेळ आली आहे. इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, या मागणीसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शेडगाव येथील एक … Read more

अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी तब्बल दोन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला. आनंदा रामा दुणगे (२१, राहणार वाडेगव्हाण, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीचा शोध … Read more

मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाच्या तोंडात ओतले विष!

अहमदनगर :- मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाला आणखी एका महिलेच्या मदतीने मारहाण करून तोंडात विष ओतले. नवनागापूर येथील पितळे कॉलनीत 8 जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.22) रात्री उशिरा सासूसह एका महिलेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला . मंगल आव्हाड (रा. पितळे कॉलनी, नागापूर) असे आरोपी सासूबाईचे नाव असून मनिषा … Read more

आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दी सारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत…

संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत. ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला. आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. थोरात यांच्या … Read more

धक्कादायक : पोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी

अहमदनगर :- पोलिस कर्मचाऱ्यानेच युवतीला घरात कोंडून मारहाण करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पोलिस कर्मचारी योगेश धाईंजे व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धाईंजे हा एका महिन्यापासून पीडित युवतीचा पाठपुरावा करत … Read more

चापट का मारली? विचारणाऱ्या वर कोयता, चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

नगर: नगर शहरात कबाड गल्लीत पंचपीर चावडी, माळीवाडा परिसर येथे राहणारे वाहिद मेहबुब शेख उर्फ लाला कुरेशी, वय ३६ यांचा पुतण्या अम्मार याला आरोपींनी लहान मुलाच्या भांडणावरुन चापट मारली. तेव्हा वाहिद शेख उर्फ कुरेशी हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. चापट का मारली? असे विचारल्यावरुन पाच आरोपींनी याचा विषय संपून टाकू, असे म्हणत धारदार चाकू व … Read more

शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको?

अहमदनगर :- बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून १२ जाती एकत्रित करून लढा उभारणीला राज्यात यश मिळत आहे. शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको? ओबीसीमधील ३४६ जातीपैकी फक्त ५-६ जाती राजकारणात प्रवेश करतात. १२ बलुतेदारांच्या माध्यमातून या १२ जाती एकत्रित आल्याचे पाहून राजकारणी आता जागे झाले. तेव्हा आपले अस्तित्व सिद्ध … Read more