केडगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तडीपार गुंडावर खुनी हल्ला

अहमदनगर – तडीपार असतानाही केडगावमध्ये फिरणारा गुंड मनोज कराळे व शिवसेना शिवसेना कार्यकर्ता सुनील सातपुते यांच्यात सोमवारी (दि.1) रात्री हाणामारी झाली. तडीपार कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला केला, असे जखमी कराळे याचे म्हणणे आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ला प्रकरणी … Read more

खा. सुजय विखेंचा जनता दरबार हाऊसफुल्ल

अहमदनगर : जनतेचे प्रश्न व सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेला जनता दरबार अक्षरश: हाऊसफुल्ल झाला होता. व्यक्तिगत अडचणींपासून सार्वजनिक प्रश्न घेऊन आलेल्या युवक, महिला व जेष्ठ नागरिकांची गर्दी डॉ. सुजय विखे पाटील यांना भेटण्यासाठी झाली होती. नागरिकांचे प्रश्न आवधानाने ऐकून, समजून घेत डॉ.विखे आपल्या स्वीय सहायकांना त्याबाबतच्या … Read more

पैशाची मागणी करते म्हणून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकरास अटक

पारनेर :- वारंवार पैशाची मागणी करणार्या आपल्या प्रेयसीचा खुन करुन पसार झालेल्या प्रियकराला मुंबईहुन अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे काल ता.28 रोजी सायंकाळी ही घटना घडली. मात्र गुन्हा दाखल होताच पारनेर पोलिसांनी आरोपी गोविंद सुरेश ढवण रा .कोहकडी ता. पारनेर यास अवघ्या बारा तासात जेरबंद केले. … Read more

भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी

अहमदनगर :- भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात उघडकीस आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरात सिव्हील हडको कॉलनी गणेश चौक, तपोवन रोड साईनगर भागात राहणारी एक तरुण महिला मिस्कीन मळा रोडने मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना तेथे येवून आरोपी प्रशांत प्रभाकर सराईवार, रा. सिव्हील हडको कॉलनी, … Read more

सर्वांना बरोबर घेऊन विकासाची गुढी उभी करायची आहे – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- बोल्हेगाव हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या भागाला विकासकामातून शहरीकरणाचे रूप देण्याचे काम केले. निवडणूका या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. माझ्या गेल्या साडे चार वर्षांत शहरात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर आहे. ज्यांनी विकासकामे केली नाहीत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाचा विकास झाला … Read more

मनसेच्या जिल्हाध्यक्षाचा बंगला फोडून दीड लाखाची चोरी

नगर :- सराफ व्यावसायिक तथा मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी तब्बल दीड लाखाचा ऐवज लांबवला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांचा माणिकनगर येथील चंदन इस्टेटमध्ये चंद्रमोती नावाचा बंगला फोडून चोरट्यांनी फोडला. घरातून साड्या, टीव्ही चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना माणिकनगर परिसरात २२ ते … Read more

राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडून लढू इच्छिणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. चांगले उमेदवार शोधण्यासह ज्यांना स्वतःहून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, अशांचे अर्ज संकलनही सुरू केले आहे. येत्या १ जुलैपर्यंत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात वा जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्षांकडे उमेदवारी मागणीचे अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे पक्षाचे … Read more

मंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- नगरचे पालकमंत्री तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेले प्रा.राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन गैरव्यवहार केला आहे. यामुळे त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे उपचिटणीस यांना देण्यात आले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे … Read more

अहमदनगर सीए शाखेतर्फे योग दिन साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन अहमदनगर सीए शाखा, पतंजली योग समिती व नक्षत्र प्राणायाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र लौन्स, बुरूडगाव रोड येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी ६ ते ८ ह्या वेळेत चाललेल्या योग शिबिरात प्रथम पतंजली योग समितीचे श्री अविनाश ठोकळ यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी पूरक हालचाली, सूर्य नमस्कार व प्राणायामाचे … Read more

खा.सुजय विखेंसह आ.संग्राम जगताप यांनी केला ‘इतका’ खर्च…

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे. यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे. शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार … Read more

बोलोरो आडवी लावून ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर / प्रतिनिधी : नगर – पुणे रोडवरील केडगाव बायपास चौफुला कांदा मार्केट जवळ रविवारी रात्री ११ च्या सुमारास ट्रकला (एम एच 14 एफ 57 ३७ ) बोलोरो( एम एच 17 व्ही ९२४६ ) आडवी लावून ट्रक चालकाला दमदाटी करून स्टील रॉडचा धाक दाखवून अंधारात घेऊन जाऊन त्याच्याकडील ७ हजार रुपये रोख रक्कम व एक … Read more

नगर शहाराच्या विकासासाठी विधानसभेची जागा भाजपाकडे घ्या

अहमदनगर :- गेल्या २५ ते ३० वर्षांपासून नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. पाच वेळा शिवसेनेचे आमदार शहरात निवडून गेले, परंतु शहराचा कुठलाही विकास होऊ शकलेला नाही. नगर शहराच्या पाठीमागून नाशिक, औरंगाबाद, पुणे या शहरांचा झपाट्याने विकास होऊन ती शहरे महानगरे म्हणून पुढे आली आहेत, नगर शहर आजही मागासलेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी शहर विधानसभेची … Read more

स्वप्न भंगल्यामुळे बोराटेंचे मानसिक संतुलन बिघडले

अहमदनगर :- तुम्ही पाहिलेले महापौरपदाचे मुंगेरीलालचे स्वप्न भंगल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून तुम्ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर आरोप करत आहात, अशी टीका नगरसेवक रवींद्र बारस्कर, सतीश शिंदे यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात बारस्कर, शिंदे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका असताना जकात चोर नगरसेवक म्हणून प्रसिध्द होता. तुम्ही माया कशी … Read more

चोरीची फिर्याद देणाराच निघाला खरा आरोपी !

पारनेर :- सुपे रस्त्यावरील कुरियर कंपनीत झालेल्या चोरीची फिर्याद देणाराच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी फिर्यादी किरण कदमसह त्याचा साथीदार प्रशांत शिंदे याला अटक करून त्यांच्याकडून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड, तसेच ८० हजारांच्या वस्तू हस्तगत केल्या. ९ जूनच्या रात्री इॅ कॉम एक्स्प्रेस या गाळयाचे शटर उचकटून लॉकरमधील १ लाख १४ हजारांची रोकड, … Read more

रेपसाठी त्याने वापरलेली मित्राची कार पोलिसांनी घेतली ताब्यात

अहमदनगर :- दिल्लीगेटच्या पार्किंगमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर रेप करण्यासाठी आरोपी शुभम सुडकेने मित्राची कार वापरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.  शहरातील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.  प्रेमसंबंध निर्माण करून गेल्या अडीच वर्षांपासून १७ वर्षांच्या मुलीला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. … Read more

पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी नगरकरांचा अभूतपूर्व उत्साह जिल्ह्यातही विविध ठिकाणी योगदिन उत्साहाने साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नगरकरांनी आणि संपूर्ण जिल्हावासीयांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा संकुलातील  मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील योगदिनाचे कार्यक्रम आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 14 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे … Read more

रेशन दुकान चालक महिलेची छेडछाड

नगर :- शहरातील एका पतसंस्थेच्या रेशन दुकानात एक ४५ वर्षाची महिला काम करत असताना तेथे येवून आरोपी राहुल रतन त्रिभुवन, रा. दिल्ली गेट, सातभाई गल्ली, नगर याने दुकानच्या काऊंटरवर रेशन कार्ड आपटून जोरजोराने आरडाओरड करत माझ्या रेशनकार्डवर शिक्का दाखवा. तुम्ही माझे जाणून बुजून रॉकेल बंद केले, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. दुकान चालक महिलेशी हुज्जत … Read more

विखे परिवार भाजपवासी झाल्याने जि.प अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा

संगमनेर :- विखे परिवार भाजपवासी झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. विखे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या असल्याने जिल्हा परिषद सदस्यत्व आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. नगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाने अध्यक्षपदाची माळ भाजपचे नवे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची … Read more