पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप! नव्वदी गाठलेल्या वृद्ध जोडप्याचा इहलोकीचा प्रवास

अहमदनगर : पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली! नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली! पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच पत्नीने आपला देह ठेवला! इंद्रायणी/त्रिंबक दगडू पाचारणे असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.  नेप्ती, ता. नगर येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक दगडू पाचारणे (वय … Read more

माजी मंत्री अनिल राठोड यांना मंत्रिपद मिळणार ?

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते, नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांचा राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे वृत्त नगर स्वंतत्र या दैनिकाने दिले आहे. या वृत्तात सांगितले आहे कि, राठोड हे सलग चार वेळा नगर शहरातून निवडून आले आहेत. मातोश्री वरून राठोड यांच्या नावाचाही विचार सुरू झाला असून, त्यांच्या समावेशास कोणतीही अडचण … Read more

धक्कादायक : अहमदनगरमध्ये टीकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत असताना तरुणाची हत्या !

शिर्डी- शिर्डी येथे हॉटेल पवनधाममध्ये काही मुले टीकटॉकवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ करत असताना गावठी कट्यातून गोळी झाडून प्रतिक उर्फ भैय्या संतोष वाडेकर यांच्या छातीत गोळी घुसून तो जागीच ठार झाला. डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि अनिल कटके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिर्डीत नाकाबंदी करुन आरोपी सनी पोपट पवार, वय २०, रा. धूलदेव, ता. फलटण, जि. … Read more

…आणि म्हणून सुजय विखेंनी ‘तो’ तालुका घेतला दत्तक !

अहमदनगर :- हक्काचा आमदार नसल्याने आजवर नगर तालुक्यातील अनेक कामे रखडली. पण मी ती उणीव आता जाणवू देणार नाही. लोक गाव दत्तक घेतात. पण मी आता नगर तालुकाच दत्तक घेत आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांना नगर तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत केले.  नगर तालुका टंचाई आढावा बैठक नक्षत्र लॉन या ठिकाणी झाली. यावेळी … Read more

केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु

नगर :- राजकारण स्वत:साठी नव्हे तर जनतेच्या विकास व कल्याणासाठी केले जाते. केडगाव उपनगर विकासापासून वंचित होते. येथील जनतेला सुख-सुविधा निर्माण करुन देणे हे पहिल्यापासून शिवसेनेचे स्वप्न होते. केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. येथील दादागिरी संपुष्टात येऊन, शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे. तर सर्वसामान्य नागरिक भयमुक्तीने वावरत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल … Read more

अनिल राठोड विधानसभेसाठी फायनल !

अहमदनगर :- शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधानसभेसाठी माजी आमदार अनिल राठोड यांच्या उमेदवारीचा एकमुखी ठराव करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांना उमेदवारी देण्याची मागणी सेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे शहराचे भावी आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू … Read more

जातीयवादातून ‘प्रेम’ची हत्त्या- खा. अमर साबळे

अहमदनगर :- क्षुल्लक कारणावरून नव्हे जातीयवादातून प्रेम जगताप ची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाचे खा. अमर साबळे यांनी केला. शहरात रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या प्रेम उर्फ किरण जगताप या तरुणाचा काही समाजकंटकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खा. साबळे यांनी केली … Read more

रन विथ फॅमिली उपक्रमास नगरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद

अहमदनगर  – व्यायामाची आवड निर्माण होऊन संपुर्ण कुटूंबाचे आरोग्य निरोगी व स्वस्थ्य राहण्यासाठी नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रन विथ फॅमिली या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नगरकर उत्सफुर्तपणे धावले. उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे 6 वाजल्यापासूनच बालिकाश्रम रोड येथील महालक्ष्मी उद्यानात बाळगोपालांसह … Read more

संभाजी कदमांकडून आमदारकीची तयारी ?

अहमदनगर : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे शहराचे भावी आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केले आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मागील विधानसभा निवडणूक शिवसेना, भाजप तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढविली होती. या चौरंगी लढतीत राष्ट्रवादी … Read more

रोहित पवारांना कर्जत जामखेड मध्ये कॉंग्रेसकडून ‘नो एंट्री’ !

अहमदनगर :- कर्जत-जामखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी न सोडण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झाला आहे. ह्या जागेवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढण्यास इच्छुक आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पवारांची अडचण होणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच जागा असून शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर व कर्जत-जामखेड अशा या … Read more

आ. संग्राम जगताप यांचा फलक चोरीला !

अहमदनगर :- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेता सुभाष चौकात लावलेला स्वागताचा फलक चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. हा चौक शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचा बालेकिल्ला मानला जात असून आगामी काळात आ. जगताप-उपनेते राठोड यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. आ. संग्राम जगताप यांनी कोतवाली पोलीस … Read more

राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर, मंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण

अहमदनगर :- राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे,तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे संभाव्य मंत्री पदाबाबत ही संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करुन, पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे. … Read more

किरणच्या खूनप्रकरणी दोघांना पुण्यातून अटक

अहमदनगर :- नगर शहरातील बसस्थानकासमोर बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय 26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा. खिस्त गल्ली, नगर) ही अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 29 एप्रिल … Read more

लग्नाला घरच्यांचा विरोध, प्रेमीयुगुलाने घेतला गळफास मुलीचा मृत्यू, मुलावर उपचार

अहमदनगर :- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला, तर मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अवंतिका रघुनाथ दळवी (२१, कडा, ता. आष्टी) असे मृत युवतीचे नाव असून, मुकुंद बाबासाहेब भोजने या तरुणावर उपचार सुरू आहेत. या … Read more

‘प्रेम’च्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त, नगरमध्ये तणाव

अहमदनगर :- किरकोळ कारणातून महिनाभरापूर्वी बसस्थानकासमोर मारहाण करण्यात आलेला तरुण प्रेम जगताप (वय २५, रा. स्टेशन रोड) याचा उपचारादरम्यान मंगळवारी (४ जून) मृत्यू झाला.  प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी , तसेच आरोपीना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास … Read more

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील…

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले. जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. … Read more

विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला !

मुंबई :- राज्याचे विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे . विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधीमंडळात जाऊन विखे – पाटील यांनी राजीनामा दिला. दरम्यान विखे पाटलांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा … Read more

विधानसभेला ईव्हीएम असेल तर विरोधकांनी न लढलेलचं बरं !

अहमदनगर :- विधानसभेला ईव्हीएम असेल तर विरोधकांनी न लढलेलचं बरं अशा आशयाची शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वाचा संजीव भोर यांची पोस्ट – सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मॅनेज करून पकड मजबूत केली आहे. खरे तर या वेळेसच लोकसभेचे इलेक्शन्स बॅलेट पेपरवर व्हायला हवे होते. मात्र विरोधकांच्या अनेक वर्षांच्या सत्तेतील … Read more