अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ‘देश का महात्योहार’ 2030 मतदान केंद्रांवर 18 लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अहमदनगर :- 37-अहमदनगर लोकसभा निवडणूकीच्या तिस-या टप्प्यासाठी आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2019  रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही मतदानाची वेळ असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 2030 मतदान केंद्रावर 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदान प्रक्रियेत … Read more

लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात ‘ड्राय डे’ !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात श्रीरामपूर तालुका परमीट रुम अँड वाईन शॉप ओनर्स सोशल असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. त्यावर पुन्हा झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेऊन संबंधितांच्या … Read more

डॉ. सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार

अहमदनगर :- भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी गप्पांच्या फडात ‘तुमच्याकडे कोण चालणार’ हाच एकमेव प्रश्न चर्चेत आहे. चतूर मतदार कल जाणून घेऊ पाहणाऱ्यांचा अंदाज ओळखून उत्तर देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते हवेत असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत.  … Read more

आमदार शिवाजी कर्डिले कुणाला टोपी घालणार ?

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार, दि. २३ रोजी होणा-या मतदनाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेवटच्या दोन दिवशी पक्षाचेच काम केले की जावई राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे काम केले, यावरच बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहे. नेमकी … Read more

खा . दिलीप गांधी समर्थकांची भूमिका गुलदस्त्यात

अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले. पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. कंठ दाटून … Read more

किंगमेकर असणारे आ. शिवाजीराव कर्डिले द्विधा मन:स्थितीत !

राहुरी – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये वेळोवेळी मीच किंगमेकर म्हणणारे आ. शिवाजीराव कर्डिले हे द्विधा मन:स्थितीत दिसून आले आहे. एकीकडे जावई संग्राम जगताप तर दुसरीकडे आपल्या पक्षाने दिलेले डॉ. सुजय विखे या उमेदवारांपैकी आ. कर्डिले कोणाला मदत करणार हे कोडे मतमोजणीनंतरच उघड होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील … Read more

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या संस्थांची प्रकरणं सरकारनं दाबली

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासंबंधी असलेल्या संस्थांच्या ४० ते ५० प्रकरणांबाबत राज्य व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. मात्र, ही सर्व प्रकरणे दाबवण्यात आली. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. संपत्तीचाही वाद नाही. मी स्वत:च्या पायावर उभा आहे. केवळ राजकारणासाठी ते संस्थांमधील लोकांचा वापर करतात, असा गौप्यफोट राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू डॉ.अशोक विखे यांनी … Read more

खा.दिलीप गांधी म्हणतात पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी १ लाख कोटींचा निधी आणला !

अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे. मात्र … Read more

देशद्रोही लोकांच्या देणग्या घेणारा खासदार हवाय का?

अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा. याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार … Read more

आ.संग्राम जगताप यांना पाठ केलेली इंग्रजी वाक्यही नीट बोलता येईनात

अहमदनगर :- शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आपण लोकसभेत आवाज उठवू. संसदेत तसेच केंद्रीय मंत्र्यांबरोबर बोलताना इंग्रजी बोलावे लागेल. विरोधी राष्ट्रवादी उमेदवाराला पाठ केलेले इंग्रजी चार वाक्य नीट बोलता येत नाही. उमेदवांराची शैक्षणिक तुलना करण्याची गरज आहे, अशी टीका भाजपचे नगर लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांनी केले. सहकारी साखर कारखाने डबघाईला आणून राष्ट्रवादीने खासगी … Read more

निवडणूकीसाठी खर्च करण्यात डॉ.सुजय विखे पहिल्या तर संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर….

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत 45 लाख 34 हजार 515 रुपये खर्च केले असल्याचे निवडणूक आयोगाच्या लेखा टीमने म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी 30 लाख 46 हजार 176 रुपये खर्च केले असल्याचे टीमने नमूद केले. … Read more

…तर सुजय विखे पुढच्या निवडणुकीचा फॉर्मही भरणार नाही

शेवगाव :- उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधी उमेदवाराने इकडचे दौरे सुरू केले. त्यामुळे त्यांना इथले प्रश्न काय माहीत? असा प्रश्न उपस्थित करून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. गुरुवारी सायंकाळी विखे, आमदार मोनिका राजळे यांनी बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. विरोधी उमेदवारांपेक्षा … Read more

विरोधी पक्षनेते कोठे आहेत ?

संगमनेर :-काँग्रेस पक्ष आज भाजप-सेने विरोधात आरपारची लढाई लढत असताना, पक्षाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या लढाईत सर्वस्व झोकून आज पक्षाचे काम करीत आहे. मात्र, अशावेळी विरोधी पक्षनेते कोठे आहेत? आजच्या या संघर्षात त्यांचे योगदान काय? असा सवाल माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. आता विखे यांच्यावरील जनतेचा विश्‍वास संपला आहे. जनतेच्या मनात यांच्या तडजोडीबद्दल तिरस्कार … Read more

भाऊसाहेब वाकचौरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असली, तरी त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणुकीला भाजप-शिवसेना मित्रपक्षांसमवेत सामोरे जात आहे. शिर्डी मतदारसंघ शिवसेनेकडे असून मित्रपक्ष भाजपचे नेते व माजी खासदार वाकचौरे अपक्ष उभे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी … Read more

डॉ सुजय विखेंची उमेदवारी जनतेची

पारनेर :- पवार साहेबांचे ऐकणारे पाहिजेत, म्हणून विखे यांना विरोध करायचा, हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे. विखे हे कधीच आपल्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, हे पवार साहेबांना माहीत असल्याने त्यांनी या निवडणुकीत आपल्याला विरोध करण्याचे धोरण घेतले. त्यांना बस म्हटले की बस व उठ म्हटले की उठणारा खासदार पाहिजे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे … Read more

पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांची भीती

अहमदनगर :- नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे … Read more

सुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा

अहमदनगर : महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची जामखेड येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० एप्रिल रोजी कर्जत येथे तर ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची २० एप्रिल रोजी शेवगांव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे संयोजक प्रसाद ढोकरीकर यांनी दिली. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नगर … Read more

प्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही

अहमदनगर : बाळासाहेब विखे आणि पवार यांचे वैर नव्हते. अलीकडे राजकारणासाठी त्यांच्यातील वादाचा गवगवा केला जात आहे. प्र‌वरा परिसरात या विखे कुटुंबियांची हिटलरशाही चालते.  त्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यांनी सख्या भावाला एवढा त्रास दिला आहे, तर इतरांची काय व्यथा, अशी टीका डॉ. अशोक विखे यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरचे … Read more