सुवेंद्र गांधींचा ‘यु टर्न’ निवडणुकीतून माघार

नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे. पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे. खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर … Read more

‘त्या’फोटोमुळे सुजय विखे नेटीझन्सकडून ट्रोल…व्हायरल फोटोमुळे सुजय विखेंविरोधात नाराजी !

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य व राहूरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शिवाजी गाडे पाटील यांचे मंगळवार दि.२ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. निधनानंतर त्यांचे पार्थिव देह अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या दु:खद प्रसंगी डॉ.विखे पार्थिव देहाच्या अंतिमदर्शन घेण्यासाठी पोहचले. अंतिम दर्शन घेतांना विखे यांनी हार अर्पण करतांना काढलेला फोटो सर्वत्र व्हायरलं झाला आहे. श्रद्धांजली देतांना … Read more

…त्यांचे नाव ‘सु’जयऐवजी ‘कु’जय ठेवायला हवे होते !

अहमदनगर :- सरकारने पाच वर्षे खोटी आश्वासने देत सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली. ज्यांना जनतेने चौकीदार केले त्यांच्या डोळ्या देखत मल्ल्या आणि निरव मोदी पळून गेले. पाच वर्षांत लोकांच्या खात्यात पंधरा लाख, तर दूरच साधे पंधरा पैसे देखील जमा झाले नाहीत. एवढेच नाही, तर मोदी सरकारने चौकीदाराचे नाव देखील बदनाम केले, अशी टीका विधान परिषदेचे … Read more

आमदार संग्राम जगताप आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ८ कोटी ५१ लाख ५३ हजार, तर त्यांची पत्नी शीतल यांच्याकडे ९३ लाख ४३ हजार रुपयांची संपत्ती आहे.  जगताप यांच्यावर २ कोटी ९१ लाखांचे कर्ज असून त्याच्यावर केडगाव हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जगताप यांच्याकडे १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड असून स्टेट … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ !

अहमदनगर :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेस -राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मुहूर्त साधून मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी शहरातून प्रचार रॅली काढली होती, या रॅलीत चोरट्याचा धुमाकूळ दिसून आला.चोरटयांनी रॅलीतील तब्बल २० जणांच्या चैन ,मोबाईल व रोख रक्कमेवर डल्ला मारला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून दोन … Read more

शेतकरी जोडप्याच्या हस्ते आ.संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील पारनेर तालुक्यातील जवळा येथील बबनराव रासकर व अंजनाबाई रासकर शेतकरी जोडप्याच्या हस्ते मुहूर्त साधत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. दरम्यान थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची क्लेरा ब्रूस मैदानावर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस- … Read more

जावयाला सोडून आ.शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत !

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते. दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तीन उमेदवारी भरले. ही निवडणूक … Read more

आ.संग्राम जगतापांच्या प्रचारार्थ आज धनंजय मुंडेंची नगरमध्ये सभा

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे दक्षिणेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व उत्तरेतील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता जुना बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार रॅलीस सुरुवात होईल. नगर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली जाणार असून कलेक्टर कचेरी येथे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत. … Read more

हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या डॉ.सुजय विखेंकडे स्वतःची गाडी नाही !

अहमदनगर :- हेलिकॉप्टरमधून फिरणारे उमेदवार म्हणून ओळख असणारे सुजय विखे यांच्याकडे प्रत्यक्षात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून या वेळी त्यांनी २८ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. डॉ. सुजय विखे हे कोट्यधीश असले तरी त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर एकही गाडी नाही. उमेदवारी अर्ज भरताना … Read more

सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार आहेत. ही सभा सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारच्या मैदानावर होणार आहे. या मैदानाची पोलिस प्रशासनाने पुन्हा पाहणी केली. मोदी यांच्या सभेसाठी झेड प्लस सिक्युरिटी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य असल्याने तेथे सभा घेण्याचे नियोजन … Read more

डॉ.सुजय विखे आहेत ‘इतक्या’ कोटीचे मालक !

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या अर्ज दाखल केला. ते 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत.  तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. विशेष म्हणजे सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. मात्र त्यांच्या पत्नी धनश्री विखेंकडे प्रवरा बँकेचे 26 लाख … Read more

खासदार होवू पहाणाऱ्या सुजय विखेंची उमेदवारी अर्ज भरताना फजिती !

अहमदनगर : भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच फजिती झाल्याचा प्रकार घडला. पहिल्यांदा अर्ज दाखल करताना ऐनवेळी अर्ज पाठीमागेच राहिल्याने सुजय विखे संतापल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आले होते. भाजप चे तीन मंत्री, तीन … Read more

उमेदवारी अर्ज भरताना सुजय विखे पाटील भावूक…

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे पाटील आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विखे भावूक झाले. तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आईवडिलांच्या आठवणीने ते भावूक झाले. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले हेच माझे आईवडील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी उमेवारी अर्ज दाखल केला. दिल्लीगेट पासून पायी रॅली काढून सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. डाॅ.सुजय विखे पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, … Read more

पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात !

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात. मागील ३५ वर्षांत पाचपुते यांनी व साडेचार वर्षांत मी काय केले, हे पाहण्यासाठी संत शेख महमंद महाराज पटांगणात समोरासमोर या. चुकीची कामे सांगितली, तर विधानसभेला मी अर्ज भरणार नाही, असे आमदार राहुल जगताप यांनी रविवारी पिंपळगाव … Read more

शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम जगतापांच्या प्रचारात !

अहमदनगर :- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे काम करीत आहेत. असा दावा नगर तालुका शिवसेनेने रविवारी केला. लोकसभा निवडणुकीवरून राहुरीचे आमदार कर्डिले यांचे नगर तालुका भाजपतील समर्थक व तालुका शिवसेनेत सध्या जुंपली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांच्या प्रचारार्थ भाजप … Read more

पुत्र हट्टापुढे खासदार दिलीप गांधी हतबल…

अहमदनगर :- पुत्राच्या हट्टासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडे पुत्रहट्टापुढे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हतबल झाले आहेत. खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये … Read more

ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये 84 लाख रुपयांची रोकड सापडली !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अहमदनगर पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरू असून चौकशीसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.