आ.संग्राम जगतापांची बदनामी

अहमदनगर :- सोशल मीडियावरील फेसबुक अकाऊंट होल्डर सुजयपर्व, विनायक सोबले आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील फँन्स यांनी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची बदनामी करणारा, चारित्रहनन करणारा मजकूर टाकला असून त्याबाबत निवडणूक आयोगाकडे सीव्हीजल ॲपद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केल्याची माहितीॲड. प्रसन्ना जोशी, नीलेश बांगरे यांनी दिली. चारित्रहनन करणारा मजकूर टाकला असून त्याबाबत निवडणूक आयोगाकडे … Read more

निष्ठावंत भाजप कार्यकर्ते डॉ. सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर.

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.  डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली.  या पार्श्वभूमीवर गांधी यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष … Read more

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले.  जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.  नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: … Read more

सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार !

अहमदनगर :- नगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान आज खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजवर पक्षाशी … Read more

छिंदम बंधूंसह ३५० जण तडीपार !

अहमदनगर :- शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुमारे ३६० जणांवर शहरातून तीन दिवसांसाठी तडीपारीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेना, भाजपचे माजी नगरसेवक, हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व दंगलीतील काही आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, राठोड यांनी तहसीलदारांकडे राजपत्रित अधिकाऱ्यांचे ५० हजारांचे हमीपत्र सादर करुन अटी-शर्तींवर शहरात राहण्याची मुभा मिळवली … Read more

खासदार.दिलीप गांधी उद्या भूमिका जाहीर करणार.

नगर | विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी रविवारी (२४ मार्च) मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र हे सध्या ग्रामीण भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देण्यात मग्न आहेत. खासदार गांधी यांनी शेवटपर्यंत … Read more

डॉ.सुजय विखे पाटील याना भाजपची उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे.अहमदनगर मधून डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप च्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार नंदुरबार – हीना गावितधुळे – सुभाष भामरेरावेर- रक्षा खडसेअकोला – संजय … Read more

गडाखांच्या घराची झाडाझडती निषेधासाठी एकवटले नगरकर

अहमदनगर – नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनिय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर एकवटले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देत चौकशीची मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळी … Read more

अखेर राष्ट्रवादी कडून आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी

अहमदनगर : आ संग्राम जगताप यांना नगर दक्षिण साठी उमेदवारी मिळाल्याचे संकेत आ संग्राम जगताप यांनी स्वतः कार्यकर्त्यांना दिले आहेत. नगर दक्षिण उमेदवारी साठी आ. जगताप पिता पुत्रांमध्ये घोळ सुरु होता. पण आ. संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ठ संकेत दिले आहेत.  त्या नुसार शहरातील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या नुसार आज राष्ट्रवादी युवक … Read more

मनपाची बससेवा लवकरच सुरू होणार

नगर : शहर बससेवा सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाने दीपाली ट्रान्सपोर्टला कार्यारंभ आदेश दिले आहेत. इंदूर येथून लवकरच नवीन बस नगरमध्ये दाखल होणार असून महिनाभरात शहरात पुन्हा एएमटी सेवा सुरू होणार आहे. यशवंत ऑटो या संस्थेमार्फत यापूर्वी शहर बससेवा चालवली जात होती. १६ महिन्यांत थकलेल्या ८० लाखांची मागणी यशवंत ऑटोकडून मनपाकडे करण्यात येत होती. तोडगा न … Read more

महिलेस शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

नगर : रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी महिलेस शिवीगाळ, दमदाटी करत विटा व दगड फेकून मारहाण केली.  ही घटना दौंड रोडवरील विद्यानगर येथे रविवारी घडली. शीतल किरण सोनवणे (ज्ञानदीप कॉलनी, कडा, ता. आष्टी) यांचे दळवी कुटुंबीयांशी रात्री भांडण झाले.  मनात राग धरून जयदीप संताराम दळवी, संदिप संताराम दळवी, चारू जय दळवी, अंबादास गहिले व त्याची … Read more

आमदार संग्राम जगताप अजित पवारांच्या भेटीला

 नगर : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी भवन येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी ही बैठक बोलावली होती. जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले … Read more

हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस – यशवंतराव गडाख

नगर : पन्नास वर्षे मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. या काळात असंख्य आव्हाने व निवडणुकांचा सामना मी केला. जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहिले नाही. अनेक वेळा पोलिस कारवायांचा सामना करावा लागला, पण परवा पोलिसांना ज्या पध्दतीने कारवाई करायला लावली ते अत्यंत क्लेशदायक होते. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याची … Read more

खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

नगर : मोक्का व खून प्रकणातील फरार आरोपी कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केला. लोकेश परशुराम माने (२७, रा. कैकाडी गल्ली, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत.  बारामती शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती, तेव्हापासून आरोपी लोकेश फरार होता.  पुणे … Read more

खा. गांधींसह त्या ६४ जणांचे शस्त्र परवाने रद्द

नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खासदार दिलीप गांधी यांच्यासह ६४ जणांचे शस्त्र जमा करून त्यांची परवाने रद्द केले आहेत.  जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच नेत्यांसह अनेकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तब्बल जिल्ह्यातील ६४ जणांचे शस्त्र परवाने … Read more

वडील प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख – सुजय विखे पाटील.

मुंबई – भाजप प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच, जे काही करशील ते सांभाळून कर असा वडील म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय विखे म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले … Read more

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी उफाळली.

अहमदनगर :- मनपा निवडणुकीपासून चर्चेत असलेली शहर काँग्रेसमधील गटबाजी आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळली आहे. काँग्रेसमधील विखे-थोरात गटाच्या फुटीचा परिणाम म्हणून या गटबाजीकडे पाहिले जात असले तरी या गटबाजीने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. शहर काँग्रेसमधील विखे-थोरात गटांपैकी आता केवळ थोरात गटाचेच समर्थक राहिल्याचे सांगितले जाते. विखे समर्थकांनी सुजय यांच्यासमवेत राहणे पसंत केल्याचेही … Read more

शिवसेना नगरसेवकांचे सेल्फी विथ ‘सुजय’ !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी मुंबईहून नगरला आल्यानंतर आधी शिवसेनेचे शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेतली. राठोड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला असल्याने त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, असे विखेंकडून स्पष्ट करण्यात आले व त्याला राठोडांनीही दुजोरा दिला.  राठोडांच्या घरी गेल्यानंतर डॉ. विखेंना घेऊन राठोड गांधी मैदानाजवळील लक्ष्मीबाई चौकात … Read more