लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या नगर दक्षिणच्या जागवेरुन तिढा कायम असून आता पुन्हा अरुण काका जगताप यांचा नावाची चर्चा सुरु आहे. निवडणूका जाहीर होण्या अगोरदच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नगर दक्षिणच्या जागवेर चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. नगर दक्षिणच्या जागेसाठी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्या … Read more

उड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ !

अहमदनगर :- कार्यारंभ आदेश नसलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज भूमिपूजन झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे,खा. सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,आ संग्राम जगताप,आ.अरुणकाका जगताप,व जिल्ह्यातील इतर सर्वच आमदार अनुपस्थित … Read more

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नगरकरांना उड्डाणपूलाचे ‘गाजर’ !

अहमदनगर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात यापूर्वी तीन वेळा भूमिपूजन झालेल्या नगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा पुन्हा घाट घालण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी शुक्रवार (८ मार्च) चा मुहूर्त शोधला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती खासदार दिलीप … Read more

खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे !

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. देशात फक्त नरेंद्र मोदीच सर्वांचे उमेदवार आहेत. पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी मंगळवारी व्यक्त केला. दानवे यांनी सकाळी खासदार गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. खासदार गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. दानवे … Read more

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त !

अहमदनगर :- शहरातील प्रलंबीत उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या आठडाभरातच या कामाचा शुभारंभ होईल, असे समजते. सरकारी पातळीवरच त्यादृष्टीने हिरवा कंदील देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पातळीवरच हे नियोजन सुरू आहे. शहरातील मोठ्या रहदारीच्या स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपूल गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबीत आहे. केंद्र सरकारच्या निधीतून आता हा उड्डाणपूल होणार असून या कामाचे उदघाटन … Read more

खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन खातेधारकाच्या खात्यातून 12 लाख गायब.

अहमदनगर :- खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन शहर सहकारी बँकेच्या माळीवाडा शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून खात्यातून बारा लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार खातेधारक असलेले कुणाल अ‍ॅण्ड सन्सचे संचालक महेश कचरे यांनी शनिवार दि.2 मार्च रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला केली. शहर बँकेने डॉ.निलेश शेळके यांना दिलेले 17 कोटी रुपयाचे बोगस कर्जप्रकरण … Read more

स्वाती नगरकर यांची नोटरी म्हणून नियुक्ती.

अहमदनगर :- ऍड.स्वाती शाम नगरकर यांची भारत सरकारकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती आजपासून (गुरवार) देण्यात आली आहे. त्यांनी विविध ठिकाणी वकील म्हणून काम पहिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दाखल घेत त्यांना हि नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल विविध मान्यवर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक,व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुजय विखेंसाठी शरद पवारांनी नगरची जागा सोडली !

अहमदनगर :- सुजय विखे यांच्या मिशन लोकसभेतील जागा वाटपाचा घोळ आज मिटला आहे.नगर दक्षिण ह्या जागेवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपला हक्क सोडला असून ही लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने सुजय विखेंचा मार्ग सुकर झाला आहे. सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस नगरची जागा सोडणार !राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे … Read more

शिवसेना पुन्हा सत्तेपासून दूर रहाणार ?

अहमदनगर :- शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापौर निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीच्या बडतर्फ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आता, पुन्हा तीच खेळी स्थायी समिती सभापती निवडणुकीत खेळण्याच्या हालचाली आहेत. या निवडणुकीत जर भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाला तर बडतर्फ गट कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरून वेळप्रसंगी भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे समजते. स्थायी समिती सभापती तसेच महिला-बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी … Read more

तापमानाचा पारा वर चढल्याने उन्हाळ्याची चाहुल.

अहमदनगर :- गारव्यामुळे दिवसा उबदार कपडे आणि रात्री खिडक्या, गॅलरीची दारे बंद करून झोपणाऱ्या घरांमध्ये आता बऱ्याच दिवसांनंतर पंखे सुरू झाले आहेत. नगरमध्ये गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा वर चढल्याने नगरकरांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. रात्रीचाही गारवा गायब झाला असून, सूर्योदयापासूनच उकाडा जाणवतो आहे. . शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३६ … Read more

नगरच्या पोलीस अधीक्षकपदी इशू सिंधू.

अहमदनगर :-  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ह्यांची बदली झाली आहे इशू सिंधू हे नगरचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. ते सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते. नगरचे पोलीस अधीक्षक शर्मा यांची नागपूर येथे पोलिस अधीक्षक CIDम्हणून बदली करण्यात आली आहे.

माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी : डॉ. विखे

अहमदनगर :- जगदगुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे नाठाळांना किती समजून सांगितले तरी त्यांना समजत नाही, अशा वेळेला कठोर भूमिका घेऊनच स्पष्ट बोलूनच त्यांना वठणीवर आणावे लागते. प्रचारादरम्यान आपण सर्वसामान्यांचे कष्टकर्‍यांचे प्रश्न उपस्थित केले. हे काही नाठाळांना रुचले नाही व आपल्याला विरोध करण्यासाठी ही मंडळी आरोप करत आहेत व विघ्न निर्माण करत आहेत. परंतु आपल्याला संघर्षाचे बाळकडू मिळालेले … Read more

मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 स्पर्धेचे ऑडिशन उत्साहात.

अहमदनगर :- महिलांचे सौंदर्य, अदाकारी, कलागुण व बुध्दीमत्तेच्या कसोटीवर आधारलेल्या व मॉडलिंग क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या महिला व युवतींना एक व्यासपिठ निर्माण करुन देण्याच्या हेतूने तसेच सर्वसामान्य महिलांना मॉडलिंग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी पेज थ्री मॉडलिंग इन्स्टिट्यूट व बीयू इव्हेंटच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 चे आयोजन … Read more

किरकोळ कारणातून महिलेस विवस्त्र करुन मारहाण.

अहमदनगर :- शहरात एका महिलेला किरकोळ कारणातून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण झाली. ही घटना भिंगारमधील एका चप्पल दुकानात घडली. याप्रकरणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, स्टेशन रोडवरील अक्षता गाईन भागात राहणारी एक ५० वर्षांची महिला भिंगार येथील वेशीजवळ असलेल्या दीपक भिटोरीया यांच्या चप्पल … Read more

किरकोळ वादातून वडिलांसह सावत्र भावास मारहाण.

अहमदनगर :- किरकोळ वादातून सावत्र आई व सावत्र भावाने वडिलांसह युवकाला लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सारसनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात सुनील रघुनाथ कदम, सोमनाथ सुनील कदम, अमोल सुनील कदम, रुक्मिणी सुनील कदम (सर्व रा. सारसनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत सचिन सुनील … Read more

मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहीतेचा छळ.

अहमदनगर :- पत्नीच्या मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहीतेकडे घटस्फोटाची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी सासरच्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवार दि. १४ रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती जालिंदर निवृत्ती बडे, दीर भास्कर बडे, नंणद कस्तुरा … Read more

फळांचा राजा आंबा बाजारपेठेत दाखल.

अहमदनगर :- फळांचा राजा आंबा नगरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. इतरवर्षांच्या तुलनेत यंदा काहीसे लवकरच आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. मागील काही वर्षांपासूनचा इतिहास पाहता तब्बल २५ वर्षांनंतर यंदा प्रथमच सकाळी धुके पडले नाही. तसेच आंब्यांच्या मोहराच्या काळात मोहरावर रोगराईचा प्रार्दुभाव झाला नाही. त्यामुळे यावर्षी आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघेल असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला … Read more

तर भाजप अल्पमतात… राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचा पाठिंबा काढणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेथे शिवसेना आणि भाजप बरोबर पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केल्या असतील तेथे पाठिंबा काढून घ्या असे आदेश दिले आहेत. मनपात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला असला, तरी सत्तेत सहभाग घेतलेला नाही, पण राष्ट्रवादीने दिलेला आदेश बडतर्फ १८ नगरसेवक पाळून भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा करणार का ? यावर चर्चा सुरू झाली … Read more