आईचा गळा दाबून खून करुन मुलाची आत्महत्या.

अहमदनगर :- आईचा गळा दाबून खून केल्यानंतर २४ वर्षीय मनोरुग्ण मुलाने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. भिंगार येथील लकारगल्लीत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. भिंगार कॅम्प पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. या घटनेने भिंगार परिसरात खळबळ उडाली आहे. नंदा बापू बेंद्रे (वय ४५), राहुल … Read more

न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विद्यालय महा क्रीडा वार्षिक वितरण समारंभ संपन्न.

अहमदनगर :- कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिम्पिक खेळाडू पटू दत्तू भोकनळ व खो खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त व चार्टर्ड अकाउंटंट श्री अशोक जी पितळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा … Read more

७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी पतीचे अपहरण पत्नीची पोलिसांत फिर्याद.

अहमदनगर :- ७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी पतीचे अपहरण करण्यात आले आहे. याबाबत पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. नवनागापूर येथील शिवाजीनगर येथून आरोपीने पतीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे मधुकर सुखदेव दुबे ( रा . शिवाजीनगर ) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. सोनू पराड ( पत्ता माहित नाही ) याने … Read more

विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी आजपासून संपावर

अहमदनगर :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत, विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया युनियन्स अ‍ॅण्ड असोसिशन ऑफ बीएसएनएलच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय संपाला पाठिंबा देत नगर मधील बीएसएनएल अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी बीएसएनएल कार्यालया समोर निदर्शने करुन संप पुकारला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार घोणबाजी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने … Read more

मोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो.

अहमदनगर :- पुलवामातील हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची परवानगी मला देत असाल, तर मी जाण्यास तयार आहे, असे नगर जिल्ह्यातील कुशल महादेव घुले या माजी सैनिकाने म्हटले आहे. सध्या अहमदनगर शहरात वास्तव्यास असणारे घुले यांनी भारतीय सैन्यात 17 वर्षे सेवा केली आहे. पुलवामात झालेल्या हल्ल्याच उत्तर स्फोटकांनीच द्यावे लागेल, तरच पाकिस्तानला समजेल. पाकिस्तानचा … Read more

महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर :- जागेत येण्यास मनाई करून तिघांनी भिंगार येथील ३५ वर्षीय महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. बॅट व लाकडी दांडक्याने बेदम मारहाणही केली. ही घटना पाइपलाइन रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ १४ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता घडली. कौशल्या दगडू तागड या इस्कॉन मंदिराजवळील जागेत गेल्या असता भाऊसाहेब धोंडिबा तागड, मंगेश भाऊसाहेब तागड, परिगाबाई दगडू … Read more

आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज व मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने कापड बाजार येथे आतंकवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. तर पाकिस्तान मुर्दाबाद…, भारत माता की जय…, इन्कलाब जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हाजी मन्सूर शेख, कासमभाई … Read more

निमगाव वाघा येथे सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली

अहमदनगर :- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करुन, या हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत … Read more

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात कॅन्डल मार्च

अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेधार्थ शीख, पंजाबी, सिंधी समाज, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लायन्स प्राईड व जीएनडी ग्रुपच्या तारकपूरच्या वतीने दिल्लीगेट येथून हुतात्मा स्मारक पर्यंन्त कॅन्डल मार्च काढण्यात आला. या रॅलीत आरएसएस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवान, स्नेहालय, पंजाबी सेवा समिती, भारत भारती आदि स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तान … Read more

माजी आ.अनिल राठोड यांना हद्दपारीची नोटीस

अहमदनगर :- दोन वर्षांसाठी आपणास जिल्ह्यातून हद्दपार का करू नये,’ अशी विचारणा करणारी नोटीस माजी आमदार अनिल राठोड यांना उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी बजावली. उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा अहवाल शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात … Read more

45 वर्ष नगरसेवकपदाची धुरा सांभाळणारे नज्जू पैलवानांची पेढेतूला.

अहमदनगर :- नगरपालिका ते महापालिकेत सलग नऊव्यांदा नगरसेवकपदी निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांचा चाँद सुलताना हायस्कुलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अच्युतराव हंगे उपस्थित होते. नज्जू पैलवान यांनी शहरातील नगरपालिका ते महापालिकेत केलेल्या सामाजिक कार्याने आपले प्रभुत्व सिध्द केले. नऊव्यांदा नगरसेवकपदी निवडून येऊन त्यांनी 45 वर्षे शहराच्या … Read more

खा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी.

अहमदनगर :- जिल्ह्याच्या दक्षिण भागात तिव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रश्न सोडवण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरले आहेत. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आता माजी मंत्री शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेसला मिळावी … Read more

तापमान घसरल्याने नगरकर गारठले !

अहमदनगर :- थंडीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या अकरा वर्षांत सर्वात कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. शुक्रवारी नगर शहराचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस होते. तापमान घसरल्याने नगरकर देखील गारठले आहेत. गेल्या अकरा वर्षांत प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून थंडीचा कडाका कमी होतो. मात्र जानेवारी संपून आठ दिवस उलटले, तरी थंडी कमी … Read more

माजी आमदार राठोड यांच्या हद्दीपारीबाबत अंतिम निर्णय लवकरच

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या हद्दपारीसाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालासह पुन्हा नगर प्रांत उज्ज्वला गाडेकर यांच्या कार्यालयास मिळाला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने नगर प्रांत तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव शहर … Read more

महापौरांच्या निवडीला महिना उलटूनही स्थायीसाठी मुहूर्त मिळेना !

अहमदनगर :- अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. काेणतीही करवाढ करायची असेल, तर १९ फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणे बंधनकारक असते. मात्र, अद्याप स्थायी समितीच अस्तित्वात नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. स्थायी समिती सदस्य निवडीला होणारा विलंब सर्वसामान्य नगरकरांच्या पथ्यावर पडणार आहे.स्थायी समितीबरोबरच स्वीकृत सदस्य निवडीचाही विषय प्रलंबित आहे. पहिल्या महासभेतच … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

अहमदनगर :- वैयक्तिक आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वैयक्तिक बदनामी करणे, यासह पोलिसांप्रती अप्रतिची भावना चिथावणे, पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनावर टीका केली होती. … Read more

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर :- घराच्या छताला ओढणीने गळफास घेवून २८ वर्षीय वर्षा गुलाब बाबर (रा. बाबरमळा, बुरुडगावरोड, बुरुडगाव) हिने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ३१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत वर्षा ही न्यू आर्टस कॉमर्स कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत होती. वर्षाचा स्वभाव शांत व प्रेमळ होता. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या … Read more

वृद्ध आईला न सांभाळता मुलासह सुनेकडून मारहाण !

अहमदनगर :- वृद्ध असलेल्या आईला न सांभाळता उलट किरकोळ कारणातून मुलगा व सुनेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत वृद्धेने नगर तालुका पोलिस ठाण्यात मुलगा व सुनेविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे राहणाऱ्या बबई कचरु डोखे (वय ६५) या घरासमोर बसल्या होत्या. त्याचवेळी बबई यांच्या कोंबड्या मुलाच्या घरासमोर गेल्या. … Read more