Kopargaon News : लग्नात परवानगीशिवाय वाजवला बँड ! पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Kopargaon News : कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयासमोर शनिवारी (दि. २४ मे २०२५) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोणतीही परवानगी न घेता बँड वाजवण्याच्या घटनेने स्थानिक पोलिसांना कारवाईसाठी भाग पाडले. या प्रकरणी शहर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणासह शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँड चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत, शिरजगाव (ता. येवला) येथील रहिवासी लक्ष्मण दौलत सोनवणे यांनी … Read more

Ahilyanagar News :दोन गटात हत्याराने हाणामाऱ्या , दोघे गंभीर, अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना…

दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत २ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात बुधवार दि.२७ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नुकतेच कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन … Read more

कोपरगावमधील २.६० कोटींच्या विकासकामांना मान्यता, शहरातील या भागातील कामे होणार पूर्ण!

कोपरगाव- शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतची माहिती खुद्द आ. आशुतोष काळे यांनी दिली. या निधीतून शहरातील रस्ते, गटारे आणि पेव्हर ब्लॉक बसवण्यासारखी अनेक … Read more

अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, आमदार आशुतोष काळे यांची मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी निवड

कोपरगाव- आमदार आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. शासनाने विधान मंडळाच्या वेगवेगळ्या समित्या जाहीर केल्या आणि त्यांचे अध्यक्षही निश्चित केले. यात मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मराठी भाषा समिती ही महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाचं अंग आहे. मराठी भाषेचा विकास व्हावा आणि तिचा योग्य … Read more

सहकारी साखर कारखानदारीला बदल हवा – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी सहकारी साखर कारखानदारीसमोरील आव्हाने आणि बदलत्या काळानुसार सुधारणांची गरज यावर भाष्य केले. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, २००० साली महाराष्ट्रात १२८ सहकारी आणि केवळ ९ खासगी साखर कारखाने होते. गेल्या २५ वर्षांत खासगी कारखान्यांची संख्या झपाट्याने … Read more

१० कोटींचा रस्ता एका पावसाळ्यात उखडला; पैशांचा चक्काचूर की भ्रष्टाचाराचा कहर?

कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील वर्षी तब्बल १० कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, पण अवघ्या एका पावसाळ्यातच त्याची वाताहत झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत, डांबराचा थर उखडला आहे, तर काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे … Read more

बिबट्याला चिरडलं अन् वाहन निघून गेलं ; अपघाताने पुन्हा चर्चेत आला कोपरगाव-येवला रोड

कोपरगाव (जि. अहिल्यानगर): कोपरगाव-येवला रस्त्यावरील खिर्डी गणेश शिवारात गुरुवारी, २० मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या दिसून आला होता. घटनेच्या वेळी बिबट्या भास्कर वस्तीजवळ रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. धडकेनंतर बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना … Read more

कोपरगावच्या विजेचा प्रश्न मार्गी! २.६८ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीअंतर्गत २.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, तसेच नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वीस एकरांवर श्रीराम सृष्टी ! एतिहासिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले!

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना रामायणाच्या महान परंपरेची जाणीव करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ‘श्रीराम सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येऊन … Read more

कोपरगावमध्ये भीषण अपघात! नशेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला

कोपरगाव येथे भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसून मोठा अपघात घडला आहे. या घटनेत सुनंदा साबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर भरधाव … Read more

कामचुकार अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे ; जनता दरबारात आ. काळेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी !

१८ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली नेमणूक झाल्याचे लक्षात घेवून गावकीच्या राजकारणात न पडता लोकांची कामे करा. अन्यथा कुचराई करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशा कडक शब्दात आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. काल सोमवारी येथील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग व शासकीय पशुपैदास केंद्र विभागातील अधिकाऱ्यांसह आ. काळे यांनी प्रथमच … Read more

आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी

११ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच … Read more

इतिहास घडविणाऱ्या पराक्रमी पुरूषांचे वास्तव्य लाभलेल्या कोपरगावातही विकासकामे करा : खा. वाकचौरेंना निवेदन

२९ जानेवारी २०२५ कोपरगाव : सन २०२७ मध्ये नाशिक सिंहस्थाच्या विकास कामात कोपरगावाचाही विकास कृती आराखड्यात समावेश करावा,अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी शनिवारी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेवून दिले.याबाबत सकारात्मकता दाखवून खा.वाकचौरे यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत झावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

Shirdi News : शिर्डीत आणणार मदर डेअरी चा मोठा प्रकल्प !

२१ जानेवारी २०२५ कोपरगाव : “केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष सहकाराचा खरा उद्देश आहे.दूध उत्पादक व सभासद हे खरे दूध संघाचे मालक आहेत.दूध संघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे.उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील,” असे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. कोपरगाव … Read more

कोपरगावच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळयात

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दि. 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे, (वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more