आ. काळेंच्या नियोजनामुळेच मिळाले कोरोनावर नियंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-मागील तीन महिन्यांत रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा कठीण परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर उभारून प्रशासनाला वेळेवर सर्व प्रकारची मदत करून केलेल्या योग्य नियोजनामुळेच तालुक्यात कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविता आले असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. कोपरगावात नुकताच कोरोना योद्ध्यांचा सत्कार … Read more

आज ३७९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६५ हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

घरातून ५० हजारांची रोकड व दागिने लांवबले

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  कोपरगाव तालुक्यात रवंदे येथील सताळी रोड वर असलेल्या थोरात वस्तीवर रात्री दहा वाजे नंतर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून व घरातील ३० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे दागिने, पन्नास हजारांची रोख रक्कम, एक मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी शिवाजी नामदेव थोरात यांनी … Read more

पत्याचा डाव आला अंगलट… एसटीचे चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी ॲानड्युटी पत्ते खेळतानाचा एक व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी आगारप्रमुखांनी चार कर्मचारी निलंबित केले. वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईमध्ये दुजाभाव झालेला दिसून येत आहे. कारण पत्त्याच्या डावात सात ते आठ जण पत्ते खेळताना दिसत असूनही केवळ चौघांवरच कारवाई … Read more

बिले भरूनही विद्युत रोहित्र नाहीच…संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयातच मांडला ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- करोना महामारीच्या काळात महावितरणने भरंसाठी वीजबिलांनी आधीच शेतकऱ्यांची छळवणूक केली आहे. यातच बळीराजाने बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भाजपच्या वतीने कोपरगाव येथे वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी करून कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोपरगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन … Read more

परस्परविरोधी तक्रार, एकीचा विनयभंग तर दुसरीला मारहाण…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- एकतीस वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील दोघांनी महिलेला बळजबरीने ओढून नेऊन तीह विनयभंग केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले या दोघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोपरगावात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोपरगाव तहसील कार्यालय येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार कोपरगावात हे कार्यालय सुरु केले आहे. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती … Read more

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी … Read more

स्मरणात राहील असा विकास करून दाखवणार : आ. आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- लोकप्रितिनिधी येतात व जातात. मात्र कोणत्या लोक प्रतिनिधींनी कोणती कामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदारसंघातील जनतेने ज्या ज्या वेळी सेवा करण्याची संधी दिली, त्या त्यावेळी मतदारसंघाचा विकास झाला. हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील, असा मतदारसंघाचा विकास करून दाखवणार आहे, असे प्रतिपादन आमदार … Read more

पोलीस नाईक सानप लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  वाळूच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यातील (ता.राहाता) पोलीस नाईक २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील तक्रारदाराच्या वाळूच्या वाहनावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक भाऊसाहेब संपत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वार रस्ता ओलांडत असतांना समोरून येणारी मालवाहतूक ट्रकच्या (एमपी ०९ एचजी ७५७९) मागील चाका खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या मालवाहतुक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारसायकलस्वार (एमएच १५ … Read more

हीच तुमची रूग्णसेवा ? जनता भयभीत असतांना लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना दमबाजी करत होते !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- जनता भयभीत असतांना लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी व कोरोना काळात लढणार्‍या यंत्रणेतील अधिकार्‍यांना दमबाजी करत होते. हीच तुमची रूग्णसेवा का? असा सवाल श्री.विवेक कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. कोपरगाव मतदारसंघातील जनता संकटात असतांना त्यांना धीर देणार्‍यातील आम्ही असून त्यांना वार्‍यावर सोडून बालिश असल्यासारखे घरात बसून चंपलपाणी खेळणार्‍यातील निश्‍चितच नाही, … Read more

कोरोना बाधितांची यादी सुद्धा चुकतीय ! चाचणी न करताही यादीमध्ये पत्रकाराचा समावेश…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश मिळाले असल्याचे एकीकडे दाखवले जाते. त्याच बरोबर दुसरीकडे रुग्ण वाढत असल्याचा भास निर्माण केला जातो, आताही बाब उघड झाली. शनिवारी १२ जूनच्या यादीत आरटीपीसीआर झालेल्या रुग्णांच्या यादीत शहरातील एका पत्रकाराच्या नावाचा समावेश आहे. वास्तविक पत्रकार व त्यांच्या बरोबर असणारे ११ डिसेंबरच्या २०२० रोजी … Read more

शेळया- मेंढयाची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- लाॅकडाउन मुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेला लहान जनावरांचा खरेदी विक्री व्यवसाय तसेच कातडी खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने समाजाला आर्थीक फटका असुन हे व्यवसाय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहरातील बक्कर कसाब जमाअत संघटनेच्या वतीने तहसिलदार योगेश चंद्रे यांचे कडे केली आहे. कोपरगाव शहरातील बक्कर … Read more

धक्कादायक ! नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गोदावरी नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर त्याच गावातील आरोपीने जवळच्या काटवनात नेऊन अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरेगाव परिसरातील विवाहित महिला सकाळी धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठी … Read more

गोदावरी नदी पात्रात पोलिसांची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे गोदावरी नदी पात्रात तालुका पोलिसांना धाड टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, व दोन ब्रास वाळू असा 6 लाख रुपये किमतीचा मृद्देमाल जप्त केला असून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे दरम्यान वाळू तस्करी प्रकरणी आरोपी शुभम विश्वनाथ गवारे (रा. मंजूर, कैलास गाढे रा. चासनळी), … Read more

सुरेगावात नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या युवतीची काढली छेड

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- काेपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील युवतीला दमदाटी करून तिची छेड काढून तिच्यावर अितप्रसंग करण्यात आला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १४ मे रोजी रोजी गोदावरी नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती.त्यावेळी तिला एकटी पाहून विजय … Read more

आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more