शेळया- मेंढयाची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- लाॅकडाउन मुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेला लहान जनावरांचा खरेदी विक्री व्यवसाय तसेच कातडी खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने समाजाला आर्थीक फटका असुन हे व्यवसाय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहरातील बक्कर कसाब जमाअत संघटनेच्या वतीने तहसिलदार योगेश चंद्रे यांचे कडे केली आहे.

कोपरगाव शहरातील बक्कर कसाब जमाअत संघटनेच्या वतीने तहसिलदार, कोपरगाव यांना निवेदन देण्यात आले. अल्पसंख्यांक सेलचे खालीकभाई कुरेशी, मुस्लीम विकास कमिटीचे तालुका अध्यक्ष आयुबभाई शेख, फकीरमहमंद पहिलवान,

खाटीक समाजाचे तालुकाध्यक्ष इलीयासभाई खाटीक, खलील शेख यावेळी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, लाॅकडाउन लागू केल्यामुळे सर्व उदयोग व्यवसाय बंद करण्यात आले होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या प्रशासनाची सतर्कता व जनतेने घेतलेल्या काळजीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे. लाॅकडाउन उठविण्यात आले असुन विविध व्यवसायांना सुरूवात झालेली आहे. परंतु लहान जनावरे शेळया मेंढया तसेच कातडी खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद आहे,

त्यामुळे सदरचा व्यवसाय सुरू केल्यास यातील व्यावसायिकांची अडचण दूर होउन त्यांचे जनजीवन पुर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. सध्याच्या आटोक्यात आलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन करून हा व्यवसाय करण्यास आम्ही तयार असल्याने शेळया,

मेंढया व कातडी खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनाही देण्यात आलेले आहे.