गारपिटीचा दणका , तब्बल सात किलोची गार पडली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

सध्या मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः थैमान घातले होते. काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला होता. दरम्यान एक वृत्त हाती आले आहे त्यानुसार एका ठिकाणी तब्बल सात किलोची गार पडली आहे.

शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मागील चार दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. तसेच बुधवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस कोसळत होता. ढगफुटीसदृश्य या पावसाने ओढे-नाले वाहू लागले आहे.

याच दरम्यान वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर अजस्त्र गार आदळली आणि एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोक जाऊन बघतात तर काय परातीएवढी मोठी अजस्त्र गार. ही गार बघताच उचलून त्यांनी परातीत ठेवली तसेच एवढी मोठी गार पडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले, माझ्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात ही अशी मोठी गार मी पहिल्यांदा पाहिली ही गार घराच्या छपरावर पडली असती आणि तर छप्पर फोडून ती गार घरात आली असती, परंतु सुदैवाने सदरची गार पाठीमागे उघड्या परड्यात पत्र्यावर आदळली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सात किलो वजनाची गार
सुमारे सहा ते सात किलो वजनाची बर्फाची लादी असेल एवढ्या आकाराची ही गार होती आणि पाऊस थांबल्यानंतर बराच वेळ ही गार पाहण्यासाठी लोक येत होते. तासाभराने ही गार विरघळून गेली परंतु या गारीची परिसरात चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe