Ahmednagar Politics : कार्यकर्त्यांच्या पैजा जोरात, उमदेवार मात्र देवाच्या दारात

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe vrs lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी नगरमध्ये १३ मे रोजी मतदान पार पडले. चुरशीने झालेल्या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे. नगर मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे समर्थक दावे-प्रतिदावे करत असले तरी सर्वसामान्य मतदारांत पैजा लागल्या आहेत. उमेदवार मात्र कुटुंबासह देवदर्शनाच्या निमित्ताने भक्तीफेरीत आहेत.

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्यात चूरशीने लढत झाली. चुरशीमुळे नक्की कोण निवडून येणार, यावरची चर्चा मतदानानंतर दहा दिवसानंतरही संपायला तयार नाही. ४ जूनला निकाल असून, तोपर्यंत ही चर्चा आणखी जोर धरण्याचीच शक्यता अधिक आहे.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते छातीठोकपणे आपल्याच उमेदवाराच्या विजयाची खात्री देत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहेच, पण सर्वसामान्य मतदारांतही निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. गावागावात कोण निवडून येणार, यावर पैजा लागल्या आहेत. तिकडे उमेदवार मात्र कुटुंबासह देवदर्शनाच्या निमित्ताने भक्तीफेरीत आहेत.

आभारानंतर देवदर्शन
– मतदानानंतर डॉ. विखे यांनी निवडणुकीत मदत केलेल्या भाजपसह महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन आभार मानले.
– लंके यांचे होमग्राउंड असलेल्या पारनेर तालुक्यातील त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर पारनेरमधील त्यांच्या पाठीराख्यांनी आवर्जून प्रसारित केली.

– त्यानंतर डॉ. विखे कुटुंबासह देवदर्शनाला गेले. माहूर येथील दर्शनाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर टाकली. तसेच लंके मोहटादेवी येथे दर्शनासाठी गेले.
– एकीकडे कार्यकर्ते, मतदारांच्या पैजा जोरात असताना उमेदवार मात्र देवाच्या दारात गेलेले दिसत आहे.

४ जूनची प्रतीक्षा
सध्या लंके विखे यांच्या विजयासंदर्भात विविध अंदाज बांधले जात आहेत. विजयाचे फलकही अनेक ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी लावले. त्यामुळे आता सर्वांनाच येत्या ४ जूनची प्रतीक्षा लागलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe