Ahmednagar Politics : आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. निवडणुकींमध्ये तर सोशल मीडियाचे महत्व किती आहे हे आता सर्वानाच कळले आहे. प्रचार देखील सोशल मीडियाने हायटेक झाला आहे. मागील काही निवडणूक व यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर यातही सोशल मीडिया चांगलाच प्रभावी ठरला.
त्यामुळे आता नेते मंडळी देखील सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह झालेत. फॅन फॉलोविंग मध्ये नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके हेच आघाडीवर असल्याचे दिसते. ते सोशल मीडियावर चांगले अॅक्टिव्ह दिसून येतात. त्याचे एक्स, फेसबुक व इन्स्टाग्राम या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे चांगले फॉलोवर्स आहेत.
लंकेनंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. तर शिर्डीचे विद्यमान व माजी खासदार यांचे सोशल मीडियावर सर्वात कमी फॉलोवर्स आहेत. कुणाचे किती फॉलोअर्स आहेत यावर एक नजर टाकुयात..
खा. निलेश लंके
निलेश लंके यांचे फेसबुकवर २ लाख ४६ हजार फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर २ लाख ५५ हजार फॉलोअर्स आहेत. तर एक्स या प्लॅटफॉर्मवर ४१ हजार ३०० फॉलोअर्स आहेत.
माजी खा. सुजय विखे
सुजय विखे यांचे फेसबुकवर १ लाख ७४ हजार फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर १ लाख ४९ हजार फॉलोअर्स आहेत. तर एक्स या प्लॅटफॉर्मवर २७ हजार फॉलोअर्स आहेत.
खा. भाऊसाहेब वाकचौरे
खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचे फेसबुकवर ७ हजार २०० फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर ९ हजार ५०० फॉलोअर्स आहेत. तर एक्स या प्लॅटफॉर्मवर ०० फॉलोअर्स आहेत.
माजी खा. सदाशिव लोखंडे
सदाशिव लोखंडे यांचे फेसबुकवर २० हजार तर इन्स्टावर १२ हजार २०० फॉलोअर्स आहेत. तर एक्स या प्लॅटफॉर्मवर ०० फॉलोअर्स आहेत.
यूट्यूब चॅनल
डॉ. सुजय विखे पाटील या नावाने विखे पाटलांचे यूट्यूब चॅनल आहे. त्यांचे १ हजार ७७ सबस्क्राईबर आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी हे चॅनल सुरु केले होते. तर नीलेश लंके यांचे नीलेश लंके ऑफिशियल या नावाने खासदार लंके यांचे यूट्यूब चॅनल आहे. त्यांचे ७० हजार ४०० सबस्क्राईबर आहेत.