Maharashtra SSC Result : मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. यंदा दहावीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली आहे. दरम्यान या लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दहावीचा निकाल कधी जाहीर होणार अशी विचारणा केली जात होती. आता मात्र या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाची आतुरता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाने निकालाची तारीख फायनल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या सोमवारी अर्थातच 27 मे 2019 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दहावी बोर्डाचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
खरंतर 21 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. तेव्हापासूनच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अखेर दहावीचा निकाल कधी लागणार ? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता मात्र निकालाची तारीख डिक्लेअर झाली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाने 27 मे ला दहावीचा निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे.
खरे तर या आधीच बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असे म्हटले होते. यानुसार आता महाराष्ट्र राज्य बोर्ड दहावीचा निकाल येत्या सोमवारी जाहीर करणार असून त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.
दरम्यान आता आपण बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
या 5 वेबसाईटवर पाहता येणार दहावीचा निकाल
1)https://mahresult.nic.in
2)http://sscresult.mkcl.org
3)https://sscresult.mahahsscboard.in
4) https://results.digilocker.gov.in
5)https://results.targetpublications.org
वर सांगितलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर भेट देऊन विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. जेव्हा दहावीचा निकाल जाहीर होईल म्हणजेच 27 मेला दुपारी एक वाजता निकालाची लिंक या वेबसाईटवर सक्रिय होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर भेट देऊन निकालाच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
या लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या दहावीच्या बोर्डाचा रोल नंबर म्हणजेच आसन क्रमांक आणि आपल्या आईचे नाव टाकायचे आहे. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल स्क्रीनवर दाखवला जाईल. विद्यार्थी स्क्रीनवर दिसत असलेल्या निकालाची प्रिंटआउट देखील घेऊ शकणार आहेत.