पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 3 लाखाची गुंतवणूक करा, मिळणार दीड लाखांचे व्याज !

Tejas B Shelar
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस देखील भारतीय नागरिकांसाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे ऑप्शन्स देत आहे. पोस्ट ऑफिस कडून विविध बचत योजना राबवल्या जात आहेत. पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे.

दरम्यान, आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना एक लाख 35 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.

कोणती आहे ती योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना. या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. कारण की या योजनेचे स्वरूप एफडी योजनेसारखेच आहे. जर तुम्हाला तुमच्याकडील पैसे कुठे गुंतवायचे असतील तर पोस्टाची ही टाईम डिपॉझिट योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर पोस्टकडून चांगले व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिसमध्ये विविध कालावधीसाठी एफडी केली जाऊ शकते. यामध्ये सर्वाधिक व्याज पाच वर्षांच्या एफडीवर मिळत आहे.

जर समजा पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर चार लाख 34 हजार 984 रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच सदर गुंतवणूकदाराला एक लाख 34 हजार 984 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. 5 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

जर समजा याच योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने दोन लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर दोन लाख 89 हजार 990 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 89 हजार 990 रुपये व्याज म्हणून सदर गुंतवणूकदाराला मिळू शकणार आहेत. विशेष म्हणजे पोस्टाच्या एफडीला एक्सटेंड देखील केले जाऊ शकते.

जर तुम्ही पाच वर्षांची एफडी केली असेल आणि तुम्हाला ही एफडी आणखी एकस्टेंड करायची असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या तारखेच्या 18 महिन्यांपूर्वी एफडी एक्सटेन्ड करण्याबाबत पोस्टाला सुचित करावे लागणार आहे.