Epfo Pension: तुम्हाला माहिती आहे का ईपीएफओ एक नाही तर देते 7 प्रकारची पेन्शन! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
epfo pension

Epfo Pension:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही एक महत्त्वाची संघटना असून सरकारी आणि खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांचे एक महत्त्वाचे  नाते आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण कर्मचाऱ्यांचे पेन्शनच्या संबंधातील पैशांचे सगळे नियमन व्यवस्थित पद्धतीने करण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारी ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे असते.

कर्मचारी काम करत असताना जेव्हा प्रॉव्हिडंट फंड साठी त्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला काही रक्कम कापली जाते व हीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन स्वरूपात प्रत्येक महिन्याला मिळत असते. जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पेन्शनचा विचार केला

तर यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत व त्यासाठी असणाऱ्या अटी देखील वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारची पेन्शन मिळू शकते? हे माहीत असणे गरजेचे आहे. एपीएफओ कडून ईपीएफ 195 नियमांतर्गत कर्मचाऱ्यांना सात प्रकारची पेन्शन देते.

 कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना देते सात प्रकारची पेन्शन

1- पूर्व पेन्शन हा पेन्शनचा प्रकार एक महत्त्वपूर्ण असून यामध्ये ईपीएफ खातेदाराने जर पीएफ मध्ये दहा वर्षापासून योगदान दिले असेल आणि भविष्यात ज्या कंपनीमध्ये ईपीएफ अधिनियम लागू नाही अशा कंपनीत काम करत असेल तर त्याला त्याच्या वयाच्या पन्नास वर्षानंतर पेन्शन दिली जाते.

याबद्दल जर कर्मचाऱ्याला 58 वर्षानंतर पेन्शन घ्यायची असेल तर तो  त्याचा वैयक्तिक अधिकार आहे व तो 58 वर्ष पूर्ण आल्यानंतर देखील पेन्शन घेऊ शकतो. 58 वर्षे पूर्ण होण्याआधीच जर संबंधी देखील पेन्शन हवी असेल तर प्रत्येक वर्षाकरिता चार टक्के कपात करून पेन्शन मिळते.

हे जर सोप्या उदाहरणाने समजून घ्यायचे असेल तर एखाद्या कर्मचाऱ्याचे 58 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर जर त्याला दहा हजार रुपयांची पेन्शन मिळणार असेल व  त्याला 57 व्या वर्षापासून पेन्शन हवी असेल तर चार टक्के कपात करून या हिशोबाने चारशे रुपये कापून त्याला 9600 चे पेन्शन मिळेल. अशा पद्धतीने चार टक्क्यांची कपात करून पेन्शन मिळते.

2- अपंगत्व आले तर पेन्शन मिळते समजा काही कारणास्तव एपीएफओ सदस्याला अपंगत्व आले किंवा त्याला नोकरी सोडावी लागली तर त्याला पेन्शनचा लाभ दिला जातो. या प्रकारच्या पेन्शनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला इतकी वर्ष  ईपीएफ सदस्य असावे असे कोणत्याही प्रकारचे अट नाही. फक्त यामध्ये ईपीएफो सदस्याने कमीत कमी एक महिना तरी पीएफमध्ये योगदान दिलेले असणे गरजेचे आहे.

3- पत्नीला किंवा दोन मुलांना पेन्शन दुर्दैवाने जर ईपीएफो सदस्याचा आकस्मिकरित्या मृत्यू झाला तर यामध्ये सदस्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांना पेन्शन मिळते. परंतु सदस्याला जर दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील तर दोन मुलांचे 25 वर्ष वय होईपर्यंत त्या मुलांना पेन्शन दिली जाते  व मोठ्या मुलाचे वय पंचवीस वर्षे झाल्यानंतर त्याचे पेन्शन बंद करून ती तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाला दिली जाते.

महत्वाचे म्हणजे जोपर्यंत सर्व मुले 25 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहते. याकरिता सगळ्यात महत्त्वाचे अट म्हणजे ईपीएफो सदस्याने कमीत कमी एक महिन्याचे योगदान पीएफ खात्यात देणे गरजेचे आहे. या प्रकारच्या पेन्शनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये जर एखादे अपत्य अपंग असेल तर त्याला पूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळते.

4- अनाथ पेन्शन या प्रकारामध्ये ईपीएस 195 अधिनियमांतर्गत जर ईपीएफ सदस्याचा मृत्यू झाला तसेच कर्मचाऱ्याचा जोडीदाराचा देखील मृत्यू झाला असेल तर या दांपत्याच्या दोन मुलांना त्यांचे पंचवीस वर्ष वय पूर्ण होईपर्यंत पेन्शनचा लाभ दिला जातो.

5- नॉमिनेटेड व्यक्तीला पेन्शन समजा एपीएफो सदस्याने एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवलेले असेल असे ज्या व्यक्तीचे नाव सुचवले आहे त्या व्यक्तीला पेन्शन मिळते. संबंधित ईपीएफओ सदस्याचा जोडीदार किंवा मुले हयात नसतील तर अशा प्रकारची पेन्शन लागू होते.

6- आईवडिलांना मिळते पेन्शन समजा एखादा ईपीएफो सदस्य अविवाहित असेल व त्याचा जर दुर्दैवी मृत्यू झाला व अशा प्रकारांमध्ये त्याने कुठल्याही व्यक्तीचे नाव सुचवलेले असेल व ते व्यक्ती देखील हयात नसेल तर अशा स्थितीत पेन्शन च्या वडिलांना पेन्शन दिली जाते. वडील देखील हयात नसतील तर आईला हा लाभ मिळतो.

7- वृद्धत्वानंतर मिळणारी पेन्शन ईपीएफो सदस्य हा गेल्या दहा वर्षापासून खातेधारक असेल आणि त्याच्या वयाची 58 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याला या प्रकारची पेन्शन दिली जाते. या दोन अटी पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यक्तीला लगेच पेन्शनचा लाभ दिला जातो.