आज ४६२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ३०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५७९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील आचारी दिलीप बाबासाहेब सांबारे( वय ४५, रा कनकुरी रोड,शिर्डी)यांचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील निळवंडे शिवारात दिलीप सांबारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला शुक्रवार दिनांक ९जुलै … Read more

जिल्ह्यातील या तालुक्याने कोरोनाला हरवले ! इतकी गावे झाली कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयभीत झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांचा कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाल्याने या गावातील लोक आता मोकळा श्‍वास घेत आहेत. तालुक्यातील ५५ गावांपैकी ३९ गावे कोरोनामुक्त झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ५५ गावे असून ५२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्त होण्याचा संकल्प केला होता. यामधील ३८ ग्रामपंचायती असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात नवा सचिन वाझे निर्माण होण्याच्या आत बरबटलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- महाराष्ट्र पोलिस विभाग सचिन वाझे प्रकरणामुळे चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिस विभागात नवा वाझे निर्माण होण्याच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक अश्वती दोरजे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली. संगमनेर शहर व तालुक्यात अवैध व्यावसायिकांचा … Read more

महसूल मंत्री नामदार थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- भाजपा सरकारने केलेली भरमसाठ पेट्रोल-डिझेल, गॅस ची दरवाढ आणि वाढलेली महागाई या विरोधात अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व फ्रंटलच्या वतीने तालुक्यात सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असून महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात … Read more

म्हणून महिलांनीच तिची केली धुलाई !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- भर दुपारी मद्यधुंद झालेल्या चक्क एक महिलेने तब्बल दोन तास गोंधळ घातला. यावेळी तिने अनेकांना दमदाटी व शिवीगाळ करत दुकानांमधील सामानाची तोडफोड करून पोलिसांनाही शिवीगाळ केली. ही घटना संगमनेर शहरात घडली. शहरातील मेनरोड परिसरातील चावडी येथे असणार्‍या तलाठी कार्यालयासमोर दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेली तीस वर्षे … Read more

चिंताजनक : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढली ! वाचा आजचा आकडा…..

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासुन कमी झालेली रुग्ण संख्या गेल्या चोविस तासांत वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 579 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल … Read more

अरे… अरे ! अन दोन महिन्यातच त्यांचा संसार विस्कटला !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ  उडाली आहे.हि घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात घडली. राणी किरण चंदनशिव असे त्या मृत नवविवाहितेचे नाव आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून ही घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार  सासू , सासरे, … Read more

‘त्या’ चिमुरड्याचा खून : बापावर संशय होता. मात्र,आईच्या नाटकी कृत्यामुळेच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  नेवासे तालुक्यातील वरखेड येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्याप्रकरणाने वेगळे वळण घेतले. आईनेच मुलाचा खून केल्याचा संशय बळावला. सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सीमाला अटक केली. यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे. पोलिसांना चोवीस तासात मुख्य खुन्याचा … Read more

मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील पुणतांबा रोडवर असणाऱ्या डावखर मंगल कार्यालयाच्या समोर, वॉर्डनंबर १, श्रीरामपूर याठिकाणी मोटरसायकल क्रमांक एमएच १७ ८४८५ या मोटारसायकलचे चालक विश्वनाथ गोपीनाथ मापारी, वय ६१, रा. पुणतांबा रोड, पेट्रोल पंपासमोर हे मृत झाले. अधिक माहिती अशी की, मोटर सायकलचा वेग जास्त असल्या कारणाने त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले … Read more

आता कुठे गेला शेतकऱ्यांचा ‘पाणीदार नेता’ ?

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. शेतकरी आधीच कोरोनाच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे. त्यात परत पावसाने दडी मारली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची वाताहात होत असताना जिल्ह्यातील मंत्री मात्र शांत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अक्षरक्ष:वाऱ्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या मंत्र्यांवर तब्बल 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  भाजप नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर जलसंधारणात 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘गडाख मुंबईच्या एसी ऑफिसमध्ये बसून कारभार चालवत असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही. जलसंधारण खात्यात गडाख यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार … Read more

मोदी सरकारचे नवे मंत्रालय सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण … Read more

आज ४८२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ८४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : काय म्हणावे ‘त्या’ आईला ? जिने आपल्याच काळजाच्या तुकड्याला दगडाने ठेचले..!

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- ‘आई’ म्हणजे देवाचं दुसरे रूप. असे म्हणतात की देव स्वत: या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईिवना भिकारी असे … Read more

जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला आहे. दरम्यान मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणीचे निवेदन मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यानंतर पाऊसाने दडी मारली आहे. 15 ते 20 दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके जळू … Read more

जलसंधारणमंत्री गडाख यांनी भ्रष्टाचाराबाबत तात्काळ राजीनामा द्यावा !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जलसंधारण विभागाच्या झालेल्या खात्यामध्ये साडेसहाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या भ्रष्टाचाराची पोलखोल केली व सदर भ्रष्टाचार जनतेसमोर आणला याची जबाबदारी स्वीकारून जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. ते या खात्याचे निष्क्रिय मंत्री असून त्यांचे खात्याकडे लक्ष … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 487 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more