काय सांगता! अन्नदान करणे पडले महागात..?

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- साईबाबांच्या शिर्डी नगरीत अन्नदात्यांनी अन्नदान करताना गर्दी जमवून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याने संबंधितावर कारवाई करण्यात आल्याने अन्नदान करणे चांगलेच महाग पडले आहे. अन्नदान करणारे नायर यांच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिर्डीत वर्षाकाठी मोठ्या संख्येने भाविक साईदरबारी हजेरी लावतात. अनेक साईभक्त भिक्षेकरूंना विविध … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये तब्बल पाऊण लाख कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- नुकतेच लॉकडाऊन उठल्यानंतर नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट सुरू झाले आहे त्यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरदिवशी कांद्याची होणारी आवक हि रेकॉर्डब्रेक ठरू लागली आहे. नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी जवळपास 75 हजार (74 हजार 916) कांदा गोण्यांची आवक झाली. भाव जास्तीत … Read more

मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी वाळू तस्कराच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर ते गोंधवणी रोड येथील पुलाजवळ पोलिसांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर व त्यातील वाळू असा एकूण तीन लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलीस शिपाई नरवडे यांच्या फिर्यादीवरून वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक गंगाधर गोरक्षनाथ सोनवणे (वय 35, रा. … Read more

शिर्डीत एकाची निर्घृण हत्या; नातेवाईकांचा रुग्णालयाबाहेर ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्ह्यातील गुन्हेगारी आता सर्वोच्च शिखर गाठू लागली आहे. खून, चोऱ्या, दरोडे आदी घडत असताना शिर्डीमध्ये एक खून झाल्याची माहिती समोर येते आहे. शिर्डी येथील रहिवासी असलेल्या राजू धिवर (वय 42) या इसमावर मंगळवारी सायंकाळी चार अज्ञात हल्लेखोरांनी अंगाखांद्यावर धारदार शस्राने वार करून गंभीररित्या जखमी केले होते. उपचारादरम्यान धिवर यांचा … Read more

उरलेले पैसे मागितल्याने वृद्ध आजोबांना आरोग्य कर्मचाऱ्याकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स , वार्डबॉय तसेच इतर कर्मचारी हे अहोरात्र काम करत असल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यांना देवमाणूस समजू लागला. मात्र अशातच देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याच्या वागणुकीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे. केसपेपर काढल्यानंतर दहा रुपयातून पाच रुपये परत मागणार्‍या … Read more

नेवाश्यातील त्या हत्येला महिना उलटला मात्र आरोपी अद्यापही फरारच

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- नेवासा तालुक्यातील चांदा येथील एका तरुणाची हत्या होऊन महिना उलटला मात्र अद्यापही आरोपींना अद्यापही अटक नाही. तसेच तालुक्यात गुन्हेगारी वाढू लागली असूनही पोलीस यंत्रणा काहीच करताना दिसत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी यासंदर्भात गृहमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनाही या निवेदनाची प्रत दिली. सविस्तर वृत्त … Read more

वाळूची तस्करी सुसाट सुरु असताना शासकीय घरकुले मात्र वाळूअभावी रखडली

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्हा कोणताही असो पैसे उत्पनाचे स्रोत म्हणून वाळू तस्करी करणारे अनेकजण आतापण पहिले असतील. महसूलच्या नाकावर टिच्चून हे तस्कर वाळू उपसा करतात व आपला व्यवसाय सुरु ठेवतात. मात्र दुसरीकडे वंचितांसाठी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजना वाळूअभावी रखडली असल्याचे चित्र नेवासा तालुक्यात दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मुळा व … Read more

घोडेगावमध्ये अवैध दारूची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलीस पथकाकडून सातत्याने कारवाई सत्र सुरूच आहे. नुकतेच घोडेगाव मध्ये अवैध दारूची विक्री करणार्या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. हि कारवाई अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घोडेगावात अवैध दारूची विक्री होत असल्याच्या वाढत्या … Read more

पाणी टंचाईचे संकट ! थकबाकीअभावी पाणीपुरवठा योजनेची बत्ती गुल

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर योजनेची वीजबिल तब्बल साडेसहा कोटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीसाठी महावितरणने योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याचे योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले. तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना : पावसात मोबाईलवर बोलताना वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील केलवड येथेे वीज अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. केलवड येथील ताई शिवाजी रजपूत (वय 35) असे या मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला घराजवळील शेतात काम करत होती. यावेळी विजा चमकत होत्या. घरात मोबाईल आला म्हणून या महिलेच्या मुलीने पळत जाऊन तिच्याकडे … Read more

त्या पाणी योजनेसाठी ६८.९६ लाखांचा निधी मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटातही तालुक्यातील विविध गावांकरिता सातत्याने निधी मिळवला असून त्यांच्या पाठपुराव्याने ओझर खुर्द येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ६८ लाख ९६ हजार ६७२ रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. इंद्रजित थोरात म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात … Read more

पत्रकार दातीर हत्याप्रकरणी व्यापारी सहआरोपी

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राहूरी येथील  पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात व्यापारी अनिल गावडे यास पोलिसांनी सहआरोपी केले आहे. पत्रकार दातीर आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘या’ पालिकेकडून दुकानांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोपरगाव पालिकेने बुधवारी (ता.३०) शहरातील विविध दुकानांवर दंडात्मक कारवाई करून १४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अवघ्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सकाळी ७ ते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७१ हजार ८१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दोन वर्षांची शैक्षणिक फी माफ करा’

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफीची घोषणा केली. तथापि कोरोनाचा फटका राज्यातील सर्वांनाच बसलेला असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच इतर सर्व विद्यार्थ्यांचे २०२०-२१ व २०२१-२२ या दोन्हीही वर्षांची फी माफी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भातील निवेदनावर … Read more

मारुती मंदिराची दानपेटी फोडून ३० हजार लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नेवासे तालुक्यातील लोहोगाव येथील मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत तुकोबाराय मंदिर, भारती बाबा समाधी परिसरातील दानपेटी मंगळवारी सायंकाळी सात वाजता फोडून दानपेटीतील अंदाजे २५ ते ३० हजारांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. एका खोलीचेही कुलूप तोडून साउंड सिस्टिमचे नुकसान केले. २ कॉडलेस माइक ही चोरट्यांनी लांबवले. सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :  शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  शिर्डी येथील राजगुरू येथील साई संस्थानाचे कर्मचारी कामावरून जात असताना, अचानक चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजेंद्र धिवर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. शिर्डीतील वर्दळीच्या ठिकाणी राजगुरु नगर येथील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 354 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more