केवळ पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून रस्ते, वीज, पाणी याबाबत मतदार संघाचा विकास होऊन आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करीत आहे व जनतेच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे. त्या पाठपुराव्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा … Read more

अनधिकृत रुग्णवाहिका दान करून फसवणूक,आरटीओने नोटीस बजावून मागविला अहवाल!

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- देवळाली प्रवरा नगरपालिका आणि शहराला कालबाह्य झालेल्या दोन अनधिकृत रुग्णवाहिका देऊन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेची व येथील नागरिकांची फसवणूक केली असून मोटार वाहन कायद्यातील तरतुदी नुसार नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचेवर कायदेशीर कारवाई करावी या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूरच्याच्या आर. टी. ओ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या पती पत्नीच्या हत्येचे रहस्य उलगडले ! या कारणामुळे झाली हत्या….

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील चांगले वस्तीमध्ये पती-पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करुन निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. कोर्‍हाळे येथील शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय 55) या … Read more

सोशल मीडियातून ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- राहुरी येथील तरूणाची नेवासा येथील तरूणीबरोबर दोन वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर तरूणाने त्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. नंतर दुसर्‍याच तरूणीबरोबर लग्न केले. त्यामुळे फसवणूक करून बलात्कार झालेल्या नेवासा येथील तरूणीने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय. नेवासा तालुक्यातील एक २१ वर्षीय तरूणी शिक्षण … Read more

मुरूम चोरणाऱ्यांना सोडून अधिकारी ग्रामस्थांवरच संतापले

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सु]मारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून गौण खनिज चोरून नेण्यात आल्याची तक्रार जेऊर हैबती ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसिलदारांकडे करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला. … Read more

तालुकास्तरावर ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करा: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासंदर्भात जे नियोजन केले जात आहे. ते मूर्त स्वरुपात येण्यासाठी तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी तेथील खाजगी हॉस्पिटल्स तसेच स्थानिक इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधित ठिकाणी पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होईल यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिल्या. कोरोनाच्या … Read more

मध्यरात्रीच्या सुमारास ‘ या’ आमदारांचे चाहत्यांकडून जंगी स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- एखाद्या राजकीय नेत्याच्या चाहत्यांसह समर्थकांचं त्या नेत्याप्रती असणारं वेड हे अनेकदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतं. सध्या असंच काहीसं चित्र कोपरगावमध्ये पाहायला मिळालं. राज्यासह देशातील बहुचर्चित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले त्यावेळी इथं त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या चाहत्यांच्या वतीने करण्यात … Read more

कोपरगावकरांना आता अधिक प्रमाणात आरोग्य सुविधा मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोपरगावची लोकसंख्या वाढत आहे. त्यातुलनेत कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयामध्ये केवळ 30 खाटांची सुविधा होती. त्यामुळे वैद्यकीय सेवा देण्यास मर्यादा येत होत्या. यामुळे श्रीरामपूर पाठोपाठ जिल्ह्यातील कोपरगाव येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवाढ करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कोपरगावकरांना आता अधिक प्रमाणात … Read more

महिलांचा विनयभंग करणाऱ्या पेट्रोलपंप चालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पावसाचे पाणी अंगणात साचल्याने त्या पाण्याला वाट काढून देण्यासाठी गेलेल्या महिलांना शिवीगाळ करून त्यान्हा विनयभंग करणाऱ्या पेट्रोलपंप चालकाविरुद्ध गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोपट बारहाते असे पेट्रोलपंप चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने ठिकठिकाणी डबके साचले … Read more

कृषिमंत्री म्हणाले…घोडेगाव कांदा मार्केट आज देशभरात प्रसिद्ध झाले

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  घोडेगाव उपाआवारातील नवीन कांदा मार्केटमधील गळ्यांच्या शुभारंभ प्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे व मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कांद्याचा लिलाव केला. लिलाव केलेल्या कांद्याला सर्वोच्च 2400 रुपये प्रति 100 की भाव मिळाला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले कि, राज्यात सर्वाधिक कांदा आवक घोडेगाव येथे … Read more

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; कळसूबाई शिखरावर पर्यटकांना बंदी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुन्हा पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान कळसूबाई शिखराची समुद्रसपाटीपासून उंची 5400 फूट म्हणजे … Read more

शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करुन द्या: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- खरीप हंगामात शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांनी त्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. अद्यापही संकटाचे ढग बळीराजावर कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या काही भागात मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७१ हजार ४३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

सरकारी जमिनीतून तब्बल 150 ब्रास मुरुमाची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सुमारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून चोरून नेण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या परिसरात घडला आहे. याबाबत ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसीलदारांकडे केली आहे. ग्रामस्थांकडून तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, जेऊर … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील ‘त्या’ कंपनीकडे तब्बल 85 कोटींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात अर्थचक्राला गती मिळावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे काही उद्योजकांकडून तसेच काही कंपन्यांकडून कोट्यवधींच्या रकमा थकीत ठेवण्यात येऊ लागल्या आहेत. असाच काहीसा कोट्यवधींचा थकबाकीचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लि.,कंपनीकडे एकूण 85 कोटी 03 लाख 11 हजार 800 रुपये थकबाकी … Read more

तरुणांनी व्यवसायाकडे वळावे : उदयन गडाख

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तरुणांनी विविध व्यवसायाकडे वळून करीअर निर्माण करावे, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. ते गणेशवाडी ( ता. नेवासे) येथे एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कैलास दरंदले, गणेशवाडीचे सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय लोहकरे, डॉ. माऊली दरदले, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 411 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम