कोपरगावात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिवसेनेचा ५५वा वर्धापन दिन शहर आणि उपनगरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर, तर कुठे कोविड योद्ध्यांचा सन्मान, नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप, … Read more

श्रीरामपूरात पोस्ट कोविड आजार उपचारासाठी रुग्णालय सुरू

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना आजही वेगवेगळे त्रास होत आहेत त्यासाठी आयुर्वेद उपचार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले. श्रीरामपूर आयुर्वेद पोस्ट कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. सतीश भट्टड, डॉ. महेश … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नगर जिल्ह्यातील ‘ या’राज्यमार्गासाठी अडीच कोटी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याकडे मागील काही वर्षापासून … Read more

‘साई संस्थानच्या अध्यक्षपदी अँड . ढाकणे यांची नियुक्ती करा’

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सध्या चढाओढ लागली आहे. या स्पर्धेत केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांची नियुक्ती करण्याची मागणी आता पुढे आली आहे. पाथर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी पक्षाध्यक्ष शरद … Read more

वादळाने भाजीविक्रेत्याच्या गाडीवर झाडाची फांदी पडली मात्र…!

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहक तारेवर झाडाची फांदी पडली. याच झाडाखाली भाजीपाला विकणारे ज्ञानदेव ताजणे यांच्या गाडीवर झाडाची फांदी पडल्यामुळे भाजीपाल्याचे व गाड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने इतर कोणाला दुखापत झाली नाही. लॉकडाऊनपासुन आश्वी बुद्रूक गावातील बाजार बंद झाल्यामुळे तसेच ताजणे मळ्यातील भाजीविक्रेते जास्त असल्यामुळे गावातील … Read more

लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नेवासे शहरात नगरपंचायत मार्फत कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य शक्यतेच्या अनुषंगाने आपण काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच शासनाने यासाठी नगरपंचायतीला उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हायकोर्टात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कार्यालयात वाढदिवस साजरा करणे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील तहसीलदारांच्या अंगलट आला आहे. गेल्यावर्षी त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा धाब्यावर बसवत, चक्क नेवासा तहसील कार्यालयातच दणक्यात वाढदिवस साजरा केला होता. त्याविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस यंत्रणेला तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने देण्यात आली. … Read more

साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळवून या पदावर आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी, अशी एकमुखी मागणी राहाता तालुका काँग्रेसने केली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरचिटणीस प्रियंका सानाप, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस … Read more

मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे. मंत्रालयात ओळख असल्याने महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगत दोघांनी अकोले तालुक्यातील एका युवकाकडून साडेअठरा लाख रुपये घेऊन गंडवले आहे. या युवकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

लग्नघरातून आठ लाखांच्या मुद्देमालाची चोरी,सीसीटीव्हीत चोरटे कैद

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कुकाणा येथील शामसुंदर धोंडीराम खेसे यांचे घरातून चोरट्यांनी सोन्याच्या २३ तोळे दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज पळवला. काल शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. खेसे यांच्या मुलाचे रविवारी लग्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर मंडप टाकलेला … Read more

रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर ! आ. काळे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-महाआघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदारसंघातील जिल्हा हद्द रस्त्याच्या (प्रजिमा ५) १६ किलोमीटर अंतराच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. याबाबत पत्रकात आमदार काळे यांनी म्हटले, की कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट … Read more

मास्क न घालणारे नागरीक व व्यापाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नेवासा शहरात मास्क न घालणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. अजून कोरोना गेलेला नाही, नियमांचे पालन करा, असे आवाहनही नगरपंचायतच्या टीमकडून करण्यात येत होते. मास्क नसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिकारी गुप्ता, वाघमारे, कडपे, कार्यालयीन कर्मचारी … Read more

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- राहाता तालुक्यातील हनमंतगाव शिवारात लोणी- सोनगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राम्हणे- बनसोडे वस्तीजवळ शनिवारी (दि. १९) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लोणी, कोल्हार, सात्रळ, सोनगाव, पाथरे, हनमंतगाव या प्रवरा पट्ट्यातील … Read more

रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी, १८ जून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी कायदा पास करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणिकरण करा, हल्लेखोर व्यक्तींवरील खटले फास्ट … Read more

मंदिरेही असुरक्षित, चोरट्यांनी ‘या’ मंदिराची दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केली. देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बहिरवाडी येथील कालभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडला. त्यानंतर मंदिरातील दोन दानपेट्या मंदिरामागील … Read more

घरातील कपाट उचकटून चोरटयांनी तब्ब्ल नऊ लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- एका घरातील उचकटून चोरटयांनी बावीस तोळे सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा ८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली आहे. याबाबत शामसुंदर धोंडिराम खेसे (रा. कुकाणा, ता. नेवासा) यांनी याबाबत नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारीची … Read more