तर मंत्र्याची डोकी फोडल्याशिवाय या शेतकर्‍यांची पोरं स्वस्त बसणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी दूध उत्पादकांनी मंगळापूर दूध संकलन केंद्रासमोर रस्त्याच्या कडेला सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन केले. दूधाचे भाव पडले तरी सरकार हस्तक्षेप करत नाही, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केले गेले तर आगामी काळात दूध उत्पादक शेतकरी … Read more

ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार प्रकरणी ‘त्या’ दोघांवर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडल्या. यात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी लगेचच पसार झाले. मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता चव्हाण घोडेगावातून घरी चालले होते. … Read more

साईमंदिरासमोर गार्डन विकसित होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि नगरसेवकांच्या पुढाकारातून साईमंदिरासमोर असलेल्या नगर-मनमाड रोडलगतच्या त्रिकोणातील मोकळ्या जागेत भव्य असा बगिचा, लहान मुलांना गार्डन आणि भव्य अशी कोरीव व अप्रतीम साईबाबांची मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डीच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या पाच वर्षांत शिर्डीत रोज विश्वस्त मंडळ जाहीर होत आहे. त्याबाबत याद्याही जाहीर होत आहेत; मात्र महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते विश्वस्त मंडळ जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानवर लवकरच विश्वस्त मंडळ येणार, अशी चर्चा जोरदारपणे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आज थोड्या प्रमाणात वाढली आहे.  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दररोज पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळत होते त्यात आता वाढ झालीय. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 679 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

दूध दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर !जिल्ह्यासह राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनामुळे लॉकडाउन करावे लागले परिणामी सलग बंद असल्याने बाजारपेठ ठप्प झाल्याने त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले तर दुसरीकडे लॉकडाउनचे कारण पुढे करत दुधाचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दूध दरवाढीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्ननातून जिल्ह्यासाठी साडेसात हजार टन खत उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा खताचा … Read more

30 लाखांच्या तेलाची चोरी करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- संगमनेर शहर पोलिसांनी व्यापार्‍याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना गजाआड केले आहे. या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरत येथील एल. … Read more

गायब झालेल्या पावसाने भंडारदरा आणि मुळा पाणलोट परिसरात हजेरी लावली

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजाला समाधान मिळवून दिले; मात्र चार दिवसांपासून वरुणराजा गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागाला त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान गायब झालेल्या पावसाने बुधवारी दिवशी भंडारदरा आणि मुळा पाणलोटातून पुनरागमन झाल्याने शेतकर्‍यांच्या पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर पाणलोटात मान्सूनही दाखल झाला. … Read more

पशुपालकांमध्ये भीती वाढली, चोरट्यांकडून होतेय शेळ्यांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. घरफोडी, लूटमार आदी घटनां तर होत आहेच मात्र आता चोरट्यांकडून पशुधन चोरले जात असल्याचे प्रकार घडू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिकरीने जगवलेले पशूधन चोरीस गेल्यामुळे पशुपालक संतापले असून बेलापूर पोलिसांना बकरीचोर शोधण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान … Read more

पेरणीसाठी खते – बी -बियाणांची खरेदी केली मात्र पावसाअभावी बळीराजा झाला चिंतातुर

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जूनच्या सुरुवातीलाच पाऊस सर्वत्र सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना जून महिना अर्धा संपला तरी पावसाने हवी तशी हजेरी अद्यापही जिल्ह्यात लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणी प्रश्नावरून मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यातील राहाता तालुक्यात दुपारच्या सुमारास दमदार सरी कोसळल्या. मात्र ग्रामिण भागात … Read more

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते वानर पोहचेल थेट विजेच्या पोलवर

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- काही दिवसांपासून वन्यप्राण्यांची मोठी वाताहत सुरु असलेली पाहायला मिळते आहे. या प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे. व यातूनच काहींना काही दुर्घटना घडत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच देवठाण मध्ये एक वानर कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका म्हणून थेट विजेच्या पोलवरच चढले. महावितरणच्या वायरमनने तात्काळ वीज पुरवठा खंडीत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : हातावर मेहंदी लागण्याआधीच महिला पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथील एका शिंदे कुटंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या आईच्या निधनापाठोपाठ मुलीने देखील जगाचा निरोप घेतला आहे.  सुकृता शिंदे असे त्या मुलीचे नाव आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका शिक्षण प्राप्त केलं होतं. विशेष म्हणजे सुकृता ही अकोले तालुक्यातील पहिली महिला पत्रकार आज तिने जगाचा … Read more

मृतावस्थेत आढळले मादी जातीचे हरण; शिकार की आणखी काही?

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून भक्ष्याच्या शोधात तसेच पाण्यासाठी वन्यप्राणी जंगलातून मानवीवस्तीकडे येऊ लागल्याचे दिसून येत आहे. यातच अनेकदा वाहनाच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. यातच श्रीरामपूर शहरात एक मादी जातीचे हरीण मृतावस्थेत आढळले. या हरणाची बिबट्याने शिकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळुतस्करांविरुद्ध पर्यावरणप्रेमींचे नदीपात्रात झोपून आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- संगमनेर शहराजवळील खांडगावमध्ये प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे रास्तारोकोनंतर ग्रामस्थांनी आता थेट नदीपात्रात उतरून आंदोलन केले.निसर्गप्रेमीही या आंदोलनात सहभागी झाले होते. कसारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील परिसरात रात्र आणि दिवस मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात … Read more

… तर टळू शकतो लहान मुलांच्या कोरोनाचा धोका !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्धांना कोरोनाने घेरले होते. दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नियम न पाळल्याने तरुणांना घेरले. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होऊ शकतो, असे शासन व जागतिक आरोग्य संघटनेचे मत असून त्याचे प्रमाण मात्र कमी असणार आहे. योग्य ती खबरदारी व काळजी घेतली तर लहान मुलांच्या कोरोना … Read more

तिच्या मृत्यूशी झुंज संपली ! डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अपयश

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- म्यूकरमायकोसिस आजाराच्या विरोधात मृत्यूशी झुंज देणाऱ्या शिर्डी येथील श्रद्धा कोरके या पाच महिन्याच्या चिमुकलीची गेल्या अठरा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी अखेर संपली. या चिमुकलीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न केले. परंतू, नियतीने त्यांना अपयश दिले.जीवनमृत्यूच्या लढाईत म्यूकरमायकोसिसने काल सकाळी चिमुकल्या श्रद्धाचा बळी घेतला.शिर्डी शहरात वास्तव्यास असलेल्या कोरके … Read more

श्रीसाईबाबा संस्थान निवड : लवकरच चित्र स्पष्ट होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसाईबाबा संस्थांनमध्ये विश्वस्त मंडळाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून सात ते आठ दिवसांत शिर्डी साई संस्थानचे अधिकृत विश्वस्त मंडळ स्थापन होणार असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच राज्य सरकार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अतिशय महत्वाचं आणि मानाचं … Read more