काय चौकशी करायची ती करा, आम्ही गावोगावी जाऊन…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी काल राजिनामे दिले. ‘कारखाना बंद पाडून खासगीकरणीचा घाट घातला जात आहे; मात्र अगस्ति कारखाना कदापीही मोडू देणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल’ असा इशारा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला आहे. अगस्ति सहकारी साखर कारखाना … Read more

आ. काळेंच्या नियोजनामुळेच मिळाले कोरोनावर नियंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-मागील तीन महिन्यांत रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा कठीण परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर उभारून प्रशासनाला वेळेवर सर्व प्रकारची मदत करून केलेल्या योग्य नियोजनामुळेच तालुक्यात कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविता आले असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. कोपरगावात नुकताच कोरोना योद्ध्यांचा सत्कार … Read more

आज ३७९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६५ हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

इतका पाऊस झाल्यानंतरच पिकांची पेरणी करा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात खरीप पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले असून शासनानेही बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. अनुदानित बियाणे वाटपाचे कामे सुरु केले आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. ८० ते १०० मिमी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीन व इतर पिकांची पेरणी करण्यात यावी, असे आवाहन … Read more

गुणवत्तापूर्ण विकासकामांतून होणार विकास : उदयन गडाख

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध निधींमधून नेवासे तालुक्यात विविध विकास कामे पूर्णत्वास जात आहेत. गुणवत्तापूर्ण विकासकामांतून होणार परिसराचा विकास हाेईल, असे प्रतिपादन उदयन गडाख यांनी केले. सलाबतपूर गणातील खेडलेकाजळी येथील रस्ता खडीकरण १५ लाख रुपये, जळके खुर्द येथील नदीकडील रस्ता खडीकरण ५ लाख, साखळडोह रस्ता खडीकरण १५ … Read more

साई संस्थांनच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ‘या’ आमदाराची नियुक्ती करावी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  शिर्डी साईबाबा संस्थांनच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला हि खुर्ची मिळणार याकडे सध्या नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. यातच एक महत्वपूर्ण मागणी समोर आली आहे. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी … Read more

‘ह्या’ तालुक्यातून पंतप्रधानांना मराठा आरक्षण बाबत पन्नास हजार पत्र !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वतीने पंतप्रधानांना नेवासे तालुक्यातून पन्नास हजार पञ पाठवल्याचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष कमलेश नवले यांनी सांगितले . मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने एक पत्र मराठा समाज च्या । युवकांच्या उज्वल भविष्यासाठी संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून पन्नास … Read more

घरातून ५० हजारांची रोकड व दागिने लांवबले

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  कोपरगाव तालुक्यात रवंदे येथील सताळी रोड वर असलेल्या थोरात वस्तीवर रात्री दहा वाजे नंतर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून व घरातील ३० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे दागिने, पन्नास हजारांची रोख रक्कम, एक मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी शिवाजी नामदेव थोरात यांनी … Read more

एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला सतराशे ते तेवीशे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या 24 तासात नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक झाली आहे. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये असा भाव मिळाला आहे. त्याचबरोबर राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली यात एक नंबर कांद्याला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: आज वाढले इतके रुग्ण ! जाणुन घ्या अधिक्रुत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता कमी होताना दिसते आहे. जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत ४३७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात चोविस यासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

नेवाशातील गोळीबार वाळूतून की राजकीय वैनमन्यशातून…. वेगवेगळ्या चर्चेला उधाण…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झालेले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा गोळीबार वाळूच्या वादातून झाला की राजकीय वैमनश्यातून या विषयी तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहे. संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रस्त्याने रात्री … Read more

जिल्हाभरात चोरटे झाले सक्रिय पोलीस मात्र निष्क्रिय…संतप्त जनभावना

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चोरीच्या रेकॉर्डब्रेक घटना घडत आहे. चोरीच्या घटना घडतात त्यांची नोंद पोलीस ठाण्यात होते व हे प्रकरण इथेच संपते. गुन्ह्याच्या तुलनेत शोध व चोरट्याने पकडण्याचा आलेख पाहता यामध्ये पोलिसांची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील एका महिलेच्या घराच्या पाठिमागील दरवाजा उचकटवून … Read more

विखे पाटील म्हणाले… तर वंचित कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबियांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमीनी घरकुल उभारणीसाठी … Read more

पत्याचा डाव आला अंगलट… एसटीचे चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी ॲानड्युटी पत्ते खेळतानाचा एक व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी आगारप्रमुखांनी चार कर्मचारी निलंबित केले. वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईमध्ये दुजाभाव झालेला दिसून येत आहे. कारण पत्त्याच्या डावात सात ते आठ जण पत्ते खेळताना दिसत असूनही केवळ चौघांवरच कारवाई … Read more

बिले भरूनही विद्युत रोहित्र नाहीच…संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयातच मांडला ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- करोना महामारीच्या काळात महावितरणने भरंसाठी वीजबिलांनी आधीच शेतकऱ्यांची छळवणूक केली आहे. यातच बळीराजाने बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भाजपच्या वतीने कोपरगाव येथे वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी करून कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोपरगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन … Read more

अठरा वर्षाच्या तरुणीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. कल्याणी संतोष नाईक (वय 18) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरात गजानन वसाहत कॉलनी भागात राहणार्‍या … Read more

‘तुमच्यात हिंमत असेल, तर माझाही राजीनामा घ्या.

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- सततच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे आज कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द केले होते. दरम्यान अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्रकार परिषद घेत आज आपली भुमीका स्पष्ट केली. निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख व स्वाभिमानी शेतकरी … Read more

शेवटी मृत्यूने ‘त्या’ चिमुकलीला गाठले; जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे म्युकरमायकोसीस संकटाचे ढग जिल्ह्यावर दाटून आले. यातच नुकतेच शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोना नंतर म्युकरमायकोसिस या आजराची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. शिर्डी शहरातील श्रद्धा कोरके या साडेपाच … Read more