कुठल्याही राजकीय मदतीविना गावाची कोरोना मुक्ती कडे वाटचाल !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर, प.पु. सुभाषपूरी महाराजांच्या पावन भूमीत, कळसेश्वर देवस्थान च्या निसर्ग रम्य परिसरात अकोले तालुक्यातील कळस बु गावातील युवकांचा “माझ गाव माझी जबाबदारी” या संकल्पनेतून तालुक्यातील प्रथम कोविडं केअर सेंटर उभारून तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील युवकांना प्रेरणा देणारा उपक्रम राबविला, कुठल्याही राजकीय मदतीविना जवळपास ९० रुग्णांना … Read more

अहमदनगरचा निर्धार कोरोना हद्दपार ! चोवीस तासांत वाढले अवघे इतके रुग्ण….

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा जोर ओसरत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे  530  रुग्ण वाढले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभर च्या खाली आता आली आहे.  गावोगावी … Read more

गोविंदराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कृषक समाज संघटना व स्व. सुभाष गांगड मित्र मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा, कृषक समाज संघटना व मुस्लिम समाज यांच्या वतीने सैयारा-ऐ-आखीरतचा (स्वर्ग रथ) लोकार्पण सोहळा तसेच शहरातील नोंदणीकृत दिव्यांगाना रेनकोट, सॅनिटायझर व मास्कवाटप करण्यात … Read more

चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापले अन …!

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  सध्या एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. कोरोनामुळे पोलिसांना आधीच जास्त काम पडलेलं आहे. त्यामुळे चोरटयांनी हीच संधी साधून चोऱ्या करत आहेत. अनेक ठिकाणी तर चक्क भरदुपारी घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी तर रात्रीच्या … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात वीज पडून एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- विहिरीचे काम करत असेल्या तरुणावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी या ठिकाणी घडली आहे. या दुर्घटनेत संतोष जाधव हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याचा अन्य सहकारी सागर जाधव हा जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यात … Read more

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फेसून चोरटयांनी कॅश पळवली

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- एक एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याच्या खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील लोणी ते … Read more

रुतलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करा; शिर्डीकरांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साईमंदिर 5 एप्रिल पासुन भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दैनंदिन … Read more

चक्क…पोलीस कर्मचाऱ्याकडून सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून “त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात घडली. संबधित महिला कॉन्स्टेबल यांनी याबाबत जिल्हा पोलिस कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याचेविरुद्ध राजूर … Read more

धक्कादायक ! दोघांवर कोयत्याने केले वार; एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका परिसरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या दोघांवर परिसरातील एकाने जीवघेणा हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरामध्ये मुजू कुरेशी यांच्या खोलीमध्ये मजुरी काम करणारे अर्जुन कानिफनाथ भोसले हे … Read more

पालकमंत्री म्हणतात : कोरोना संपलेला नाही;  निर्बंध पाळा… अन्यथा परत ?

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राज्यासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र, जिल्ह्याचा रुग्ण बाधितांचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या निकषांच्या बाबतीत आपला जिल्हा स्तर एक मध्ये आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. मात्र, धोका संपलेला नाही.  दुसऱ्या लाटेत कोरोनाची भीषणता आपण अनुभवलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. … Read more

आनंदवार्ता : आजपासून  जिल्ह्यात लाल परी धावणार!

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या धुमाकूळामुळे अहोरात्र प्रवाशांच्या सेवेत हजर असलेली लाल परी मागील तब्बल ६४ दिवसांपासून थांबली होती. परंतु आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने निर्बंध शिथील झाले व परत एकदा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ जिल्ह्यांतर्गत लाल परीची चाके धावणार आहेत. सुरूवातीला  ५० टक्के फेऱ्या सुरू होणार असून नंतर शंभर टक्के क्षमतेने लालपरी धावणार … Read more

अहमदनगर पोलिस दलात खळबळ ! हेड कॉन्स्टेबल वर गुन्हा…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात सेवेत असलेले हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने महिला पोलिस कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून “त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना घडली होती. संबधित महिला कॉन्स्टेबल यांनी याबाबत थेट जिल्हा पोलिस कार्यालय येथे जात आपल्यावरील अन्यायाला वरिष्ठ अधिकार्यां पुढे वाट मोकळी … Read more

गॅस कटरने ATM मशीन फोडून लाखो रुपये लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे येथे असलेले टाटा इंडिकॅशचे एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिवारी रात्री संगमनेर … Read more

मारुती मंदिराजवळ मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात काल सकाळी दत्तू किसन शिंदे वय ४० याचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देवून पाहणी केली. नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या खबर नुसार सोनई … Read more

साई संस्थानचे कोविड सेंटर ठरतेय रुग्णांना वरदान

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५० बेडचे ६० डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. येथे सुमारे ८०० रुग्ण उपचार घेऊन … Read more

आम्ही पोलीस आहोत असे सांगायचे आणि दरोडा घालायचे ! आता अखेर….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- पोलिस बतावणी करून दरोडा घालणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. तौफिक सत्तार शेख, साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी (तिघे रा. श्रीरामपूर), आरबाज जाकिर मन्सूर उर्फ पिंजारी व शाम भाऊराव साळुंखे अशा पाचजणांना जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळाचे अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-पतीकडून होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून तक्रार देण्यासाठी विवाहिता पोलीस ठाण्यात गेली असता, तिच्या १३ महिन्यांच्या बाळाचे पती, सासू व दिर यांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डीच्या द्वारकानगर येथील पूनम रतन धिवर या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी दि. ४ … Read more