वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यातच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा घटना घडल्या असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि.३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे … Read more

जिल्ह्यात सरासरी तेरा टक्क्याहून अधिकचा पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानूसार जिल्ह्यात मान्सून पूर्व वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोेंद ही श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव मंडलात 67.3 मि.मी आणि नगर तालुक्यातील वाळकी मंडळात 66.8 मि.मी. पावसाचा समावेश आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अकोले तालुक्यातील देवठाण येथील शिवारात एका शेतातील शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना छापा टाकून पोलिसांनी अटक केली. सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे अवैध वाळू वाहतूक, अवैध दारू विक्रीप्रकरणीही कारवाई करण्यात आली. याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या थोडक्यात आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1440 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीचा पाईपलाईनवर अनधिकृत जोड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकारीच्या दालनात आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी गर्कल यांनी पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.सावतानगर उपनगरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन … Read more

कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आगामी काळात काळजीपूर्वक काम करा. याबाबत कोणीही निष्काळजीपणा करु नका तसेच या कोरोनाच्या लढाईत संपूर्ण तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय नागरिकांनी शिथिलता येवू देऊ नये,असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाय योजना आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते .यावेळी आमदार डॉ. … Read more

पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ व २०२० मधील खरीप व रब्बी हंगामातील पिकाचे विमा योजनेत सहभागी होऊन खरीप हंगाम २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असताना ३१ जुलै पर्यंत विमा भरला. अशा कठीण परिस्थितीतही नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून अद्याप मदत विमा कंपन्यांकडून झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागील वर्षी … Read more

शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणार : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असून पुढील काळात कोपरगावातील रस्त्याची दुर्दशा संपवू, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध योजनांतर्गत ६८ लाख ३८ हजार निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. नगरविकास खात्याकडून काही दिवसांपूर्वी शहरातील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून … Read more

अहमदनगरकरानों पाणी जपून वापरा…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर शहरास काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामुळे नगर शहरातील पाणीपुरवठा योजनेला या पावसाचा फटका बसला आहे.  शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होणार आहे. जलवाहिनी फुटली  वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाण्याचा आणि हवेचा दाब कमी जास्त होऊल रात्री साडेबाराच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली, अशी … Read more

शेतकऱ्याच्या अंगावर टॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारात शेतजमिनीच्या वादातून शेतकर्‍याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाघापूर येथील भागवत शिंदे व ज्ञानदेव शिंदे त्यांच्या परिवारात गेल्या दीड वर्षापासून शेत जमिनीवरून वाद आहे. हा … Read more

धक्कादायक ! वीज कोसळून महिलेसह चार शेळ्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे विज पडून एका महिलेसह चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वनवे (वय 39, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा … Read more

जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने घेतला आणखी एक बळी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. नुकतेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या आजराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. नुकतेच देवळाली प्रवरा मध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुसरीकडे देवळाली प्रवरा मध्ये म्युकरमायकोसिसचा आणखी एक रुग्ण सापडला असून त्याच्यावर राहाता येथील एका खासगी हास्पिटलमध्ये शस्त्रक्रिया … Read more

संगमनेरात एकाला धारदार तलवारीसह पोलिसांनी ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर असणाऱ्या प्रसिद्ध महाराष्ट्र वाईन्स शॉप जवळील परिसरात एका इसमाला तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तब्यत घेतले आहे. हेमंत उर्फ दत्तू किशोर शेळके (वय वर्ष 34 ,रा श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी शेळकेला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धरले. त्यावेळी त्याच्याकडे विनापरवाना बेकायदा … Read more

अज्ञात समाजकंटकाने मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना केली

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्री महादेव मंदिरामध्ये असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची कोणी अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर टाकळीभान मधील तरुणांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांना सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व मंदिरातील वस्तूंची नासधूस करणाऱ्या आरोपीचा लवकरात लवकर शोध लावावा … Read more

विखे पाटील म्हणाले…‘पक्ष काढण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी संभाजीराजेंचा व्यक्तिगत आहे

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे यांनी नवीन पक्ष काढण्यासंबंधी सूतोवाच केले आहेत. त्यावर बोलताना ज्येष्ठ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, ‘आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्या … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात आमदार विखे पाटील यांचे महत्वाचे विधान म्हणाले सरकारवर…..

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्‍याच्‍या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्‍या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्‍याही पक्षाच्‍या बाजून आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतीम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्‍यासाठी सर्व संघटनांना ए‍कत्रित येवून, सरकारवर दबाव आणावा लागेल असे स्‍पष्‍ट मत माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल !

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील एका नामांकित अध्यात्मिक व शिक्षण संस्थेचे कार्य महाराष्ट्रात प्रसिध्द असल्याने पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार व्हावे; म्हणून त्या संस्थेत शिक्षणासाठी पाठवतात. परंतु त्याच शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापकाने शैक्षणिक ग्रुपवर अश्लील चित्रफीत टाकल्याची धक्कादायक घटना घडल्याने ग्रुपमधील शिक्षक व महिला शिक्षकांनी व्यवस्थापकांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन संताप व्यक्त … Read more