गुड न्यूज : भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा १०९७४ दलघफू (९९ .४४ टक्के) झाला होता. या धरणाची ११०३९ दशलक्ष घनफूट क्षमता असून धरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला भरत असते, असा … Read more

कोरोना रुग्णाचा पलायनाचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील डॉ. आंबेडकर वसतिगृहात असलेल्या कोरोना केअर सेंटरमधून सोमवारी सायंकाळी एका रुग्णाने पलायन केले. शहरातील जिजामाता चौकातील या रुग्णाने आरोग्य यंत्रणेचा डोळा चुकवून पोबारा केला. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आला. आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना करून त्याला परत आणल्याचे येथील नोडल अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोपरगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला नगरसेविकेच्या पतीस अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी कोकमठाण येथील करोना केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घाटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले … Read more

कोरोनाने आणखी २० जणांचा घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी २० जणांचा बळी घेतला. बळींची एकूण संख्या २६० झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या १८ हजार १९ झाली. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवार सायंकाळी सहापर्यंत रुग्णसंख्येत ४२६ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ‘या’ नेत्या विरोधात गुन्हा दाखल; बदनामी केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. दिवसेंदिवस शहरातील कोरोना पेशंटची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासनाने काही खासगी हॉस्पिटलला कोरोना बाधित पेशंटवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये साईदीप हॉस्पिटलचा समावेश आहे. नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणार्‍या उपचारावर आणि औषधांवर आक्षेप घेत चुकीची … Read more

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येताच खासदार सदाशिव लोखंडे मुंबईला रवाना !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधी कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. त्यांचा कोरोना बाधित लोकांशी संपर्क येत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही करोनाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. खासदार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ओलांडला अठरा हजाराचा आकडा वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२६ ने वाढ … Read more

नागरिकांचा इशारा! अमरधाममधील अंत्यविधी बंद करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  शहरात कोरोना तसच इतर काही कारणांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातील मृत्यूचे प्रमाण या अलीकडील काही महिन्यात वाढल्याचे चित्र आहे. हे जिल्हाभरातील सर्व अंत्यविधी नालेगाव अमरधाम येथे होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट नालेगाव गावठाण, सुडके मळा यांसारख्या आजूबाजूच्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरत आहे. यामुळे, आरोग्यचा प्रश्न उभा … Read more

अहमदनगर-कोल्हार-कोपरगाव मार्गावरील खड्डे बुजणार !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर ते कोल्हार आणि कोल्हार ते कोपरगाव या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले ख़ड्डे तात्काळ बुजविण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच, या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करु, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय … Read more

‘त्या’ पतसंस्थेमधील संचालक मंडळावर कारवाईची टांगती कुर्‍हाड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मध्ये 2015- 2020 या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये इतर अ‍ॅडव्हान्स म्हणून उचलले होते. याप्रकरणी चालू असलेल्या प्रकरणात चौकशासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांचा अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ खासदारांना कोरोनाची ‘लागण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोरोनाची ‘लागण झाली असून … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे गौण खनिजाचे अवैध उत्खनन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- गौण खनिज ही एक राष्ट्राची संपत्ती आहे. याचे उत्खनन व वापर करताना शासन, प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे.  परंतु नेवासा तालुक्यामधील मोरयाचिंचोरा परिसरातून बेकायदेशीररित्या हजारो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासन यावर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाचा महसूल बुडवून दिवसाढवळ्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा आतापर्यंतचे अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

संगमनेरमधील ‘ह्या’ पाच गावांचा पाणीप्रश्न मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना पाणीपुरवठा होणार असल्याने पाच गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. निमोणसह पाच गावांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. भोजापूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही ही पूर्णत्वास येत आहे. 15 किलोमीटरची … Read more

आधी पॉझिटिव्ह नंतर लगेच निगेटिव्ह ; अहमदनगरच्या तरुणाने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. शहरामध्ये मात्र याचे प्रमाण सर्वाधिक आहे.परंतु अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची जी चाचणी केली जाते त्याबद्दलच शंका निर्माण झाली आहे.  कारण कोरोनाच्या चाचण्यांमध्ये भिन्नता आढळत असल्याचे प्रकार जिल्ह्यात या आधी घडले आहेत. आता पुन्हा शहरात असा प्रकार घडला. महापालिकेच्या रिपोर्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा २२१ संगमनेर ४७ राहाता ३० पाथर्डी १६ नगर ग्रा.२६ श्रीरामपूर १६ कॅन्टोन्मेंट २३ नेवासा ४ श्रीगोंदा ३१ पारनेर ३९ अकोले ०५ राहुरी ०१ शेवगाव ०१ कोपरगाव ५५ जामखेड ३६ कर्जत ०९ मिलिटरी हॉस्पीटल ०६ इतर जिल्हा ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:१४५३१ आमच्या … Read more

कोरोना व्हायरसने सोनईला पुन्हा ‘विळखा’ घातला !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  गेल्या आठवड्यात नेवासे तालुक्यातील सोनई व घोडेगावमध्ये करोना रुग्ण संख्या अत्यल्प दिसून आली. परंतु सोमवार 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालात अहमदनगर येथे खासगी लॅबमध्ये गेल्या तीन दिवसांत तपासणी केलेल्या 11 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत,तर घोडेगाव येथे 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

जिल्ह्यात कोरोनाने आणखी आठ जणांचे बळी घेतले

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी आठ जणांचे बळी घेतले. चोवीस तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २४० झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवे ५१९ रुग्ण आढळून आले असून बाधितांची एकूण संख्या १७ हजार ५८३ झाली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. २१ … Read more