श्रीरामपूर तालुक्यात नव्याने १५ लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात काल 58 जणांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 15 लोक नव्याने बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या तालुक्यात 501 झाली … Read more

चिंताजनक! कोपरगावमध्ये नव्याने आढळले ‘इतके’ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हे प्रमाण जास्त वाढले. याला कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता नव्याने पुन्हा ३३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. … Read more

‘ह्या’ धरणांतील पाणीसाठा वाढला; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या धरणांत तासागणिक पाण्याची आवक वाढत चालली आहे. 16 ऑगस्ट रोजी पहाटे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरम्यान निळवंडेतून प्रवरा नदी पात्रात रात्री 3848 क्युसेकने पाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता तरुणाचा मृतदेहबंधाऱ्यात सापडला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील लक्ष्मण अशोक गवळी (३० वर्षे) तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. रविवारी (१६ ऑगस्ट) त्याचा मृतदेह उंबरी नाल्यावरील बंधाऱ्यात सापडला. ही आत्महत्या आहे की, घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कृष्णकांत अरूण गवळी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. सहायक … Read more

२४ तासांत दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत ३६३ ने वाढ होऊन उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २७९८ इतकी झाली आहे. दहा जणांचा मृत्यू झाला.  आतापर्यंत १६८ जणांचा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०, अँटीजेन चाचणीत २१६ आणि खासगी प्रयोगशाळेत १०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा … Read more

`ऐकावं ते नवलच` सापाचा मोटारसायकवर 9 किमी प्रवास

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- `ऐकावं ते नवलच` संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथे सापाने चक्क 9 किलोमीटर मोटारसायकलवर प्रवास केला. बसला ना धक्का ? तर झालं असं की, पारेगाव गडाख येथील प्राथमिक शिक्षक अशोक गडाख हे दुचाकीवरून जाताना त्यांच्या समवेत सापानेही प्रवास केला. ही घटना घडली शनिवारी १५ ऑगस्टदिवशी. गडाख यांनी दुचाकीच्या हेडलॅम्पमध्ये (खोपडी) … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची कोव्हिड केअर सेंटरला भेट

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अधिकाधिक कोव्हीड सेंटर सुरु करण्यावर शासनाचा भर आहे. बाधित रुग्णांना लवकर आरोग्य सुविधा देण्याला प्राधान्य आहे. नुकतेच शनिशिंगणापूर येथे कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड … Read more

नगरमधील `या` बड्या नेत्याचे घरवापसीवर सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झालेल्या नेत्याची पुन्हा घरवापसी करण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर नगरमधील `हे` बडे नेते पुन्हा घरवापसी करणार अशी चर्चा … Read more

नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात; जखमींमध्ये महिलांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा परिसरातील गरीब महिला उपजिविका भागविण्यासाठी रोजंदारीवर शेती कामाला जातात. यासाठी वाहनातून जा-ये करत आसतात. रविवारी (दि.१६) सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास कामावरुन परतत येत असताना वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी झाले. यामध्ये महिला जखमी झाल्या आहेत. याबाबत माहिती अशी की, माळीचिंचोरे शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल दत्त प्रसाद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ३६३ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०६२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७८.१७ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ झाली. यामुळे … Read more

जिल्ह्यात आज ५३९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ५३९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.* मनपा २७७  संगमनेर ३५ राहाता १७  पाथर्डी३१ नगर ग्रा.४९  श्रीरामपूर१३ कॅन्टोन्मेंट६ नेवासा२ श्रीगोंदा१४  पारनेर१६  अकोले ३  राहुरी१३ शेवगाव२ कोपरगाव१० जामखेड१७  कर्जत२४ मिलिटरी हॉस्पिटल २  *बरे झालेले रुग्ण:१०६२०* आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights … Read more

निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अकोले, संगमनेर निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत गतीने प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा, महसूल प्रशासनाला याबाबतीत प्रलंबित मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले. कालवेग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. संगमनेर कारखाना विश्रामगृहावर निळवंडे धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे मार्गदर्शक जेष्ठ … Read more

चालकाकडून प्रवासी महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- प्रवासी महिलेला पिकअपमधून नेताना चालकाने तिच्यावर अत्याचार केले. स्थानिक गुन्हे शाखा व घारगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला १२ तासांच्या आत गजाआड केले. सुखदेव बबन कंकराळे (३०, कोर्ट परिसर, बारगाव पिंपरी रोड, सिन्नर, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. संगमनेर बायपास पुणे-नाशिक महामार्गावरुन चाकणला जाण्यासाठी उभी असलेली महिला एका … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ओलांडला तेरा हजारचा आकडा ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७६.२४ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायवेवर महिलेला दारु पाजून केला बलात्कार आणि अवघ्या चोवीस तासांत …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली.  मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.  ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित … Read more

‘ह्या’ शहरात कोरोनाने घेतला चौथा बळी

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेवासे शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. आता शहरात कोरोनाचा चौथा बळी गेल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा … Read more

खा. सुजय विखेंनी घेतली इंदूरीकर महाराजांची भेट; अन ‘ती’ गोष्ट ठरली चर्चेचा विषय

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्या भाजप नेत्यांकडून भेटीगाठी सुरूच आहेत. आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंदोरीकरांची भेट घेतली. विखेंनी इंदोरीकरांना ‘जय श्रीराम’ घोषणा छापलेली शाल भेट दिली, तर इंदोरीकरांनी विखेंचे फेटा बांधून स्वागत केले. त्यामुळे फेटा आणि ही शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. … Read more

ना. बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला मोबाईल नंबर,म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कोरोना संदर्भातील अडीअडचणी, त्याचबरोबर नगर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक – ९०२८७२५३६८ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः नगरकरांसाठी जाहीर केला आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ना.थोरात यांच्या हस्ते काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक नगर शहरातील … Read more