अरे बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा कोरोनाची एंट्री !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. नेवासे तालुक्यातील सोनई येथे  ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक अहवाल पॉझिटिव्ह आले होते.  या पार्श्वभूमीवर सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. परंतु नुकतेच काही दिवसांपूर्वी सोनई गाव कोरोनामुक्त झाले होते. परंतु आता मात्र पुन्हा एक व्यक्ती कोरोनासंक्रमीत आढळून आल्याने ह्या गावात पुन्हा … Read more

श्रावणी सोमवारी भल्या सकाळी गोदावरीत स्नान करण्यासाठी गेलेले ते दोघे परतलेच नाहीत…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- गोदावरीत स्नान करण्यासाठी श्रावणी सोमवारी भल्या सकाळी गेलेले सचिन वानखेडे (वय २८) व भाऊराव वानखेडे (वय ३५) या चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला. येथील महादेव मंदिरातील महादेवाला श्रावणात अनेक भक्त पाणी घालतात. हे दोघेही पाणी घालायचे. तिसरा सोमवार असल्याने पहाटेच सचिन व भाऊराव गोदावरी नदीवर स्नासाठी गेले होते. वाहत्या पाण्याचा … Read more

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तीनमहिन्यांची वीज बिले ग्राहक भरणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- दरमहा ३०० युनिटच्या आत वीज वापर असलेल्या सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य शासनाने महावितरणला अनुदान स्वरुपात द्यावी,  अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा विकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारची दुचाकीला धडक, शिक्षकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील हाडवळा परिसरात वॅगनर कारची दुचाकीला धडक बसून शिक्षक रामहरी लहानू भागवत (वय ४४) यांचा मृत्यू झाला.  तळेगाव दिघे – कोपरगाव रस्त्यावर रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक भागवत हे दुचाकीवरून (एमएच १७ बीजे ८९१९ ) जात होते. वॅगनरची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येने ओलांडला दहा हजारचा टप्पा !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६५.९३ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५९  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधिताचं निधन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातल्या चांदेकसारे येथील एका ६५ वर्षीय कोरोना बाधिताचं निधन झालंय. त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु होते. काही दिवसापूर्वी हा रुग्ण बाधित आढळला होता. त्याचं उपचारादरम्यान अहमदनगरच्या कोविड सेंटरमध्ये निधन झालं, अशी माहिती पोहेगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन बडदे यांनी दिलीय. दरम्यान, कोपरगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी … Read more

मोठी बातमी :शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे नवे सीईओ के. एच. बगाटे !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्स्फर करण्यात आल्या आहेत. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ के. एच. बगाटे यांची शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नेमणूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातच त्यांची रत्नागिरीत बदली झाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! ‘ह्या’ ठिकाणी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगांव येथील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोदाकाठावर स्नान करण्यासाठी हे दोघे सकाळी सहा वाजता घरातून गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सचिन बाजीराव वानखेडे (२८) व भाऊराव पांडूरंग वानखेडे (३५) से मृतांचे नावे आहेत. दोघेही तरुण विवाहित असून सचिन याच्या … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- गणेश उत्‍सवात आयोजि‍त करण्‍यात येणारा प्रवरा सांस्‍कृतीक व क्रिडा महोत्‍सव कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यावर्षी रद्द करण्‍यात आला असुन, कुटुंबाच्‍या, समाजाच्‍या व राष्‍ट्राच्‍या आरोग्‍य रक्षणासाठी यावर्षीचा गणेश उत्‍सवही घरगुती पध्‍दतीने साजरा करावा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्राव्‍दारे गणेश मंडळांना केले आहे. गेली अनेक वर्षे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४१ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : सत्यजित तांबे यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच  हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.  ते स्वतः या उपक्रमामध्ये सोशल मीडियाच्या … Read more

धक्कादायक! फरार आरोपीस अटक करण्यास गेलेल्या पोलिसांशी…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- नेवासे तालुक्यातील नेवासाफाटा येथे फरार आरोपी व त्याच्या भावाने पोलिसांना शिवीगाळ व यांच्याशी झटापट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉन्स्टेबल वसीम मुस्तफा ईनामदार यांनी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जनता कर्फ्यू असल्याने आम्ही पेट्रोलिंग करत होतो. त्यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ३९८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर आज ३९८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा १९५ संगमनेर २९ राहाता ४ पाथर्डी ४ नगर ग्रा.११ श्रीरामपूर १ कॅन्टोन्मेंट ३ नेवासा १२ श्रीगोंदा २० पारनेर ३६ अकोले १४ शेवगाव २९ कोपरगाव २६ जामखेड ६ कर्जत ६ मिलिटरी हॉस्पीटल १ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:६६४८ आमच्या इतर बातम्या … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या ई- लर्निंग बाबत माजी आ.पिचड यांची शिक्षणमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ असल्याने अद्याप शाळा सुरु करणे धोक्याचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ई- लर्निंग ही योजना अमलात आणली गेली. महाराष्ट्रात आता ऑनलाईन शिकवले जात आहे. परंतु अकोले सारख्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना रेंज नसल्याने आणि येथील जनता गरीब असल्याने त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यंचे शैक्षणिक नुकसान होत … Read more

श्रीरामपुरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पोहोचली ३९८ !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील कोरोना बाधित असलेल्या ३८ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना रविवारी नगर येथे मृत्यू झाला. रविवारी घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ३९८ वर जावून पोहोचली. ११ बधितांचा मृत्यू झाला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविडसेंटरमध्ये १२ … Read more

तरच कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडू …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर कोपरगाव येथे रविवारी दुपारपर्यंत करण्यात आलेल्या ३४ रॅपिड अ‍ँटीजेन टेस्टमध्ये ४ जणांचे अहवाल बाधित, तर २५ रुग्णांना आज बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. रविवारी ३४ रॅपिड टेस्ट केल्या. त्यापैकी ४ बाधित झाले. त्यात पढेगाव येथील ६० वर्षीय … Read more

अजून किती दिवस आमदार आयत्या पिठावर रेघा मारणार?

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधींंचा निधी आणून अनेक कामे, प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावचा विकास कसा करायचा, हे झालेल्या विकास कामातून दाखवून दिले. विद्यमान आमदारांना अद्याप निधी मिळाला नाही. कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या कामावरच आयत्या पिठावर रेघा मारण्याचे काम विद्यमान आमदार करीत आहेत. अजून किती दिवस ते आयत्या पिठावर … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात ‘तिचा’ मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकरी भाऊसाहेब राऊसाहेब बोर्डे यांच्या गोठ्यातील कालवडीवर रात्रीच्या वेळी बिबट्याने शनिवारी हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने कालवडीचा मृत्यू झाला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी व पारनेर तालुक्यातील अनेक गावांत बिबट्यांकडून होणारे हल्ले ही गंभीर समस्या बनली आहे. पिंजऱ्यात … Read more