आमच्याविरूध्द बातम्या छापतो का? तुझे हात-पाय तोडू पत्रकाराला धमकी !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील पत्रकार भरत थोरात यांना शनिवारी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणपत सखाहरी पवार याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. थोरात हे हाॅटेलमध्ये चहा पिऊन जात असताना पवार याने आमच्याविरूध्द वाळूच्या बातम्या छापतो का? तुझे हात-पाय तोडू. तू बेलापूर व श्रीरामपूरला ये, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. थोरात … Read more

दिवसभरात सहा जणांचा मृत्यू तर ४८३ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बळीची संख्या १०६ झाली. रविवारी आणखी ४८३ रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ४१ बाधित आढळले. यात नगर मनपा २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासे २, शेवगाव १ आणि कोपरगावच्या २ रुग्णांचा समावेश … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ४८३ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

धक्कादायक! महत्वाच्या दस्ताऐवजमध्ये नगरसेवकाने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  जनसामान्यांना त्यांचे अधिकार आणि अनेक सुविधा मिळण्याचे महत्वपूर्ण दस्ताऐवज म्हणजे रेशनकार्ड. परंतु संगमनेरमधील एका नगरसेवकाने याच दस्ताऐवजमध्ये अकायदेशीर असे काम केले आहे. तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी यांच्या सहीने दिलेले दिले जाणारे रेशनकार्ड या नगरसेवकाने स्वत:च सही शिक्के मारून वितरीत करण्याचा प्रताप केला आहे. काँग्रेसचे नगरसेवक किशोर बद्रीनाथ टोकरी यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले 41 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७.३४ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

धक्कादायक ! अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ची कमी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचीसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. परंतु तरीही कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात १० हजार पार झाली आहे.  परंतु कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती पूर्वीइतकीच आहे. मात्र रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने अहमदनगरमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन उपलब्ध … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर!

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७२ संगमनेर २३ राहाता ३ पाथर्डी २७ नगर ग्रा.१६ श्रीरामपूर १८ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २१ श्रीगोंदा १८ पारनेर १० अकोले ४ शेवगाव १४ कोपरगाव ३९ जामखेड ५ मिलिटरी हॉस्पीटल १ आता पर्यंत कोरोनातून बरे … Read more

अकोले तालुक्यात बाधित रुग्णांचे द्विशतक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांनी शनिवारी डबल सेंचुरी मारली. यामुळे तालुक्यातील विविध गावांतून पॅाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्या सबंधित गावतील इतर नागरिक प्रचंड दडपणाखाली येत असल्याचे दिसून येत आहे. अशातच लाॅकडाऊन उठल्यानंतर बाजारातून व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातून खरेदीसाठी केलेल्या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अकोले तालुक्यात शनिवारी सकाळपर्यंत चार … Read more

कोपरगावात आणखी १८ जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शनिवारी दुपारपर्यंत कोपरगाव येथे करण्यात आलेल्या ७३ रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्टमध्ये १८ जणांचे अहवाल बाधित, तर ५५ निरंक आले. शनिवारी बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या ३० असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. कोपरगाव तालुक्यातील बाधितांचा आकडा ३२८ वर पोहचला. त्यापैकी १३६ रुग्ण बरे … Read more

श्रीरामपुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; ११ बाधित

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीवर राहणाऱ्या कोरोना बाधित असलेल्या एकाचा उपचार सुरू असताना शुक्रवारी नगर येथे मृत्यू झाला. शनिवारी घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३९५ वर पोहोचली. १० बधितांचा मृत्यू झाला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये ७० जणांची तपासण्या … Read more

विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून मारहाण,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-प्रेम प्रकरणातून विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून युवकास मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश शंकर सारबंदे (२५, उंबरी-बाळापूर, ता. संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी उंबरी-बाळापूर येथे घडली. योगश सारबंदे गावातीलच एका मुलीवर प्रेम करत होता. मात्र तिचे लग्न कुटुंबीयांनी करून … Read more

नामदार बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना भल्याभल्यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यात नामदार महोदयांच्या काकाश्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला आहे.  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. तर या काकाश्रींच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील … Read more

सुजय विखे झाले आक्रमक म्हणाले माझी ६ कोटी रखडलेली उधारी आधी द्या !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६४६ कोरोना रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला ९२४० वर !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४  इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

मोठी बातमी ! इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत कोर्टाचे ‘हे’ महत्वपूर्ण वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते. त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्यावर कोर्टात केस दाखल होती. परंतु आता कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कीर्तनकार … Read more

‘त्या’ प्रकरणासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मूळ पंचनामा गायब करून नेवासा तहसील कार्यालयाने बनावट पंचनामा केला असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी आलेली तक्रार तपासून उचित कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

‘ह्या’ तालुक्यात एकाच दिवशी ६५ लोकांना कोरोना ; चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात 65 … Read more