हॉटेलमधील कूकचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून

श्रीरामपूर :- तालुक्यातील भेर्डापूर शिवारात भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील अजिंक्यतारा हॉटेलमधील कूक मोहमंद शेख याचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या कूकचा मृतदेह रविवारी हॉटेलच्या मागेच पडलेला आढळला. पोलिसांनी याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरा या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यात मोहंमद … Read more

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी प्रयत्न

संगमनेर :- मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात १२ विरुध्द ० असा निकाल लावण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधत थोरात यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. बदलती समीकरणे लक्षात घेता एकास एक उमेदवारीचा थोरात यांना फायदा होतो की … Read more

ग्रामस्थांचा विधानसभा मतदानावरही बहिष्कार

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील व अतिदुर्गम भागात असलेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांना वर्षानुवर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर आता संतप्त ग्रामस्थांनी सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामस्थांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार. बहिष्कार. आमचा रस्ता झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजीही केली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजा दुहेरी संकटात

अहमदनगर :- शेवगाव तालुक्याच्या दक्षिण भागासह परिसरात बोंडआळी आणि आता रस शोषक किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यात मका बाजरी व ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके डोळ्या देखत नष्ट होत आहेत. त्यातच भर म्हणून की काय कांदा पिकाला हुमनीने पोखरण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या अक्षरक्षा तोंडचे पाणीच पळाले आहे. या भागात जूनच्या … Read more

भाजप सरकारची कुटील नीती : प्राजक्त तनपुरे

राहुरी : राज्य सहकारी बँकेत शरद पवार यांचा कुठलाही संबंध नसताना मात्र आगामी निवडणुकीच्या रिंगणात दडपणे येतील म्हणून एक प्रकारची कुटील नीती वापरण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू झाल्याचा आरोप राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला. शिखर बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी इडीने देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा संबंध जोडल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राहुरी तहसील कार्यालयावर राहुरीतील राष्ट्रवादी … Read more

श्रीरामपूरच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा पेच कायम

श्रीरामपूर :- अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने नेमकी कोणाला उमेदवारी जाहीर होईल याबाबत कार्यकर्त्यांसह मतदारांनाही उत्सुकता लागली आहे. तालुक्यात प्रभाव असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह ससाणे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने सर्वच उमेदवार गॅसवर आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे भाजपत, तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत गेल्याने गेल्या निवडणुकीपेक्षा या … Read more

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कोपरगाव :- घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शिवाजी रस्ता भागात गुरूवारी घडली. या प्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शैलेंद्र राजेंद्र वाघ (बेट) असे संशयिताचे नाव आहे. सकाळी मुलगी घरात असताना आरोपी आला. त्याने समोर बसलेल्या आजीला माझ्याबद्दल विचारले. कसला आवाज येतो, म्हणून मी बाहेर येऊन बघितले … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खरंच 12-0 होणार का ?

नगर जिल्हा हा मोठ्या नेत्यांचा जिल्हा आहे. लोकसभेच्या निवडणुकीअगोदर सुरू झालेली पक्षांतरं अजूनही सुरू आहेत. भारतीय जनता पक्षात जाऊन राज्यात गृहनिर्माणमंत्री झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जिल्ह्यात युतीला 12 आणि दोन्ही काँग्रेसला शून्य अशा जागा मिळणार असल्याचं जाहीर केलं असलं, तरी तसं होणं अशक्य आहे. त्याची कारणं या जिल्ह्यात पाय ओढीचं राजकारण, … Read more

तरुणाईचे मतदान ठरवेल नगर जिल्ह्यातील आमदार !

अहमदनगर :- जिल्ह्यातील राजकारण घराणेशाही पद्धतीचे असून त्याच त्या नेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणातील विविध पदांवर संधी मिळत असते. या नेत्यांचा हक्काच मतदार असल्याचे मानले जाते. विविध माध्यमांतून नेत्यांशी, त्यांच्या संस्थांशी बांधली गेलेली ही मंडळी आपल्या नेत्यांकडे पाहूनच मतदान करीत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे येथील निवडणूक लढविण्याची पद्धत, प्रचाराची पद्धतही त्यानुसार आखलेली होती. अलीकडे … Read more

नेवासा तालुक्यात माजी खा. तुकाराम गडाख मनसेकडून लढणार ?

सोनई :- भाजप आता खुप मोठा झाला असून त्या पक्षाला कुणाची फारशी गरज राहीलेली नाही. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरल्याने आता मला बोलावे लागणार आहे. मी कोणत्याही पक्षाचा बांधील नाही, एक माणूस देखील बदल घडवू शकतो, अशी मला खात्री असल्याने वेळप्रसंगी मी सोनईत राज ठाकरेची सभा लावू शकतो, अशा शब्दात माजी खा. तुकाराम … Read more

बाळासाहेब थोरात म्हणजे बुडत्या जहाजाचे कॅप्टन !

संगमनेर ;-  विधानसभा- निवडणुकीत लोकांसमोर जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामे मांडा.आपल्यावर जिल्हयासह राज्याची महत्वाची जबाबदारी असल्याने गावामधील कार्यकर्त्यांनी आप आपसातली मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आवाहन करतानाच शेजारील (थोरात) म्हणजे बुडत्या जहाजाचे कॅप्टन असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्द येथे … Read more

आमदार उदासीन असल्याने तालुका भकास : काळे

कोपरगाव :- शेजारच्या सर्व तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होतो. मात्र, कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती असूनही दुष्काळाच्या यादीतून तो वगळला गेला. आमदारांना तालुक्याची वास्तव स्थिती मांडता आली नाही. अनेक तालुक्यांना दुष्काळाच्या अनुदानाचा लाभ मिळाला. मात्र, कोपरगावची जनता अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्युसेस पाणी जायकवाडीत वाहून गेले, पण गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र विकतचे पाणी घ्यावे लागले. … Read more

सुराज्य निर्माते, कडवे शासक : बी.जे. खताळ पाटील

राजकारणात आता ‘कार्यकर्ता’ अस्ताला जातोय व ‘पुढारी’ नावाची नवी जमात राजकारणाच्या रिंगणात ‘दादा’ म्हणून मिरवतेय. अशा चिंतादायी काळात ज्यांच्याकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्शाचे महामेरू म्हणून बघावे ते बी. जे. खताळ पाटील यांचे निर्वाण झाल्याने राजकारणातील दीपस्तंभ कोसळून पडल्याचे जाणवतेय. . मागे वळून पाहण्याचा मोह होतो व मग लक्षात येते, स्वातंत्र्य चळवळीने केवळ स्वातंत्र्य दिले, … Read more

पैशाच्या वादातून एकाला भोकसले

देवाण – घेवाणीच्या वादातून सुनील रमेश धिवर, रा. गोंधवणी रोड, घरकुल याला बोलावून घेतले. त्याला तो म्हणाला, माझे पत्नीला नागेबाबा पतसंस्थेतून कर्ज भरण्यासाठी सारखे फोनयेत आहे. तरी सदरचे कर्ज भरण्यासाठी तू मला आताचे आता पैसे दे, त्यावर सुनील त्यास म्हणाला, आता माझ्याकडे पैसे नाही, पैसे न दिल्याचे कारणाने दिलीपने खिशातील कात्री काढून मी आता तुझा … Read more

अपंग मुलीवर बलात्कार

संगमनेर: अकोले तालुक्यातील वाशेरे गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी जी मतीमंद आहे व अपंग आहे ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात आरोपी मुलीच्या घरात घुसला व तिच्या अपंगपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हा अत्याचार झाल्याने सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली असून काल याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिसांत फिर्याद … Read more

संगमनेरात बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का

संगमनेर :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतिश कानवडे यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने थोरात गटाला मोठा धक्का बसला असून, सतिश कानवडे यांचा पक्षातील प्रवेश हा तालुक्यातील परिवर्तनाची सुरुवात आहे असा विश्वास ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तर तालुक्यात प्रश्नांपासून काँग्रेस … Read more

सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

राहाता : सरकारी खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी, महेश सुनील बनसोडे (वय २१, धंदा ड्रायव्हींग, रा. साकुरी दत्तनगर, ता. राहाता) व त्याच्या मित्राकडून महेश शैलेश गाढवे (रा. गणेशनगर, ता. संगमनेर) याने सरकारी खात्यात नोकरी लावून देण्याचा विश्वास दाखविला.  त्याकरिता त्यांच्याकडून … Read more

श्रीरामपुरात वेगळा प्रयोग होण्याची शक्यता आ.कांबळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सकाळपासून शहरात वेगवेगळ्या गटाच्या स्वतंत्र बैठक घेतल्या. उमेदवाराविषयीच्या मतभिन्नतेमुळे कोणत्याही एका नावावर एकमत आले नाही. त्यामुळे श्रीरामपुरात वेगळा प्रयोग होण्याची शक्यता बळावली आहे.  ना. विखे यांनी प्रथम ससाणे गटाची बैठक घेतली. या बैठकीला उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, नाना … Read more