बाळासाहेब थोरात म्हणतात राज्यातील अनेक नेते संपर्कात, लवकरच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

संगमनेर :- काँग्रेस पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आमच्या उमदेवारांची निश्चित झाली असून यादी लवकरचा जाहीर केली जाईल. राज्यातील प्रचारामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी देखील उतरावे, असा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडे आग्रह धरला आहे. मात्र, आपण चर्चा करू, अशी ग्वाही आ. थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. काँग्रेसमधून काही लोक … Read more

पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं !

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता – … Read more

अजित पवार म्हणतात सीताराम गायकरांचं धोतर फेडू !

अकोले ;- दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला … Read more

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले…

नवी दिल्ली : सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात तेलाची टंचाई भेडसावत असतानाच सलग सहाव्या दिवशी देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महागले असले तरी मागील सहा दिवसांत ही वाढ १.३१ रुपयांनी झाली आहे, तर डिझेल देखील २५ पैशांनी महागले आहे. मागील सहा … Read more

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जप्त करण्याची जबाबदारी माझी

जामखेड : कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस्च्या उमेदवाराचे डिपाजीट जप्त करण्याची जबाबदारी विखे पाटील यांची आहे. तसेच जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी तालुक्यातील सुपुत्राची गरज आहे, बाहेरच्यांची नाही. असा टोला खा.डॉ.सुजय विखे रोहित पवार यांचे नाव न घेता लावला. जप्त करण्याची जबाबदारी आपली जामखेड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. विखे … Read more

लाच घेताना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला अटक

श्रीरामपूर : श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मासिक हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना अहमदनगर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की तक्रारदार यांचा श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर मिल्क स्टॉल आहे. हा स्टॉल चालू राहाण्याकरीता मासिक हप्ता म्हणून पोलीस नाईक वैजनाथ … Read more

काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल !

संगमनेर :- काँग्रेसची अंतिम यादी निश्चित झाली असून आम्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. काँग्रेसमधून आजपर्यंत अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, आता सकाळपासूनच आमच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करू नका, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

भाच्याकडून मामीचा विनयभंग

कोपरगाव : शहरातील येवला रोडवरील भाच्याने साडीचा पदर ओढून विवाहित मामीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मामीने भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पती व दोन मुलांसह राहते. तिच्या घराशेजारी भावजय तिच्या मुलासह राहते. बुधवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजता भाचा दारू पिऊन घरासमोर … Read more

शिर्डी मतदारसंघात सेनेकडून चार जण इच्छुक

शिर्डी-: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षांकडून मतदार संघनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत सेना भवनावर पार पडल्या. यावेळी शिर्डी मतदार संघातून विधानसभेसाठी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, जिल्हा संघटक विजय काळे यांनी मुलाखती दिल्या आहेत. राज्यात शिवसेना व भाजप … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिल्या राष्ट्रीय परिषदचे उद्घाटन संपन्न

प्रवरानगर लोणी :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा आज लोणी येथे पद्मश्री डॉक्टर अभय बंग , पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन, कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज, प्र-कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे-पाटील यांच्या … Read more

सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा – डॉक्टर अभय बंग

अहमदनगर :- आदिवासींच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालाच्या आधारे सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित ट्रायबेकॉन या परिषदेत ते बोलत होते. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने आदिवासी विकास मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि आदिवासी संशोधन व … Read more

श्रीरामपूर विधानसभेसाठी कॉग्रेसकडून १९ जण इच्छुक

श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राज्यभरात कॉँग्रेस पक्षाच्या मुलाखती सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल श्रीरामपुरात विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी १९ उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली शहरातील संगमनेर रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये या मुलाखती झाल्या. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा संघटक बाबासाहेब कोळसे, … Read more

शेतकरी महिलेने मागितले इच्छामरण !

नेवासा : खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महिने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय, जिल्हा व तालुका प्रशासनासह संबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांच्याकडे एकूण आठ वेळा मेल, रजिस्टर्ड पत्रव्यवहार, प्रत्यक्ष कार्यालयात पाठपुरावा, विनंत्या केल्या. मात्र, अद्यापही वीजपुरठा सुरळीत न झाल्याने अखेर हताश होवून नेवासा बुद्रुक येथील प्रयोगशील … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज !

अहमदनगर : विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अवघ्या एक ते दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशात जिल्हा निवडणूकशाखेमार्फत निवडणूक आयोगाच्या आदेश बरहुकूम सतर्कतेने सज्जता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २८ … Read more

मधुकर पिछड यांच्या परिवाराने 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला !

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 … Read more

आम्हाला मतदान करा घरे बांधून देतो – खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुका जवळ येताच खा.डॉ सुजय विखे चर्चेत रहाण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. वादग्रस्त विधाने करून माध्यमांसह जनतेच लक्ष वेधून घेण्याचे काम ते करताना दिसत आहेत  अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावरील आक्षेपार्ह विधान त्यानंतर वीस वर्ष मीच दक्षिणेचा खासदार रहाणार असल्याच्या वक्तव्यानंतर उत्तरेचा खासदार ही मीच आहे असे विधान त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे. याच कार्यक्रमात … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.

प्रवरानगर :-  प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माफी मागावी !

नेवासा :- गेल्या ४ वर्षांत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विरोधात केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी होऊन त्यात अजिबात तथ्य न आढळल्याने सरकारने देवस्थानाला निर्दोष सिद्ध केल्याचे देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे यांनी सांगितले. वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठी धादांत खोट्या तक्रारी करून देवस्थानची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून फौजदारीची प्रक्रिया राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट … Read more