कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची व निवडणूक शाखेची जाेमात तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शाखेच्या वतीने प्रशिक्षण वर्ग, बारा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती व विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शासकीय बैठका … Read more

चाराच उठला जनावरांच्या जिवावर!

पारनेर :- जनावरांचे खाद्य म्हणून पेरलेल्या हिरव्या चाऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावरे दगावत असल्याने पशुपालक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. हा हिरवा चाराच जनावरांच्या मुळावर उठला आहे. चालू खरीप हंगामात सोयाबीन, मूग व मका ही पिक पावसाअभावी आली नाहीत तर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाती आलेली पिके वाया गेली आहेत. किटकनाशकांची फवारणी करूनही परिणाम होत … Read more

मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्ही काय ते करा..!

अकोले :- ‘मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्हीच काय करायचं ते करा’, असे उत्तर मुलींची छेडछाड करणाऱ्या टागरट मुलांच्या पाल्याने मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे टारगट मुलांच्या पालकांना समज देणाऱ्या या मुख्याध्यापकांना काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे. प्रवरानगर परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलींबरोबर त्यांचे पालक व आता शिक्षकही वैतागले असल्याचे चित्र असून, यावर पोलिसांनीच काय तो … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात असंतोषाची लाट !

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील कार्यकर्त्यानी दिला आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात पक्षांतर्गत उठलेली असंतोषाची लाट काही थांबायला तयार नाही. त्यांच्या उमेदवारीविरोधात थेट वरिष्ठांकडे गा-हाणे करण्यात आले आहे. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाची हक्काची जागा जाईल, असे भाजप … Read more

निळवंडे कालव्यांच्या कामाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच

संगमनेर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडशी निर्णयामुळेच निळवंडे कालव्यांच्या कामासा सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे. जिरायती भागातील शेतकऱ्यांना युती सरकारमुळेच न्याय मिळाला, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. पानोडी येथे निळवंडे उजव्या कालव्याच्या ५७ किमी लांबीच्या मातीकामाचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती कैलास … Read more

कांबळे यांना श्रीरामपुरात काँग्रेसची उमेदवारी द्या

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा, यासाठी तालुक्यातील खिर्डी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रभाकर कारभारी कांबळे या तरुण तडफदार नेतृत्वास द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना भेटून करण्यात आली. खिर्डीचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर कांबळे यांच्यासह त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणारे शिष्टमंडळ काल आ. थोरात यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यात अनिल … Read more

लोणी येथे गुरुवार पासून राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद – डॉ. राजेंद्र विखे पाटील

प्रवरानगर :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार … Read more

ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला !

कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला. हे केवळ २०१४ ला केलेल्या … Read more

पती, पत्नी व मुलास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी पती, पत्नी व मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळगाव कोंझिरा या ठिकाणी विमल बाळचंद आहेर ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३६ कोटींचे अनुदान

नगर: खरीप २०१८ मध्ये दुष्काळामुळे नगर तालुक्यातील शेती पिकाच्या झालेल्या पिक नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३५ कोटी ८७ लाख ६२ हजार ६२५ इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू असून यादीतील काही लाभाथ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खाते क्रमांक दुरूस्त करून संबंधित तलाठी … Read more

‘अगस्ती’ च्या सभासदांची दिवाळी गोड – मधुकर पिचड

अकोले : अगस्तीच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. तथापि, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये, म्हणून कारखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ऊस व बाहेरून तितकाच ऊस उपलब्ध करून पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अगस्तीने केला आहे. साखरेबरोबरच आर्थिक मदत करून सर्वांची दिवाळी गोड केली जाईल, असे आश्वासन अगस्तीचे अध्यक्ष … Read more

ब्लॉग : तत्वनिष्ठ राजकारणाचा सूर्यास्त…!!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळापासून सक्रीय असलेले खताळदादांनी  सन १९४४ पासून समाजकारणात आणि १९५२ पासून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केलेल्या दादांनी सन १९६२ ते १९८५ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडलेली आहे. याकाळातील त्यांच्या कामाचा लेखाजोखा नुसता वरवर जरी अभ्यासला तरी कुणीही चकित होऊन जाईल. खरे तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवमहाराष्ट्र … Read more

ना.राधाकृष्ण विखेंविरोधात आ. थोरात यांची कन्या लढणार?

संगमनेर :- मतदार संघात आ. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता शिर्डी विधानसभा मतदार संघात गृहनिर्माण राज्यमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजयरथ रोखण्यासाठी आ. थोरात यांची मुलगी शरयू रणजितसिंह देशमुख यांनी शिर्डीतून उभे रहावे, असा कार्यकर्त्यांचा सूर आल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, शिर्डी विधानसभा मतदार … Read more

पैशाच्या वादातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा ‘राडा’!

कोपरगाव :- शहरात नुकतेच नव्याने चालू झालेल्या सुदेश टॉकीज जवळील येवले अमृततूल्य चहाचे कोपरगाव शाखेचे संचालक संकेत गौराम मेंगडे (वय १८) यांना नितीन कोपरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप पगारे रा. संजय नगर कोपरगाव व अनोळखी दोन इसमांनी आर्थिक कारणावरून बेदम मारहाण केल्याचा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संकेत गौराम … Read more

आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर येथील गरीब आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ही महिला पतीपासुन दोन लहान मुलांसह विभक्त राहाते. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील दत्तात्रय बादशहा वाळे (वय ५२) याने तीला ‘तुला एक गुंठा जागा देऊन घर बांधून देतो, तुझ्या लहान … Read more

समाजसेवेचे व्रत हाती घेतलेय राजकारणात मी कधीही येणार नाही -निवृत्ती महाराज इंदोरीकर

संगमनेर : शहरात पोहोचलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त जाणता राजा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर मुख्यमंर्त्यांशी हितगुज साधताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे आता महाराज आमदार थोरात यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संगमनेर विधानसभा … Read more

साईभक्तांना गंडविणाऱ्या महिलेस पकडले !

शिर्डी : साईबाबांच्या उदी व तीर्थ सेवनाने तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. सर्व दु:ख नाहीसे होईल, अशी भुरळ पाडून भाविकांना गंडा घालणाऱ्या महिलेस भाविकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश मिळाले आहे. भाविकांना फसविण्याच्या नाना तऱ्हेने शिर्डीत ठकसेन फसविताना आजवर अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.  आता हा नव्याने प्रकार पुढे आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.. साईबाबांची महती देश … Read more

कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर कांद्यास २५०० ते ३२०० रुपये भाव मिळाला. तसेच दोन नंबर कांद्यास १६०० ते २४९५, तीन नंबर कांद्यास ५०० … Read more