राष्ट्रवादीच्या विजयी आमदारांत अकोलेचे पहिले नाव असेल !

अकोले : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या विजयी आमदारांत अकोले तालुक्याचे पहिले नाव असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.  मंगळवारी दुपारी अकोले शहरात जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यावेळी फाळके बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जि. प. सदस्य … Read more

राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जामखेड : महाजनादेश यात्रेत सोमवारी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत जामखेडकरांना दिलासा दिला. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे. समुद्रात वाहून जाणारे सुमारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या योजनेच्या माध्यमातून नाशिक, नगर व मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे.  जलसंधारणमंत्री म्हणून पंकजा मुंडे … Read more

‘त्या’ योजनेतून बाळासाहेब ठाकरेंचे नाव कुणी वगळले?

श्रीरामपूर :- एसटी महामंडळाने बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने अपघात सहाय्यता निधी योजना सुुरू केली. मात्र, विश्वस्त संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करताना वेगळ्या नावाने नोंदणी केली. नाव कसे व कोणी बदलले याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केली. पत्रकात म्हटले आहे, १ एप्रिल २०१६ पासून अपघात घडल्यास मृताच्या वारसांना १० लाख … Read more

१ लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ

लोणी – राहाता तालुक्यातील दुर्गापूर चारी नं. ११ दाढ रोड परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. वैशाली गणेश पुलाटे, वय २७ हिला नवरा, सासू, सासरा व सासरच्या लोकांनी संगनमत करुन माहेरुन गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशाची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली.  तसेच तिला उपाशीपोटी ठेवून शारीरिक व … Read more

भांडणाचा जाब विचारल्याने धारदार शस्राने डोक्यात वार

नगर – नगर परिसरात वडगाव ते पिंपळगाव माळवी, शेंडी बायपास रस्त्यावर काल ९.३० च्या सुमारास स्पीडब्रेकरजवळ भांडण चालू होते.  ट्रक चालकाला पल्सरवरील आरोपी मारहाण करीत होते. तेव्हा भांडण पाहून थांबलेले शिवनाथ संपत शेवाळे, वय ३२ रा. वडगाव गुप्ता या तरुणाने तुम्ही ट्रक ड्रायव्हरला का मारता?  असा प्रश्न केला तेव्हा आरोपींना राग येवून त्यांनी धारदार शस्राने … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. कविता सागर गांगुर्डे, वय २५ वर्ष ह्या तरुणीने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी चारित्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करायचे, कविता हिने माहेरुन मोटारसायकलचे हप्ते फेडण्यासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करत त्रास दिला होता. … Read more

महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा

संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेला जे खोट सांगत आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे या महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही आजपासून काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला अमरावती येथून सुरुवात करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. संगमनेर येथे सहकार … Read more

गॅस वापरता येत नाही विवाहितेचा छळ

अकोले :- तालुक्यातील भंडारदरा येथे राहणारी विवाहित तरुणी सौ . पूजा सुनील भांगरे , वय २६ वर्ष हिला सासरी नांदत असताना नवरा व सासरच्या लोकांनी तुझ्या माहेरुन दागिने घेवून ये , तुला कपडे धुता येत नाही ! स्वयंपाक करता येत नाही ! गॅस वापरता येत नाही या कारणावरुन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करुन शिवीगाळ … Read more

मुख्यमंत्र्यांच्या नगर जिल्ह्यातील सभा रद्द

अहमदनगर :- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या रविवारी नगर जिल्ह्यातील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहर येथे त्यांच्या सभा होणार होत्या, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.

माजी आमदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे व चंद्रशेखर घुले यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्याची शिखर बँक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केल्याने बँक अडचणीत सापडली. त्य़ामुळे यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होती. त्यावर निकाल देताना संबंधितांविरुद्ध पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे २००५ ते २०१० या काळात या बँकेवर … Read more

श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : शहरातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह पाच जण व दोन ठेकेदार संस्थांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे नगर मध्ये

अहमदनगर :- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) नगरला येत असून, येथील व्यापारी-व्यावसायिकांसह वकिलांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय नगर शहरातील पक्ष पदाधिकाऱी व नेत्यांशी चर्चा तसेच फिरोदिया वृद्धाश्रम भेट व सायंकाळी पारनेरचे युवा नेते नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुळे … Read more

टेम्पोची धडक बसून एकजण जागीच ठार

कोपरगाव | आयशर टेम्पोची मोटारसायकलीला धडक बसून देविदास सुखदेव पवार (वय ५०, चाळीस खोल्या, येसगाव) यांचा मृत्यू झाला. मनीषा देविदास पवार ही जबर जखमी झाली. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी जावेद अजगर सय्यद (मिल्लतनगर, येवले, जि. नाशिक) याचा शोध पोलिस घेत आहेत. वाहन बेजाबदारपणे चालवल्याचा ठपका पोलिसांनी टेम्पोचालकावर ठेवला आहे. या … Read more

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कोपरगाव :- विवाहितेचा मोटारसायकलीवरून पाठलाग करून तिच्या साडीचा पदर ओढून अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘तू माझ्या गाडीवर बसली नाही, तर वाईट परिणाम होतील,’ अशी धमकीही या तरूणाने दिली. या प्रकरणी अविनाश ज्ञानदेव आहेर (वय ३२, श्रीकृष्ण मंदिर गल्ली, मुखेड, हल्ली मुक्काम अन्नपूर्णानगर,कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल … Read more

मुख्यमंत्र्याचा अहमदनगर जिल्हा दौरा पुन्हा बदलला!

अकोले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोल्याच्या महाजनादेश यात्रेचे ग्रहण सुटायचे नाव घेत नाही. महाजनादेश यात्रा आधी १८ ऑगस्टला येणार होती, जलप्रलयामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा तातडीने रद्द केला होता. आता पुन्हा फडणवीस महाजनादेश यात्रेला निघाले आहेत.  अकोल्यातील हा दौरा बुधवारी (२१ ऑगस्ट) व नंतर त्यातही बदल करून शनिवारी (२४ ऑगस्ट) ठेवण्यात आला होता. पण आता हा … Read more

विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून पैशांची मागणी

श्रीरामपूर :- विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून तीच्या पतीस पाठविले, तसेच पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील घुमनदेव येथील एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबत तालुका पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की घुमनदेव येथील राहुल यननाथ गायकवाड (वय २९) या तरुणाने दि. १७ ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेचे फोटो एडीट करून … Read more

जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार हे नक्की

नगर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २४ व २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी शहर भाजपाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो … Read more

कांद्याच्या बाजारभावात पन्नास रुपायांनी वाढ

राहुरी: राहुरी शहर रविवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याच्या बाजारभावात ५० रूपये वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभावात किरकोळ वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर ६९४० गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रूपये क्विंटल भाव मिळाला. दोन नंबर कांदा १३०० ते … Read more