ठेकेदारावर कारवाई न झाल्यास आत्महत्या

संगमनेर | पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अनधिकृत वाळूसाठे अधिकृत दाखवत सादर केलेल्या बनावट वाळू वाहतूक पासांचे पुरावे देऊनही ठेकेदार कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी गणेश धात्रक यांनी केली. कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला मुंबईत वर्षा बंगल्यासमोर विष प्राशन करण्याचा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले, मॉन्टेकार्लो कंपनीने रस्त्याचे काम करताना चोरीची वाळू … Read more

उसण्या पैशावरुन पती – पत्नीस बेदम मारहाण

राहुरी – राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खिळे वस्ती भागात राहणारे कासीम मैदबुद्दीन पठाण यांनी उसणे दिलेले ३२ हजार रुपये मागितले. त्यावरून त्यांना व त्यांची पत्नी रुबिना पठाण यांना लाथाबुक्क्याने व लाकडी बॅटने बेदम मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. कासीम मैनुद्दीन पठाण यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बादशाह मैनुद्दीन पठाण, जावेद बादशाह पठाण, मालन … Read more

विजेचा शॉक लागून मृत्यू

बेलापूर – श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव परिसरातील रहिवाशी पोपट चांगदेव काळे, वय ७० वर्ष यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. पोपट काळे या वृद्धाला विजेचा शॉक लागल्यानंतर श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासले असता काळे हे वृद्ध मयत झालेले होते. डॉक्टरांच्या खबरीवरुन शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून … Read more

महिला सरपंचाला अश्लील शिवीगाळ करत पतीस लाथाबुक्क्याने मारहाण

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील विवाहित तरुण महिला सरपंच यांच्या घरासमोर जावून आरोपी बाळासाहेब आबाराव घोगरे यांनी मागील तीन महिन्यापूर्वीच्या जलसंधारण कामाच्या वादावरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ केली.  तेव्हा सरपंच महिलेचे पती आरोपी बाळासाहेब घोगरे याला म्हणाले की, तू घाण – घाण शिवीगाळ करु नको. असे समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आरोपीने  … Read more

जर पिचडांचं “सांम्राज्य” उखडुन फेकायचं असेल तर या ‘त्रिकुटांना’ एकत्र यावचं लागेल !

“अकोले” तालुक्‍याला डाव्या चळवळीचा इतिहास आहे. मात्र, २०१४ ला राज्यात व केंद्रात सत्तापालट झाला आणि डाव्या विचारांची धार आता बोथट होऊ लागली असल्याने आणि उजवा विचार रुजू लागल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. याचा अपरिहार्यपणे परिणाम माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्यावर होईल असं वाटत होतं परंतु स्वतः पिचड पिता-पुत्र भाजप मध्ये प्रवेश करुन … Read more

कोपरगावात डेंग्यूसदृश तापाचे हजारावर रुग्ण आढळले, नागरिकांत घबराट

कोपरगाव –  महापुरानंतर आजारांमध्ये वाढ झाली. डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण घरोघर आढळत आहेत. साचलेली डबकी, दलदल यामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ताप, थंडी, मलेरिया, तसेच सर्दी-पडशाने त्रस्त आहेत.  ग्रामीण रुग्णालयासह सर्वच रूग्णालये भरली आहेत. डेंग्यूसदृश तापाचे हजारावर रूग्ण आढळल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. त्यामानाने वै़द्यकिय सोयी-सुविधा त्रोटक आहेत.  ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. … Read more

जिवे ठार मारण्याची धमकी देत दीराकडून तरुणीवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील गोंधवणी रोड वार्ड नं. १ परिसरात राहणाऱ्या एका २० वर्ष वयाच्या तरुणीला मागेरी शिवगाव येथे सोडण्याचा बहाणा करुन दुचाकीवर बसवून श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी परिसरातील दुर्गानगर भागात एका पत्र्याच्या खोलीत नेवून तेथे तिला जिवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. दि. ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान गोंधवणी वार्ड नं. … Read more

काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : आमदार तांबे

श्रीरामपूर | सध्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर गेली आहे. याला नोटाबंदी हे एक कारण आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. नवीन उद्योग सुरू नाहीत उलट अनेक कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात ही परिस्थिती नव्हती, असेही त्यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रेष्ठी ठरवतील … Read more

शरीरसुखाची मागणी केल्याने महिलेने घेतले पेटवून

कोपरगाव : तालुक्यातील मंजुर परिसरात राहणारी विवाहित महिला सौ. शोभा मधुकर पायमोडे, वय ३५ हिच्याकडे आरोपी शंकर पांडुरंग पायमोडे, वय ४० रा. मंजूर हा नेहमी वाईट नजरेने पाहत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याच्या त्रासाला कंटाळून शोभा मधुकर पायमोडे या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत शोभा यांचे पती मधुकर रामनाथ पायमोडे … Read more

विद्यार्थ्यांनी बनविलेली कार“स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल

हैद्राबाद :- येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या देशपातळीवरील मानाच्या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार दाखल झाली असून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कार माँडेल बद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली. कार तयार करण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक कराताना … Read more

निळवंडे ओव्हरफ्लो…अनेक गावांचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली

अकोले :- मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून सर्वदूरच्या पावसामुळे तालुक्‍यामध्ये जनजीवन गारठले आहे. जनसंपर्क तुटलेला, वाहतूक विस्कळीत झालेली आणि घराच्या बाहेर पडण्यास धजावणारे कमी अशी स्थिती राहिली आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांबरोबरच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने सर्वच माहोल थंड राहिला. संथ गतीने का होईना, पण राज्य परिवहन महामंडळ बससेवा मात्र विना व्ययत्य सुरू … Read more

भोजापूर धरण झाले ओव्हर फ्लो

अकोले – अकोले, संगमनेर व सिन्नर या तालुक्‍यांना सिंचनदृष्ट्या महत्त्वाचे असणारे भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले.त्यामुळे या तीनही तालुक्‍यांतील लाभार्थी क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. भंडारदरा 9.5 व निळवंडे सव्वाचार टीएमसी झाले असून, आढळा 70 टक्के भरले आहे. ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी पाटात न सोडता, ते नदीपात्रातून संगमनेर … Read more

दुसऱ्याचं वैभव पाहून आपले पोट भरणार नाही – ना.प्रा.राम शिंदे

मतदार संघातील आपल्या संर्वांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावरच कर्जत-जामखेड मतदार संघाला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आणि मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यासह कर्जत-जामखेडकरांची इमाने-इतबारे सेवा केली. केवळ वैयक्तिक संस्था, कारखाने न काढता संपूर्ण मतदार संघालाच परिवार मानून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकासाचा अनुशेष मोठ्याप्रमाणावर भरून काढण्यात यशस्वी झालो. कधीकाळी विरोधात असलेले विरोधक देखील आज सोबत आहे … Read more

Video News : बाळासाहेब थोरात यांच्या बँकेला आरबीआयकडून दंड

संगमनेर :- परवानगी न घेता सभासदांना लभांश वाटप केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व बँकेकडून एक लाखांचा दंड करण्यात आला आहे. पहा व्हिडीओ पुढील लिंकवर – https://youtu.be/N8NFF_-9iHM

बाळासाहेब थोरात यांच्या बँकेला आरबीआयकडून दंड

संगमनेर :- परवानगी न घेता सभासदांना लभांश वाटप केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व बँकेकडून एक लाखांचा दंड करण्यात आला आहे. बँकिंग रेग्यूलेशन कायदयानुसार ही कारवाई करण्यात आली असून बँकेने सभासदांना लाभांश वाटप करण्यापूर्वी आरबीआयची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, ती घेण्यात आली नाही. त्यामुळे बँकेला … Read more

रोहित पवारांच्या उमेदवारीस ‘महिला धोरण’ अडचणीचे !

अहमदनगर : – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना त्यांच्या पक्षाचे ‘महिला धोरण’ अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. याच मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रस्सीखेच सुरू असताना आता प्रदेशाध्यक्ष चाकण याही महिलांची बाजू घेऊन गुंड यांच्या मागे उभ्या रहिल्या आहेत. चाकणकर … Read more

‘या’कारणासाठी नगराध्यक्ष आदिक पंतप्रधानांना भेटणार

श्रीरामपूर | केंद्राच्या विविध योजना नगरपालिकेत राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण भेटणार असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेची सर्वात जास्त घरकुले श्रीरामपूरमध्ये सुरु आहेत. नवीन २७५ मंजूर लाभार्थ्यांची यादी नगराध्यक्ष आदिक यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक ताराचंद रणदिवे, प्रकाश ढोकणे, दीपक चव्हाण, कलीम कुरेशी, केतन … Read more

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा विरोधकांना इशारा

कोपरगाव :- सहकारातील पैशांचा वापर करून समाजात फूट पाडून आपला राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या नेत्यांनी वातावरण कलुषित करू नये, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पूर्णाकृती पुतळा १२-१३ वर्षांपासून शिल्पकाराच्या गोदामामध्ये तयार असताना काही नेत्यांनी श्रेयाचे गलिच्छ राजकारण करून पुतळ्याची एक प्रकारे अवहेलना … Read more