माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना एका मतदाराचे खुले पत्र…

मा.मधुकरराव काशिनाथ पिचड साहेबमा.मंत्री,आदिवासी विकास,महाराष्ट्र.मा.आमदार.वैभव मधुकरराव पिचड साहेबअकोले विधानसभा सदस्य,महाराष्ट्र. महोदय,आदिवासिंच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणीकरण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत … Read more

खेड्यांच्या विकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

शिर्डी :- राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथील शेती महामंडळाच्या मैदानावर ग्रामविकास विभाग आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सरपंच व उपसरपंच कार्यशाळा व परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभा … Read more

मेव्हण्याकडे आलेल्या तरुणीस पळविले

राहुरी – राहुरी तालुक्यातील गोट्ये आखाडा येथे नात्याने मेव्हणे असलेले अंबादास साखरे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथील लक्ष्मण पद्माकर काळे हे कुटुंबासह कंदुरीच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी नात्यातील एक १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी रात्री ९ च्या सुमारास शौचाला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही. या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कायदेशीर … Read more

महिलेस शिवीगाळ करत विनयभंग

नेवासा :- तालुक्यातील कुकाणा परिसरात राहणारी एक ३१ वर्षाची महिला तिच्या घरात एकटीच असताना आरोपी संतोष मारुती गोडे, रा. कुकाणा हा महिलेच्या घरात घुसला व तू माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करते काय? तुझ्याकडे पहातो, असे म्हणून शिवीगाळ करुन धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. काल ११ वाजता हा प्रकार घडला, महिलेने नेवासा पोलिसात … Read more

पाण्यासाठी नगर जिल्ह्यातील आमदार एकत्र का येत नाहीत?

नेवासा :– जिल्ह्यातील टेलच्या भागापर्यंत पाटपाणी पोहोचल्यानंतर जायकवाडीत पिण्यासाठी पाणी सोडण्यास आमचा विरोध नाही. पण पिण्याच्या नावाखाली दारू व साखर कारखान्यांना पाणी देण्यास आमचा विरोध आहे. पाण्यासाठी मराठवाड्यातले आमदार एकत्र येतात, नगर जिल्ह्यातले का येत नाहीत अशी खंत व्यक्त करतानाच बेलापूर-परळी रेल्वेमार्गास युतीच्याच काळात गती मिळाली, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य … Read more

प्रताप ढाकणे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची शक्‍यता

पाथर्डी :- राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांनी रविवारी (२८ जुलै) पाथर्डीत कार्यकर्ते, हितचिंतक आणि आप्तेष्टांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. त्या वरून ढाकणेही वेगळा विचार करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. ढाकणे यांच्या समर्थकांनी पाथर्डीत रविवारी मेळावा आयोजित केला आहे. सोशल मीडियातून त्याचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘काका आता ठरवायचं…… निर्धार … Read more

पवार साहेबांबरोबर काम केले, त्यांना सोडून जाण्याचे दुःख होत आहे – मधुकर पिचड

अकोले :- इतक्या वर्ष शरद पवार साहेबांबरोबर काम केले, त्यांना सोडून जाण्याचे दुःख होत आहे. मात्र पुढील पिढीचे भवितव्य, तालुक्याचा विकास आणि आदिवासी समाजाचे प्रश्न कोण सोडू शकेल हा विचार करूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला, अशी भावना राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी चे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

मोटारसायकल विहिरीत पडल्याने दोन तरुण ठार

संगमनेर :- तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात मोटारसायकलसह विहिरीत कोसळून दोन युवक ठार झाले. संतोष भास्कर दिघे (वय २२, रा. तळेगाव दिघे) व नामदेव तुकाराम वर्पे (वय २३, रा. भागवतवाडी) अशी या दुर्दैवी युवकांची नावे आहेत. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास बोडखेवाडीनजीक ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने तळेगाव दिघे परिसरावर शोककळा पसरली. याबाबतची अधिक माहिती … Read more

‘या’ कारणामुळे केला आ.वैभव पिचड यांनी भाजप प्रवेश

अकोले: अकोले तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला मोठ्या मनाने प्रवेश देऊन स्वागत केले ही आनंदाची बाब आहे. पक्षात काम करताना नवीन जुने कार्यकर्ते यांचा मेळ घालू, असे प्रतिपादन आ. वैभवराव पिचड यांनी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचेही राजीनामे पक्षाचे … Read more

आता मिळणार सात दिवसांआड पाणी

कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे. तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील … Read more

त्यांच्या अभद्र युतीने शेतकऱ्यांची फसवणूक – मा.आमदार शंकरराव गडाख

नेवासे :- मागच्या वर्षी शासनाने गंभीर दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नेवासे घेतला. खरीप व रब्बी हंगामात दुष्काळाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपासाठी कर्ज काढले. मात्र, पिकं सुकून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मशागतीचा खर्च वसूल झालाच नाही, कर्जाचा बोजा मात्र झाला. विम्याची भरपाई मिळेल एवढीच आशा असताना कंपनीने अंगठा दाखवल्याने शेतकरी हतबल होण्याची … Read more

झाडाला गळफास घेत चुलता-पुतणीची आत्महत्या

अकोले :- तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या नागमोडी वळणाच्या विठे घाटात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत स्त्री व पुरुषाचा मृतदेह बुधवारी दुपारी परिसरातील काही मेंढपाळांना दिसले. याबाबत खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे मृतदेह चुलता व पुतणीचे असल्याचे समजते. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी साडेतीनच्या … Read more

घरात झोपलेल्या तरुणीचा विनयभंग करुन पतीस मारहाण

संगमनेर :- तालुक्यातील पाचखिळवाडी कौठे मलकापूर परिसरात राहणारी एक २४ वर्षाची विवाहित तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना याच भागात राहणारा आरोपी अनिल गावडे रा. पाचखळवाडी हा दरवाजा लोटून घरात घुसला. त्याने तरुणीचा हात धरला तेव्हा घाबरुन तरुणी उठली. अनिल गावडे याने तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व विनयभंग केला. पिडीत तरुणीने चुलत … Read more

मुलगा माझा नाही म्हणत पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर :- शहरालगत असलेल्या दत्तनगर भागातील आंबेडकर वसाहत येथे राहणारे विवाहित तरुणी आरजू सलमान पठाण, वय २६ हिला तिचा पती सलमान मुख्तार पठाण, वय २७ याने पत्नी आरजू हिच्यावर शंका घेवून २ वर्षाचा मुलगा अफान हा माझा मुलगा नाही, असे म्हणत पत्नी आरजू व मुलगा अफान यांना मारहाण केली. यात मुलगा अफान सलमान पठाण हाही … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला आ. जगताप – पिचड यांची गैरहजेरी !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे व अंकुश काकडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी दि. २५ जुलै रोजी घेण्यात आल्या. कर्जत – जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली. तर या मुलाखतीला आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड … Read more

आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेशाची संबंध नाही !

अहमदनगर :- आमदार वैभव पिचड हे भाजप च्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीकडून खंडन करण्यात आले आहे. आ.पिचड यांच्या समर्थकांनी आमदार पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत, मात्र काही राजकीय कामांच्या व्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क म्हणजे भाजप प्रवेश असा प्रचार म्हणजे राजकीय अफवा आहे. आमदार पिचड यांच्या मुलीचा सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यादीत नाव … Read more

आमदार वैभव पिचड राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजप – सेनेच्या वाटेवर…

अकोला :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पूत्र आमदार वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, अशी अफवा मागील काही दिवसांपासून होती. आज अखेर तीच अफवा खरी ठरू पाहत आहे. अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपचा गळाला लागले असून, आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिवसभर खलबते सुरू असल्याचे … Read more

भाजप प्रवेश केल्याने विखे पाटील यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात !

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता संघाच्या दक्षेते खाली आहेत. त्यामुळे विखे पाटलांच ‘आगे क्या होता है देखना पडेगा’, अशी खोचक टीका केली आहे. यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते … Read more