श्रीरामपूर शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर :- जनतेच्या हिताचा विचार करून विकासकामे करत असून शहराचा कायापालट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले. प्रभाग १६ मधील आजी-आजोबा विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करताना आदिक बोलत होत्या. या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य नगरसेविका स्नेहल खोरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, उमेश अनकईकर, अर्जुनराव भांड आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या, … Read more

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने हत्या !

कोपरगाव : तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणीच्या भावाने दाखल फिर्यादीनुसार आरोपी पतीच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा … Read more

राज्यात पुन्हा भगवाच फडकणार – आदित्य ठाकरे

संगमनेर :- आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संगमनेर मध्ये बोलताना व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे रविवारी संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. घारगाव येथे आदित्य यांनी शेतात जाऊन ज्वारीची पेरणीही केली. ‘जनतेच्या अनेक प्रश्नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही … Read more

आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दी सारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत…

संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत. ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला. आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. थोरात यांच्या … Read more

बायकोने नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून केला खून

श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव येथील नवनाथ म्हसे यांच्या खून प्रकरणी त्यांच्याच पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी नवनाथ यांच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, दि. १४ जुलै रोजीच्या रात्री नवनाथ म्हसे हे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या शेतातील घरामध्ये झोपलेले असताना दोन … Read more

झोपलेल्या मुलीस पळविले

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील सुरसे भागात राहणारी एक १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरासमोरील पटांगणात झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात आरोपीने या अल्पवयीन मुलीला झोपेतच उचलून नेवून पळविले. या घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून मुलीच्या वडिलांनी पाथर्डी पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना म्हस्के … Read more

शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको?

अहमदनगर :- बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून १२ जाती एकत्रित करून लढा उभारणीला राज्यात यश मिळत आहे. शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको? ओबीसीमधील ३४६ जातीपैकी फक्त ५-६ जाती राजकारणात प्रवेश करतात. १२ बलुतेदारांच्या माध्यमातून या १२ जाती एकत्रित आल्याचे पाहून राजकारणी आता जागे झाले. तेव्हा आपले अस्तित्व सिद्ध … Read more

आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या

अकोले :- रुंभोडी येथील एका तरुणाने आजारपणाला कंटाळून गुरूवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हौशीराम गंगाधर मधे (वय २५) असे त्याचे नाव आहे. तो अनेक दिवसांपासून आजारी होता. औषधोपचार सुरू होते. मात्र, दीर्घ आजारपणामुळे त्याला नैराश्य आले. त्यातूनच त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. हौशीरामचा भाऊ पंढरीने दिलेल्या खबरीवरून पोलिस ठाण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आता होणार पाईपद्वारे गॅस पुरवठा !

अहमदनगर :- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. नगरसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. … Read more

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल

नेवासे : तालुक्यातील सोनई-करजगावसह १८ गावांच्या पाणी योजनेवरून करण्यात आलेल्या रास्ता रोकोप्रकरणी चार दिवसांनंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राजकीय वचपा काढण्यासाठी, तसेच राजकीय कोंडी करून गडाखांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवण्यासाठी राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. सोनई पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या … Read more

विधानसभा निवडणुकीआधी अहमदनगर जिल्हा विभाजन करा अन्यथा….

राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्­नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष … Read more

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

श्रीरामपूर | गोंडेगाव येथील नवनाथ बन्सी म्हसे यांचा जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बन्सी म्हसे हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना दरवाजा उघडून लाकडी दांड्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा नवनाथलाही जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा भावबंधाशी शेतीच्या वाद असून तो सध्या न्यायालयात आहे. याप्रकरणी … Read more

नापिकी मुळे वृद्ध शेतकऱ्याची नैराश्यातून आत्महत्या

शिर्डी :- लोणीपासून चार किलोमीटर अंतरावर गोगलगाव (ता. राहाता) येथील ७४ वर्षांच्या शेतकऱ्याने नापिकी आणि यावर्षी पेरलेले मका बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. बाबा महादू मगर असे त्याचे नाव आहे. संगमनेर रस्त्यावर गायकर लवणात त्यांची दोन एकर जमीन आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी हायटेक (सोना) ५१०१ कंपनीचे हायब्रिड मका बी पेरले होते. हे … Read more

अकोल्याची जागा भाजपला मिळाल्यास नक्की जिंकणार

अकोले :- अकोले विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ही जागा शिवसेना लढवते. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तीन नंबरवर राहिला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश भाजपला मिळाले. लोकसभेत जरी तालुक्यातून पीछेहाट झाली असली, तरी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. अकोल्याची जागा … Read more

फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग आल्याने आईचा मुलावर चाकूहल्ला !

नेवासे :- नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे ‘फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग येऊन आईने मुलाचे तोंड दाबून त्याच्यावर चाकूने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. जखमी विशाल दीपक साळुंखे (१८) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी शाेभाला अटकही केली. सोमवारी … Read more

आ. भाऊसाहेब कांबळे कुटुंबात काम करणाऱ्या तरुणाच्या खून प्रकरणी एका आरोपीस अटक

श्रीरामपूर :- शहरातील आ. भाऊसाहेव कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेला कामगार सुरेश बळवंत वाघमारे, वय ३८ याचा दगडाने ठेचून खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवून खुनातील एक आरोपी हेमंत उर्फ दत्ता किशोर शेळके, वय ३२, रा. संगमनेर रोड, शंकरभुवन, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर याला पोलिसांनी अटक … Read more

नगर जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई समस्या कायम

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी लावली.परंतु  दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील 13 लाख 57 हजार 295 जनता पाणी टँकरवर अवलंबून आहे.  जिल्ह्यातील 487 गावे अणि 2 हजार 847 वाड्या वस्त्यांवर अजूनही 687 पिण्याच्या टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यातील 5 नगरपंचायातींच्या हद्दीत अद्याप पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. … Read more

मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी पक्षात किती आमदार राहतील याची दक्षता घ्या !

शिर्डी :- आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करत आहे. जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही … Read more