जमीन विकल्याच्या कारणातून हत्या!

संगमनेर – जमीन विकल्याच्या कारणातून भाऊबंद नातेवाईकांनी संदीप रमेश ठोंबरे , वय ३५, रा. पिंपरणे, ता. संगमनेर याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना काल पिंपरणे गावच्या शिवारात घराजवळील रस्त्यावर घडली. या प्रकरणी मयत संदीप रमेश ठोंबरे यांच्या पत्नी दीपाली संदीप ठोंबरे वय २५ रा. पिंपरणे शिवार यांनी काल संगमनेर तालुका पोलिसांत … Read more

जुन्या भांडणातून कोयत्याने डोक्यात वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

शिर्डी – राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कदम चहाच्या टपरीजवळ काल सायंकाळी ६ च्या सुमारास प्रदीप बळीराम गायकवाड, वय २६, धंदा नोकरी, रा. सावळीविहीर, ता. राहाता, मागील भांडणाच्या कारणावरुन ६ जणांनी जमाव जमवून कोयत्याने डोक्यात वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशांत गायकवाड याच्याही हातावर कोयत्याने वार करुन मारहाण केली. लाकडी दांड्याने पाठीवर बेदम … Read more

शाळेतून घरी जात असताना विद्यार्थिनीचा हात धरुन विनयभंग

संगमनेर :- तालुक्यातील रायतेवाड़ी परिसरात काल दुपारी १२. ३० च्या सुमारास एक साडेचौदा वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी आधार कार्ड आणण्यासाठी शाळेतून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपी राजू मोरे (रा. रहिमपूर, संगमनेर) याने विद्यार्थिनीचा हात धरुन विनयभंग केला. विद्यार्थिनीने जोरजोराने आरडा ओरड केल्याने दुचाकी टाकून राजू मोरे पळाला याच आरोपीने आठ दिवसापूर्वी एका १२ वर्षाच्या विद्यार्थिनीची … Read more

थोरात महाविद्यालयात राडा !

संगमनेर : शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकास मारहाण झाल्याची घटना सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोरक्षनाथ नामदेव पानसरे हे थोरात महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पानसरे, … Read more

विहिरीवरील क्रेन तुटून महिलेचा मृत्यू

श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती. शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या … Read more

वीजवाहक तार अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या भोईटे मळा येथे प्रवीण लक्ष्मण सुपेकर (वय २७) या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीजवाहक तार तुटून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याला वाचविण्यासाठी गेलेली त्याची चुलतीही तारेला चिटकली होती, पण तिच्या मुलाने हातावर काठी मारून आपल्या आईला वाचवले आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३०) दुपारी साडेतीन … Read more

नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्यास अटक

पारनेर :- लग्नाचे आमिष दाखवून, सोबत काढलेले फोटो आई-वडिलांना दाखवण्याची तसेच नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील संदीप बन्सी करंजेकर या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी आरोपी संदीप यास अटक केली आहे. मजुरी करणाऱ्या आदिवासी तरुणीची सन २०१७ मध्ये संदीप करंजेकर याच्याशी ओळख … Read more

बियरबारमध्ये झालेल्या भांडणात मॅनेजरचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा वाढीव गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हेचे गांभिर्य ओळखुन पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाढे यांनी तत्काळ ३०७, ३२६ चा गुन्हा दाखल केला होता. तर … Read more

तरुणीचा खून करून मृतदेह फेकला

नेवासा – तालुक्यात तरुणीचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि महालक्ष्मी हिवरे परिसरात राहणारी तरुणी ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके (वय २७) हिला अज्ञात आरोपीने कशानेतरी मारहाण करुन जखमी केले, तिला अज्ञात कारणावरुन मारहाण करुन कशाने तरी ज्योती गायके हिचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट … Read more

गळफास घेत दोघांनी केली आत्महत्या

कोपरगाव :- शहरातील दोघांनी स्वतंत्र घटनांमध्ये आपल्या राहत्या घरी बुधवारी गळफास घेत आत्महत्या केली. गांधीनगर भागात इनडोअर गेम हॉलजवळ राहणाऱ्या नीलेश किसन दरंदले (वय ३७, महादेवनगर) यांनी राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला. शहरातील औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या किरण विजय चव्हाण (वय १३) या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. दोन्ही घटनांबाबत संतोष … Read more

विजेचा धक्का बसल्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत

अकोले :- विजेचा धक्का बसल्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गर्दनी शिवारात काल सायंकाळी घडली. संगीता दिलीप झोळेकर (वय-40) व आविष्कार दिलीप झोळेकर (वय-16) दोघे मूळ रा. गर्दनी, हल्ली- अमृतनगर, नवीन नवलेवाडी, अकोले असे यातील मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे अकोले शहरासह गर्दनी गावावर शोककळा पसरली आहे. अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये क्रीडा … Read more

शेतकर्‍यांना न्याय द्या खा.डॉ.सुजय विखे पा. यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली – देशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून  निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून  द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली. संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी शून्य प्रहरात कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि  अर्थिक  संकटाला तोंड … Read more

मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणार्या नराधमास अटक

कोपरगाव : शहरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : शहरातील ४२ वर्षीय मनोरूग्ण पिडीत महिलेवर मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी विनोद बन्सीलाल लोंगाणी याने … Read more

सामान्य जनतेला कांद्याच्या वांध्याचा फटका बसण्याची शक्यता

कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, येसगाव या परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे टाकळी फाटा येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला व मोठ्या प्रमाणात वाहून गेला. यामुळे कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी कांदा विक्री बंद ठेवली असल्यामुळे मंगळवार ते शनिवार असे चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

महिला पदाधिकारीने नगरसेविकेच्या पतीला फटकारले…

श्रीरामपूर : व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या बातमीच्या कारणावरून काल (दि. २४) राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांनी एका नगरसेविकेच्या पतीला चांगलेच फटकारले. पालिकेच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार सुरू असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी मध्यस्थीचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. काल (दि. २४) प्रभाग नऊच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी … Read more

आमदार थोरातांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

संगमनेर :- नगरपालिकेच्या एका जागेसाठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात कांँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. उमेदवाराला अपेक्षित मते मिळू न शकल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. काँग्रेसच्या राजेंद्र कारभारी वाकचाैरे यांनी शिवसेनेच्या कविता तेजी यांचा पराभव केला. संगमनेर नगरपरिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. याशिवाय नगराध्यक्षपदही काँग्रेसच्या ताब्यात असून पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागेत एका … Read more

नेवाश्यात पुन्हा गडाख किंग, आमदार मुरकुटेंच्या अडचणी वाढल्या

नेवासे : पंचायत समितीच्या सोनई गणाची पोटनिवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कारभारी डफळ यांनी भाजपच्या प्रकाश शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव केला. भाजपचा धुव्वा उडण्यास आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे खापर फोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणींत वाढ होणार आहे.  नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी मराठा, … Read more

खा.सुजय विखेंसह आ.संग्राम जगताप यांनी केला ‘इतका’ खर्च…

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे. यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे. शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार … Read more