साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

शिर्डी :- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या दोन्ही निर्णयामुळे संस्थानच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार असल्याचही हावरे यांनी सांगितल. गेल्या पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी तोकड्या … Read more

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार.

कोपरगाव :- तुझे आई-वडील आंधळे आहेत. मी त्यांना सांभाळेन. तू माझ्याशी लग्न कर, असे आमिष दाखवून एका युवकाने १६ वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती झाली. या प्रकरणी पोलिसांनी आकाश रमेश रणशूर (सोनारवस्ती, मुर्शतपूर, धारणगाव रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीने फिर्याद दिली. आकाशने लग्नाचे आमिष दाखवून मुर्शतपूर फाटा … Read more

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू

संगमनेर :- शेताच्या कडेला खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने झडप घालत शेतात नेत ठार केल्याची घटना रविवारी रात्री संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात घडली. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने घटनास्थळाजवळ पिंजरा लावला आहे. प्राजक्ता तेजस मधे असे या चिमुकलीचे नाव आहे. अकलापूर येथील भोरमळ्यात चिमुकलीचे आई-वडील सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील टोमॅटोवर फवारणी करत होते. तर त्यांच्या … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

संगमनेर :- नापिकी व कर्जाच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रकार तळेगाव दिघे येथे घडला. सचिन जगन्नाथ बढे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बढेवस्ती (तळेगावदिघे) येथे सचिन आपल्या कुटूंबियांसह राहत होता. कुटूंबिय एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून शुक्रवारी त्याने घरात कोणी नसतांना शेतातील विहीरीनजीक तणनाशक विषारी … Read more

राहात्या घरात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या.

अकोले :- बारावीमध्ये शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्याथ्र्याने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले शहरातील सारडा पेट्रेलपंपाच्या मागे डॉ.मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. इयत्ता बारावीची परीक्षा सुरू … Read more

दुधाच्या बिलाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आश्वी :- खासगी दूधसंघाला घातलेल्या दुधाच्या बिलाची रक्कम वारंवार तगादा करूनही डेअरी मालकाने देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील रहिमपूर येथे घडली आहे. नितीन शिंदे (वय २८, रा. रहीमपूर, ता. संगमनेर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन शिंदे हे शेतकरी असून आपल्या घरचे संकलित दूध एका खासगी दूध डेअरीला देत होते. यापोटी … Read more

अवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.

राहाता :- अवजड वाहतुकीमुळे राहाता व अस्तगाव माथ्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर एकजण जखमी झाला. गुरूवारी रात्री सातच्या सुमारास कोपरगाव नाक्याजवळ संजय छबू गिधाड (राहाता) बाजार करून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला उभा असताना नगरहून शिर्डीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकची (युपी ७७ एएन ५८०४) त्याला धडक बसली. तो गंभीर जखमी झाले. शिर्डी … Read more

पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेंत दोन गटांत राडा !

अकोले :- आमदार नरेंद्र दराडे व सुरेखा गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित संपर्क अभियान कार्यक्रमात शिवसेनेंतर्गत दोन गटांत पदाधिकारी निवडीवरून शुक्रवारी मोठा राडा झाला. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या घटनेच्या वेळी सुमारे पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार दराडे यांचा सत्कार तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केल्यानंतर सुरेखा गव्हाणे यांच्या सत्काराला सभापती रंजना मेंगाळ यांच्याऐवजी माजी जि. प. … Read more

रेल्वेरूळावर मृतदेह आढळला.

कोपरगाव :- शहरातील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या सुनील बागले (वय ३८) यांचा मृतदेह २० फेब्रुवारीला तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रेल्वेरुळावर आढळून आला. कोपरगावचे रेल्वेस्टेशन मास्टर विजयपाल सिंग यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बागलेचे नातेवाईक, मित्र परिवाराने तेथे मोठी गर्दी केली होती.

श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच होणार !

श्रीरामपूर :- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा होणार असून येत्या २२-२३ फेब्रुवारीला ही घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृती समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळेच श्रीरामपूर जिल्हा होणार असल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. येथील एमआयडीसीत ५ कारखाने लवकरच सुरु होणार असून त्यामुळे २ ते ३ हजार युवकांना रोजगार मिळेल, असेही कांबळे म्हणाले. नगर परिषद, दीनदयाळ अंत्योदय … Read more

आईचा विरह सहन न झाल्याने मुलाचेही निधन.

अकोले :- आईचा विरह सहन न झाल्याने शनिमंदिर परिसरातील बांगड्यांचे व्यावसायिक विश्वनाथ पुरुषोत्तम शेटे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मातु:श्री सीताबाईंचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे विश्वनाथ दुःखी होते. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्यांनी प्राण सोडला. त्यांच्यावर संगमनेर येथील प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, … Read more

शिवसेनेने फोडलेल्या सगळ्या डरकाळ्या पोकळ :- आ.बाळासाहेब थोरात.

संगमनेर :- शिवसेनेने फोडलेल्या सगळ्या डरकाळ्या पोकळ निघाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत भाजपकडून शिवसेनेची सर्वात जास्त अवहेलना झाली आहे. जे बोलतो ते खरे करतो, असे सांगणाऱ्यांनी त्यांचेच वक्तव्य खोटे करून दाखवण्याचे काम केले आहे. जनतेला भाजप-शिवसेना युती मान्य होणार नाही. शिवसेनेला कशाची भीती वाटली की त्यांनी युती केली, असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल.

राहाता :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अस्तगाव येथील दोन जणांविरोधात राहाता पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राहाता पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, अस्तगावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले होते. आरोपी राजेंद्र रतन वाणी व इंद्रभान भाऊसाहेब गव्हाणे यांनी पीडित मुलीच्या राहत्या घरात पीडित मुलगी आणि तिची बहीण घरात एकट्याच असल्याचा … Read more

शिक्षिका अभ्यासावरून रागवल्या म्हणून आत्महत्या.

अकोले :- तालुक्यातील देवठाण येथील आढळा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी नदीपात्रातील विहिरीत आढळला. सौरभ मच्छिंद्र सोनवणे (वय १७) असं त्याचं नाव आहे. १२ फेब्रुवारीला तो बेपत्ता झाला होता. शिक्षिका रागावल्यानं मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला असून, त्यांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सौरभला दहावीच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते. त्यामुळे पालकांना … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत आई आणि मुलाचा मृत्यू.

संगमनेर :- कोल्हार महामार्गावरील अस्मिता डेअरी फाट्यावर रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाढ बुद्रुक (ता. राहाता) शिवारातील तांबेगोठा येथील महंमद उर्फ अफ्रोज कासम शेख व फरीदा कासम शेख या माय लेकांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महंमद शेख व त्याची आई फरीदा हे सादतपुर … Read more

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेलवर छापा; दोघांना अटक.

शिर्डी :- साईमंदिरापासून जवळ असलेल्या पिंपळवाडी रस्त्यीवरील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे सोमवारी टाकलेल्या छाप्यात उघड झाले. हॉटेलचा मँनेजर योगेश अण्णासाहेब पवार (२७, माळीनगर, वैजापूर), ग्राहक म्हणून आलेला विजय एकनाथ गायकवाड (३८, कोपरगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हॉटेलचालक नाना शेळके फरार झाला. आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. शिर्डीत नव्याने हजर झालेले पोलिस उपअधीक्षक … Read more

हार्वेस्टींग मशिनखाली चिरडून एक ठार.

कोपरगाव :- तालुक्यातील भोजडे शिवारातील स्वत:च्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस हार्वेस्टिंग मशीनच्या चाकाखाली चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला. राधाकृष्ण निवृत्ती सिनगर (वय ४९ रा.भोजडे, ता.कोपरगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हा अपघात मृत सिनगर यांच्या शेतात घडला. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना यांच्या ऊस हार्वेस्टिंग मशीन मार्फत सिनगर … Read more

वाकड्यात शिरणे हीच ‘विखे’ परिवाराची परंपरा !

संगमनेर :- संगमनेरचा विकास हा शेजारच्यांना पाहवत नाही. कुटनीतीचा वापर करून विकास कामांमध्ये आडकाठी निर्माण करणे व वाकड्यात शिरणे ही विखेंची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाषराव सांगळे यांनी दिले डॉ. सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आ. थोरातांवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या … Read more