पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने शिक्षकाकडून गंडा.

अहमदनगर :- सात महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लोणीतील शिक्षकाने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांकडून समजेली अधिक माहिती अशी : स्टॉक गुरू ही आर्थिक गुंतवणूक करणारी कंपनी सात महिन्यांत आपले पैसे दुप्पट करून देते असे आमिष दाखवत … Read more

पाण्याचे बाटलीचे पैसे मागितल्याने नगरसेवकाने दुकान जाळले.

कोपरगाव :- पाण्याच्या बाटलीचे असलेली उधारी मागितल्याचा राग आल्याने नगरसेवकासह तिघांनी साईआस हे मेडिकल दुकान फेटवून दिल्याची घटना १४ फेब्रुवारी रोत्री रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान टाकळी रोडवर घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी : टाकळी रोडवर सचिन निबा शिरोडे यांचे साईआस नावाने मेडिकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी … Read more

महाविद्यालयीन युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू.

राहाता :- हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. ही घटना राहाता शहरातील पंधरा चारी भागात शुक्रवारी दुपारी घडली. सायली विजय सदाफळ ही विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. शुक्रवारी दुपारी हरभरा खाण्याकरिता ती शेतात गेली होती. हरभरा घेतल्यानंतर तो धुण्याकरिता त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यावर ती गेली. हरभरा धुताना … Read more

वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा केला खून.

राहाता :- तालुक्यातील शिंगवे गावात वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रज्जाक बशीर शेख (वय ६०) हे गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पुतण्या मोहसीन यासीन शेख तेथे आला. वडिलोपार्जित शेतीच्या वादातून त्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्याराने पाठीत व डाव्या हाताच्या मनगटावर वार … Read more

‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍याची महिलांसह नागरिकांकडून यथेच्छ धुलाई !

श्रीरामपुर :- एका महिलेकडे पाहून ‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍या एका आंबट शौकिनाची या महिलेसह जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली. श्रीरामपूर शहरातील डावखरवस्ती परिसरात काल सकाळी एक महिला जात असताना परिसरातील एका आंबट शौकिनाने सदर महिलेस ‘आय लव्ह यू’ म्हणत अश्‍लिल चाळे केले. येता-जाता नेहमी त्रास देणार्‍या या आंबट शौकिनाचे हे वर्तन … Read more

तरूणीची साडीने गळफास घेऊन आत्महत्या.

संगमनेर :- तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील १९ वर्षांच्या तरुणीने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजा नंदू पावसे असे या तरुणीचे नाव आहे. तिने आपल्या राहत्या घरात सकाळी आठच्या सुमारास कोणी नसताना साडीने गळफास घेतला.पोलिस पाटील मथाजी पावसे यांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख आणि तोडकरी … Read more

आ. वैभव पिचड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास गंभीर परिणाम.

अकोले :- लोकहितासाठी व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या आ. वैभवराव पिचड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास गंभीर परिणाम होतील. गुन्हा दाखल करण्याअगोदर तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी व प्रत्येक कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करावा लागेल व यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासनाने तयार राहावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला. अकोले तालुक्याचे आ. वैभवराव पिचड यांच्यावर निळवंडे … Read more

कार दगडावर आदळल्याने दोघे ठार.

संगमनेर :- तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डोळासणे शिवारात स्विप्ट कार महामार्गाच्या कडेला असलेल्या दगडावर जोरात आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचा दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघातात शुक्रवार (दि.८) रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास झाला आहे.. याबाबत माहिती अशी की, स्विप्ट कार मधून दोघे जण (नावे समजू शकले … Read more

विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या.

राहाता :- तालुक्यातील नांदुर्खी येथे एका गर्भवती महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी पतीसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नांदुर्खी येथील निकिता सुरज चौधरी (वय २४) ही विवाहिता साडेतीन … Read more

आमदार वैभव पिचडांविरुद्ध पोलिसात तक्रार.

राहाता :- निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम अवैधरित्या बंद केल्याप्रकरणी अकोल्याचे आमदार वैभव पिचड व काही शेतकऱ्यांविरुद्ध निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार केली. राष्ट्रवादीचे आमदार पिचड यांनी बनावट शेतकऱ्यांना पुढे करून किमी दोनमधील कालव्याचे काम बेकायदा बंद केल्याने कृती समितीने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. … Read more

मुलगा ट्रॅक्टरच्या खाली आल्याने मृत्यू,उसतोडणी मजुरांकडून ड्रायव्हर तरुणाची हत्या !

श्रीरामपूर :- ऊसतोडणी कामगारांच्या टोळीतील एक लहान मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त ऊसतोडणी कामगारांनी लाकडी दांडके व कोयत्याने केलेल्या मारहाणीत गावातीलच असणारा चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरच्या उक्कलगावात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरातील दरंदले वस्तीनजीक कडबा कुट्टी करणारा रिकामा ट्रॅक्टर चालला होता. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ऊस … Read more

दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – ग्रामविकासमंत्री मुंडे.

अहमदनगर :- जिल्ह्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरीव निधी दिल्याचे सांगताना दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महिला व बाल विकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. नेवासा तालुक्यातील सोनई येथे विविध विकास कामाचे भुमिपूजन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या, केंद्र … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

श्रीरामपूर – मोटारसायकलला ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी पावनेसात वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील महात्मा गांधी चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी सागितलेली माहिती अशी, की सोहेल इमाम शेख (रा. काझीबाबा रोड, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) व महेमूद हुसेन शेख (रा. गोंधवणी, वार्ड क्रमांक १) हे श्रीरामपूर बसस्थानकावरून संगमनेर … Read more

महिलांचे दीड लाखाचे दागिने लांबवले.

श्रीरामपूर :- दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबवले. डाकले इमारतीनजीक छाया विजय सोनी या मोटारीतून उतरून घराकडे येत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे दागिने लांबवले. दुसरी घटना जुन्या वसंत चित्रपटगृहानजीक घडली. सुशीला अशोकचंद पांडे या रिक्षातून उतरून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील लाखाचे गंठण लंपास केले.

माजी आमदार अनिल राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

अहमदनगर :- वैयक्तिक आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वैयक्तिक बदनामी करणे, यासह पोलिसांप्रती अप्रतिची भावना चिथावणे, पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनावर टीका केली होती. … Read more

अपघातात ४६ प्रवासी बालंबाल बचावले.

भंडारदरा :- अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळ गार्डनच्या अरुंद पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व टाटा विंगर या खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या गाडीची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांमधील ४६ प्रवाशी कोणत्याही प्रकारची ईजा न होता बालंबाल बचावले. या अगोदरही काही वर्षापुर्वी बस ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे ६० प्रवाशी बचावले होते. सविस्तर वृत्त असे की, अकोले आगाराची … Read more

शिर्डीत विवाहित तरुणाची आत्महत्या.

शिर्डी :- शहरात विठ्ठल वाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र चिथा देवरे (वय २५) या विवाहित तरूणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर तरुणांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते. देवरे हा हाताळे (ता. मालेगाव) येथील होता. रोजगाराच्या शोधात तो शिर्डीत आला होता. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शिर्डी – नाशिक महामार्गावर भीषण अपघात.

कोपरगाव :- साई दर्शन करून घराकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यात 13 साई भक्त जखमी झाले असून यात 2 पुरुष व 11 महिला यांचा समावेश आहे. हा अपघात शिर्डी नाशिक महामार्गावर खडकी नाला येथील वळणावर झाला. सर्व साई भक्त रत्नागिरी सावंतवाडी येथील आहेत. या सर्वांना उपचारासाठी शिर्डी येथील साई स्पेशालिटी … Read more